रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा। रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं। रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते। विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं। सरड्यासारखे रंग बदलू,असे आसपास। आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं। रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग। श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।