Nojoto: Largest Storytelling Platform

खिडकीसमोर पाहिलं तर एक भला मोठा ढग येऊन थबकला होता

खिडकीसमोर पाहिलं तर एक भला मोठा ढग येऊन थबकला होता.पावसाने वातावरण निर्मिती रिमझिम बरसण्यासाठी पूर्वतयारी केली होती.वाटलं होतं आता बरसेल पाऊस.कोकिळा आकांताने पावसाला साद घालत होती.पाऊस बरसला नाही.कोकिळेचा भ्रमनिरास झाला.
ती अस्वस्थता , ती घुसमट मन पोखरून पोखरून काढते.जेव्हा तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही सतत मित्रमैत्रिणी , नातलग कुणा ना कुणाकडून फसवले जाता.कधीकधी वाटतं की आपण इतके करंटे नशीब घेऊन जन्मास आलोय का , सगळेच फसवत असतात ? असं म्हणतात आपण जसे असतो तसंच जग दिसतं आपल्याला.आयुष्यात येणारी जाणारी व्यक्ती आपल्याला विश्वासू अर्थात चांगलीच वाटते.मग एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यावर इतकी कठोर शिक्षा का मिळते ? 
गिरवलेले जगण्याचे धडे समजण्यात कुठं चूक होतेय का ? ही चुकभूल कुणाकडे द्यावी घ्यावी ?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathiwriter #thoughts #aestheticthoughts