Nojoto: Largest Storytelling Platform

मी काय म्हणते.. मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तु

मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे #शायरी

189 Views