Nojoto: Largest Storytelling Platform

प्राण फुंकूनी ओटीत.. तीची लेक मी जाहले.. तीच्या कु

प्राण फुंकूनी ओटीत..
तीची लेक मी जाहले..
तीच्या कुशीत शिरून
चराचराला भेटले..

कुस तिची उजवली..
हासू फुले गालावर..
रोमारोमात शहारे..
नव्या रुपाची थरथर..

चिखल मातीत रापले..
धान प्रेमाने पेरले..
तिच्या ओलेत्या स्पर्शाने..
हिरवे कोंब तरारले..

त्याच्या कोवळ्या बहराने..
मन झाले ओलेचिंब..
चराचराला फुटले..
जणू आनंदाचे कोंब..

बहर लेवूनी चैतन्याचा
धरा नटली सजली..
रंग गंधांच्या रुपाने..
काया सारी मोहरली..

©अर्चू. #हरितगंधा
प्राण फुंकूनी ओटीत..
तीची लेक मी जाहले..
तीच्या कुशीत शिरून
चराचराला भेटले..

कुस तिची उजवली..
हासू फुले गालावर..
रोमारोमात शहारे..
नव्या रुपाची थरथर..

चिखल मातीत रापले..
धान प्रेमाने पेरले..
तिच्या ओलेत्या स्पर्शाने..
हिरवे कोंब तरारले..

त्याच्या कोवळ्या बहराने..
मन झाले ओलेचिंब..
चराचराला फुटले..
जणू आनंदाचे कोंब..

बहर लेवूनी चैतन्याचा
धरा नटली सजली..
रंग गंधांच्या रुपाने..
काया सारी मोहरली..

©अर्चू. #हरितगंधा
Home
Explore
Events
Notification
Profile