Unsplash *ती...* एक वेडी पोर ती, नाहीये जवळ माझ्या आता, दिवसा मागून दिवस जातो, तिची वाट पाहता पाहता… तिच्याशी न बोलता माझं मन हे राहील का? पण कधी कधी वाटतं, जबरदस्ती करून तिला प्रेम होईल का? आयुष्य एकदाच मिळत असतं, म्हणून थोडा विचार केला, आपलं प्रेम लादण्यापेक्षा, तिचं तिचं जगू दे तिला… आता मात्र शब्दही मी बोलत नाही तिच्याशी, कितीही काहीही झालं तरी, रडतो एकटाच उशाशी… तिला आठवत असेल का मी? की मी फक्त एक क्षण होतो? तिच्या स्वप्नांच्या गावीही नसेन कदाचित, पण माझ्या स्वप्नांत तिचाच भास होतो… चंद्राशी बोलतो रात्री मी, तिचं नाव पुटपुटत असतो, तो पण कधीतरी ढगाआड जातो, पण मी मात्र तिथंच अडकून बसतो… कदाचित तिचं सुख माझ्या प्रेमाहून मोठं असेल, म्हणून देवासमोर मागणं सोडलंय तिला आता, फक्त मनातल्या त्या कोपऱ्यात, तिला हळूच अजूनही जपतो मी आता… ती खुश असेल तिथं कुठेतरी, आणि मी इथं तिच्या आठवणींमध्ये, एक वेडं प्रेम, एक अपूर्ण कहाणी, जगतो रोज, तिला आठवता आठवता… कारण प्रेम हे असंच असतं, यात तिला मिळवण्याचा हट्ट नाही, तिला सुखी पाहण्यातच माझं जगणं आहे, कारण तिच्या प्रेमाशिवाय माझं जगणं नाही… ©मयुर लवटे #library #Love #Life #Poetry