Nojoto: Largest Storytelling Platform

घामाच्या थेंबाने येई मातीला सुगंध नामाच्या घोषान

घामाच्या थेंबाने येई मातीला सुगंध 

नामाच्या घोषाने जाई मनातील दुर्गंध 
घामाच्या थेंबाने येई मातीला सुगंध  ||धृ||

कष्ट आणि जिद्दीला पाहून तुझ्या 
हर्ष होवून वरूण राजा पाऊस पाडतो 
भोळ्या भक्तिभावाने, बोबड्या नामाने 
प्रसन्न होऊन विठ्ठल धान्य पिकवतो  
नको ठेवू मनात कुठल्या शंकांचे बंध  ||१||

नामाच्या घोषाने जाई मनातील दुर्गंध 
घामाच्या थेंबाने येई मातीला सुगंध  ||धृ||

काळी आई माय तुझ्यासाठी झिजते 
अंकुर होवून रात्रीतून हिरवीगार होते 
उन वारा पाणी कसे शिवारी फिरते 
कुशीतले गाय वासरू खुशीने हंबरते 
लेकूरवाळी सोबतीने होऊन जाई धुंद ||२||

नामाच्या घोषाने जाई मनातील दुर्गंध 
घामाच्या थेंबाने येई मातीला सुगंध  ||धृ||

कवी पंडित निंबाळकर
सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar,  #matichasugandh

#Drops