dhanashri kaje

dhanashri kaje Lives in Aurangabad, Maharashtra, India

hi... i am blogger..

http://dhanashrikaje.blogspot.com

  • Latest
  • Video

"राधा रमली भान विसरली कृष्ण आला धावूनी रिताच डेरा घुसळत होती कृष्ण कृष्ण म्हणूनी || धृ || रिताच डेरा पाहुनी तो हा कृष्ण मनी हसला लहान होवूनी भक्तीसाठी डेऱ्यातच बसला बसूनी आत मंथन करितो राधाकृष्ण म्हणून नवल जाहले डेरा भरला राधा पाही वरून || 1 || देह डेरा रिताच असता मंथन करी आतून बुद्धि राधा हळूच पाहे रूप तिचे निरखून || 2 || मन बुद्धीचे मंथन होता भक्ति नवनीत आले वृत्ति गोपिका भाव गोप ते सर्व तृप्त झाले आतून बाहेर येता कृष्ण तेजोमय हे झाले कोण राधा कोण कृष्ण भानच नच उरले || 3 || नूरल्या भावी दासही असतो आनंदाने खेळ खेळतो भक्तिरसाचे लोणी खावूनी विश्वी डेऱ्यानचि हा असतो असतो नसतो जगा भासतो निर अवकाशी स्वरूपी बसतो || 4 || लेखन :- सुमनताई ताडे"

राधा रमली भान विसरली कृष्ण आला धावूनी
रिताच डेरा घुसळत होती कृष्ण कृष्ण म्हणूनी || धृ ||

रिताच डेरा पाहुनी तो हा कृष्ण मनी हसला
लहान होवूनी भक्तीसाठी डेऱ्यातच बसला
बसूनी आत मंथन करितो राधाकृष्ण म्हणून
नवल जाहले डेरा भरला राधा पाही वरून || 1 ||

देह डेरा रिताच असता मंथन करी आतून
बुद्धि राधा हळूच पाहे रूप तिचे निरखून || 2 ||

मन बुद्धीचे मंथन होता भक्ति नवनीत आले
वृत्ति गोपिका भाव गोप ते सर्व तृप्त झाले
आतून बाहेर येता कृष्ण तेजोमय हे झाले
कोण राधा कोण कृष्ण भानच नच उरले || 3 ||

नूरल्या भावी दासही असतो आनंदाने खेळ खेळतो
भक्तिरसाचे लोणी खावूनी विश्वी डेऱ्यानचि हा असतो
असतो नसतो जगा भासतो
निर अवकाशी स्वरूपी बसतो || 4 ||
लेखन :- सुमनताई ताडे

 

9 Love

"हा खेळ रे मनाचा , ब्रम्हात नाही साचा | शुद्ध स्वरूप ज्याचे, नाही तिथे रे वाचा || धृ || ब्रम्हाहुनी ही काही, जगती दुजे न काही | सत चित घन आनंदे, परिपूर्णतेचा || 1 || गोडी गुळात सारी, कणी गुळ गोड भारी | निर्गुण चराचरी, सगुणी आनंद त्याचा || 2 || नामरूपाविणेही, त्रिगुणी बनून राही | गगनासी पालव हा, ना संग त्या नभाचा || 3 || घटी मठी अवकाशी, सान थोर या आकाशी | अस्ति भाति प्रिय रूपे, हा खेळ सर्व त्याचा || 4 || गुरू होऊनिया तारी, विश्वी स्वरूपे सारी | दासपणाने सेवी, आनंद अद्वैताचा || 5 || खेळात खेळी दंग, भासोनी हा अभंग | ब्रम्हात ब्रह्मनंद, हा दास रे मुळीचा || 6 || @suman aaji"

हा खेळ रे मनाचा , ब्रम्हात नाही साचा |
शुद्ध स्वरूप ज्याचे, नाही तिथे रे वाचा || धृ ||

ब्रम्हाहुनी ही काही, जगती दुजे न काही |
सत चित घन आनंदे, परिपूर्णतेचा || 1 ||

गोडी गुळात सारी, कणी गुळ गोड भारी |
निर्गुण चराचरी, सगुणी आनंद त्याचा || 2 ||

नामरूपाविणेही, त्रिगुणी बनून राही |
गगनासी पालव हा, ना संग त्या नभाचा || 3 ||

घटी मठी अवकाशी, सान थोर या आकाशी |
अस्ति भाति प्रिय रूपे, हा खेळ सर्व त्याचा || 4 ||

गुरू होऊनिया तारी, विश्वी स्वरूपे सारी |
दासपणाने सेवी, आनंद अद्वैताचा || 5 ||

खेळात खेळी दंग, भासोनी हा अभंग |
ब्रम्हात ब्रह्मनंद, हा दास रे मुळीचा || 6 ||
@suman aaji

#sumanaaji

9 Love
1 Share

"संत पाण्यात नाव हकते प्रेमाची तुझ्या किनाऱ्यावर येऊन विसावते जराशी"

संत पाण्यात
नाव हकते प्रेमाची
तुझ्या किनाऱ्यावर येऊन विसावते जराशी

 

12 Love

"प्रेम अस करा जे कायम आयुष्यात राहील आणि मैत्री अशी करा जी कायम लक्षात राहील मैत्री आणि प्रेम अशी नाती आहेत ज्या शिवाय आयुष्यच अधुर आहे"

प्रेम अस करा जे कायम आयुष्यात राहील आणि मैत्री अशी करा जी कायम लक्षात राहील मैत्री आणि प्रेम अशी नाती आहेत ज्या शिवाय आयुष्यच अधुर आहे

#मराठीस्टेटस

7 Love

"मार्ग आयुष्याच्या रस्त्यावर मी अशीच चालत रहावे चालता चालता या रस्त्यावर मग हळूच एक वळण यावे वळणावरती हळूच मग कुणीतरी येऊन भेटावे ती भेट मग आयुष्य भर स्मरणात रहावी"

मार्ग
आयुष्याच्या रस्त्यावर मी अशीच चालत रहावे
चालता चालता या रस्त्यावर मग हळूच एक वळण यावे वळणावरती हळूच मग कुणीतरी येऊन भेटावे 
ती भेट मग आयुष्य भर स्मरणात रहावी

 

19 Love