Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry प्रेमाचे मोजमाप... नात्यात या आपल्या प

#OpenPoetry प्रेमाचे मोजमाप...
नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे
तू माझ्यावर मी तुझ्यावर भरभरून प्रेम करावे

प्रेमाच्या या नात्यात चुकांचे मोजमाप नसावे
तू मला आणि मी तुला समजून घेत जगावे

झालेच कधी गैरसमज त्याचे पारडे जड नसावे
एकत्र बसून दोघांनी गैरसमज दूर करून घ्यावे

नात्यात या आपल्या चढाओढीचे गणित नसावे
हातात हात घेऊन जीवनाचे कोडे सोडवत जावे

नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे... #OpenPoetry #NojotoMarathi #Marathipoem #Marathikavita #Shabda_gandh #Love