Nojoto: Largest Storytelling Platform

बिरसा मुंडा - संग्राम अस्तित्वाचा इतिहास लिहायचा न

बिरसा मुंडा - संग्राम अस्तित्वाचा
इतिहास लिहायचा नसतो तो लिहिला जातो,
महान कार्याने सामान्य जन महापुरुष बनतो,
जाती-पंथ-धर्माला ओलांडून तो मिसाल बनतो,
अशाच यादीत बिरसा मुंडा अनेकांच्या स्मरणात राहतो.

छोटा नागपुर ला जन्म झाला,
चतुराईने सगळ्यांच्या मनात बसला,
मिशनरी शाळेतून शिक्षणाचा नवा अध्याय गिरवला,
पण धर्मांतराच्या जाळयाचा फास पाहूनी स्वधर्माचा हुंकार दिला.

गोर्यांना नवे आव्हान दिले,
आदिवासी - शेतकर्यांच्या हक्कासाठी बंड पुकारले,
गनिमी काव्याने त्रस्त इंग्रजांना केले,
अन नवा क्रांतिचा पाठ इतिहासाच्या कागदावर बनू लागले.

1894-1900 ह्या सहा वर्षांच्या संग्रामाला पूर्णविराम मिळाला,
संशयित मृत्यूने त्या वीराला अंत केला,
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अजरामर व्यक्तीमत्त्व साक्षात्कार भावी पिढीने गौरवला,
त्रिवार वंदन करत आजचा हा लेख त्या पवित्र चरनाशी वाहिला. #birsamunda