Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य ••• किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात कधी भव

आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
riteshgadam4994

Ritesh Gadam

New Creator