हा खेळ रे मनाचा , ब्रम्हात नाही साचा | शुद्ध स्वरूप ज्याचे, नाही तिथे रे वाचा || धृ || ब्रम्हाहुनी ही काही, जगती दुजे न काही | सत चित घन आनंदे, परिपूर्णतेचा || 1 || गोडी गुळात सारी, कणी गुळ गोड भारी | निर्गुण चराचरी, सगुणी आनंद त्याचा || 2 || नामरूपाविणेही, त्रिगुणी बनून राही | गगनासी पालव हा, ना संग त्या नभाचा || 3 || घटी मठी अवकाशी, सान थोर या आकाशी | अस्ति भाति प्रिय रूपे, हा खेळ सर्व त्याचा || 4 || गुरू होऊनिया तारी, विश्वी स्वरूपे सारी | दासपणाने सेवी, आनंद अद्वैताचा || 5 || खेळात खेळी दंग, भासोनी हा अभंग | ब्रम्हात ब्रह्मनंद, हा दास रे मुळीचा || 6 || @suman aaji #sumanaaji