Nojoto: Largest Storytelling Platform

*झोपडी* मोती ,कांचन,हिरे, मोती लेवत होती सीताराज्ञ

*झोपडी*
मोती ,कांचन,हिरे, मोती
लेवत होती सीताराज्ञी
होते स्वप्न महाराणीचे
तिच्या स्वप्नांळू लोचनी
आणि अचानक नशीब
फिरले हाती रुद्र माळ नी
श्वेत लेवूनी तनु वल्कले
सोडूनी आयोद्धा नगरी
दीर पती समवेत निघे
सीता नववधू बावरी
कोणते सदन आज निवारा 
व्हावे तोच झोपडीचे आलेखन
व्हावे,जमवूनी ,शुष्क लाकडे 
थोडे थोडे गवतांचे भारे, आज
साकारती श्रीहरी अरण्यनिवारे
आज प्रभूची ही झोपडी नसे ती 
तर आज विष्णूलोक अवतरे
प्रभुहातांनी सजले सदन ,सीतेचे
ते सुहास्य वदन,आज विसावू
ह्या सदनामध्ये , विसावू वाटे या
प्रभूचरणांमध्ये हीच इच्छा वाटे
ह्या पामर रामभक्तमनामध्ये
         पल्लवी फडणीस,भोर
ता. भोर जि. पुणे (महाराष्ट्र)
*झोपडी*
मोती ,कांचन,हिरे, मोती
लेवत होती सीताराज्ञी
होते स्वप्न महाराणीचे
तिच्या स्वप्नांळू लोचनी
आणि अचानक नशीब
फिरले हाती रुद्र माळ नी
श्वेत लेवूनी तनु वल्कले
सोडूनी आयोद्धा नगरी
दीर पती समवेत निघे
सीता नववधू बावरी
कोणते सदन आज निवारा 
व्हावे तोच झोपडीचे आलेखन
व्हावे,जमवूनी ,शुष्क लाकडे 
थोडे थोडे गवतांचे भारे, आज
साकारती श्रीहरी अरण्यनिवारे
आज प्रभूची ही झोपडी नसे ती 
तर आज विष्णूलोक अवतरे
प्रभुहातांनी सजले सदन ,सीतेचे
ते सुहास्य वदन,आज विसावू
ह्या सदनामध्ये , विसावू वाटे या
प्रभूचरणांमध्ये हीच इच्छा वाटे
ह्या पामर रामभक्तमनामध्ये
         पल्लवी फडणीस,भोर
ता. भोर जि. पुणे (महाराष्ट्र)