रोशन पाटील
7066644485

रोशन पाटील 7066644485 Lives in Malkapur, Maharashtra, India

चेहरा तुझा ग कोमल मुखडा , जणू भासला मज चंद्राचा तुकडा . . गझल-गीत सर्वच असे सुचते , शब्दच शब्दांची माळ गुंफते . . जखम नाही ग ती ओली , ती पुन्हा ताजी-तवानी झाली . . . ©® रोशन पाटील

https://4mishabdapakharuroshan.wordpress.com/

  • Latest Stories
  • Popular Stories
प्रणू चाराक्षरी

गुरू

आई-बाबा
आणि मित्र, , 
जीवनाचे
हेच सुत्र ।।१।।

प्रथम ती
गुरू माई, , 
लाड करी
पुष्पा आई ।।२।।

आहे ज्यांचा
मी हो लाल, , 
बाबा माझे
शामलाल ।।३।।

अ ब क ड
पाटीवर,, 
शाळेमध्ये
खर्चे सर ।।४।।

गेलो पुढे
हायस्कुल, , 
पाटी मात्र
झाली गुल ।।५।।

कॉलेज ला
वैद्य सर, , 
लक्ष त्यांच
माझ्यावर ।।६।।

© रोशन पाटील

pariniti@..... Vivek 6/6/92 aman6.1 Meena अश्लेष माडे (प्रीत कवी )

4 Love
3 Comment

प्रेम

★★★★★★★★★★★★

खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम.
नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तुमच्या किती सोबत राहतील याची शाश्वती कोणीच नाही देवू शकत पण आई-वडील हे कायम त्यांचा श्वास असे पर्यंत ते तुमच्या पाठीशी राहतात जरी मुलगा/मुलगी त्यांचा मोठे होऊन तिरस्कार करत असो पण तिळ मात्र ही प्रेम कमी न होऊ देणारे फक्त आई-वडीलच.
आता जरा तरून म्हणजे माझ्यासारख्यांच्या प्रेमाच्या गंमती जंमती कडे. खरं तर प्रेमाची सुरूवात ही मैत्री पासुन सुरू होते मग ती पुढे पुढे चालतच जाते एक रंगमय वाटेवर स्वप्नांच्या दुनियेत रंगबेरंगी चित्रांचे वास्तविकीकरण करत. कॉलेज मध्ये तर याची खरी अनुभूती येते.आधी प्रेमात प्रेम पत्र लिहली जायची तो काळ ही एक वेगळाच म्हणायचा पण रोमांचित ही मग हळु हळु ती जागा गुफे, ग्रिटींग, भेट वस्तु यांनी घेतली. मग जगासोबत प्रेम ही प्रगत होत गेलं व होता होता काळ इथं येवुन पोहचला. साधन बदलले पण प्रेम तेच पध्दत बदलली पण भावना मात्र तेच.
आताचं प्रेम खुपच प्रगत व्हर्चुअल तर्हेने मैत्री व त्यातुन प्रेम म्हणजे फेसबुक, वॉटस्अॅप या सहाय्याने खुप लवकर विचार जुळले की तितकीच घट्ट मैत्री मग काही दिवसात तेच एक प्रेमी युगल बनतात. काहींच यशस्वी तर काहींचा ब्रेकअप होतं. कारण ही तशीच मला रिप्ले लवकर नाही दिलास, कॉलच बिझी आला असे अनेक व त्यातुन जोडीदारावर वाढती संशयीवृत्ती व कमकुवत होणारा विश्वास. मग होतो एक दिवस अंत.
माझा अनुभव खरं तर प्रेम हे तेंव्हा नाही कळत जेंव्हा हे जवळ असतं. ती सोडून जेंव्हा विरहात जगण्याची वेळ येते ना तेंव्हा कळतं प्रेम आणि तेंव्हा जे प्रेम मनात वाढत जातं ना खरच ती भावना वेगळीच असते. स्वत:ला पारखण्याची ती वेळ. एका बाजुला ती/तो सोडुन जाण्याचं दु:ख तर दुस-या बाजुला प्रेमात कोठं कमी पडलो हे शोधणं आणि नेमकं तेंव्हाच मनात त्या बद्दल वाढत जाणारं प्रेम.
आज ती आणि मी वेगळे आहोत पण खरच वेगळे मनानी नक्कीच नाही. मी तिला आठवतो नक्की तेव्हा तिला ही होतच असेल हे माहीती. विसरणं कधीच शक्य नसतं प्रेम असेल खरं तर.

"एकट्यात जेंव्हा म्हणतो ती असती तर बरं झालं असतं ती आधार देणारी भावना म्हणजे प्रेम असतं."
"आनंद झाल्यावर त्यामागील कारण जेंव्हा सर्वात आधी जिला सांगावं वाटतं त्या एक विचारात प्रेम असतं."
"आपली सुख व दु:ख जिच्या सोबत वाटावी असं वाटत ना ती हक्काची व्यक्ती म्हणजे प्रेम असतं."


© रोशन पाटील

★★★★★★★★★★★★ pariniti@..... Vivek D. Meena 141193 Anjali paswan

6 Love
6 Comment
मेघ दुरोळी

खेळ (वर्ण १९ )

तुझा माझा "करूणा" आधीसारखा बसत नाही मेळ, 
नको असं सोडून जाऊस संपेल "रोशन" चा खेळ..  

© रोशन पाटील

pariniti@..... Archana Pardeshi Vivek D. Meena Pallavi 141193

5 Love
4 Comment
विरह (करूण रस)

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

माझ्या मनाची सखे
कळते तुला ही व्यथा. .
का ? मग का नाही घेत
समजून माझी अवस्था ? ? 

तुला ही छळते हे वेडेपण
मला ही छळते एकटेपण. .
लिहणे ही सोडले सारे मी
शब्दात ही दिसतो हताश मी. . . 

वाटते हरवलो माझ्यातला मी
शोधून थकलो स्वत:ला मी . .
गवसू कसं माझं क्षितिज, ,
अंधा-या राती “करूणा” तुच भाकीत. . 

© रोशन पाटील

विरह (करूण रस)

★★★★★★★★★★★★★★

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

माझ्या मनाची सखे
कळते तुला ही व्यथा. .
का ? मग का नाही घेत
समजून माझी अवस्था ? ? 

तुला ही छळते हे वेडेपण
मला ही छळते एकटेपण. .
लिहणे ही सोडले सारे मी
शब्दात ही दिसतो हताश मी. . . 

वाटते हरवलो माझ्यातला मी
शोधून थकलो स्वत:ला मी . .
गवसू कसं माझं क्षितिज, ,
अंधा-या राती “करूणा” तुच भाकीत. . 

© रोशन पाटील

★★★★★★★★★★★★★★

pariniti@..... Meena Pallavi 141193 Vicky 1992 Anjali paswan अश्लेष माडे (प्रीत कवी )

8 Love
8 Comment
चित्रचारोळी

खिडकीत बसुन साजणी, 
हातात पुस्तक छान एक.. 
बघत बाहेर दाटलेले मेघ, 
तुझ्या मनात विचार अनेक.. 

© रोशन पाटील

pariniti@..... विवेक 6/6/92 Meena Pallavi 141193 aman6.1

7 Love
13 Comment