Nojoto: Largest Storytelling Platform
akshaygdeshmukh6159
  • 6Stories
  • 9Followers
  • 27Love
    0Views

Akshay G. Deshmukh

  • Popular
  • Latest
  • Video
470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

तुझ्याशी खूप बोलायचंय,
सारं मन तुझ्यापुढं खोलायचंय,
कधीच तुटणार नाही,
अस नात तुझ्याशी जोडायचय..

रोज नव्याने स्वप्न बघायचंय,
तुला माझी सोबती करायचय,
तुझ्यासवे श्रावण सरीत,
चिंब चिंब भिजायचंय..

तुझ्या काळजात शिरायचंय,
तिथंच करुणेच घर करायचय ,
क्षणोक्षणी तुझ्यासवे जगायचंय,
तुझ्या सहवासात मला रमायचय..

मनातल्या प्रीतीच गुज तुझ्या कानी सांगायचंय ,
तुझ्या साथीला आयुष्यभर राहायचय,
आपलं रेशमी नात शेवटपर्यंत जपायचय...

                  :--अक्षय देशमुख
                     :-११/९/१९-: #trending #love #sad #self ,#friend #gf #bf #forever  Suprabha Amit Kumar Dey Kusumlata Sadanand Mandal Aadarsha singh

#Trending #Love #SAD #Self ,#Friend #Gf #bf #forever Suprabha Amit Kumar Dey Kusumlata Sadanand Mandal Aadarsha singh #poem

4 Love

470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

मनमोकळ्या मनाचा राजा तू
मैत्रीचा प्राणही तू ,प्राणाचा सार्थकी जन्मही तू।

वैविध्यपूर्ण आयुष्याच रान तू
मैत्रीचा लक्षही तू, लक्षाचा अचूक नेमही तू।

संगीतातील निरागस राग तू
मैत्रीचा सूरही तू, सुरांच्या संगतीचा तालही तू।

आयुष्याच्या लेखणीचा परिपाठ तू
मैत्रीचा शब्दही तू, शब्दांत दडलेला अर्थही तू,

मैत्रीच्या प्रेमाचा आधार तू
मैत्रीचा आकाशही तू, आकाशतुन दिसणारा सागरही तू।

प्रत्येक समस्येचा मार्ग तू
मैत्रीचा आदिही तू, आदिचा अक्षय काळही तू ।

                :-अक्षय देशमुख❣ #trending #marathi #poems #shayari #quotes #love @prem #kavita #brother
470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

मैत्री म्हणजे तू आणि तू म्हणजे मैत्री,....
लक्ष वेधले तुझ्या मैत्रीत 
प्राणही सुखावतो तुझ्या मैत्रीत
कधी तू एवढे आपलंसं केलंस हेही नाही कळलं तुझ्या चं मैत्रीत,...

प्रेमरस ही तुझ्या मैत्रीत
वास्तववादी नवरस ही तुझ्या मैत्रीत
न काही समजताच प्रेमरोगही दिला तू तुझ्या मैत्रीत...

खंबीर पाठिंबा तुझ्या मैत्रीत
संदिग्ध भीतीही तुझ्या मैत्रीत
अव्यक्त भावनांचा सागरही तुझ्याच मैत्रीत...

स्तब्धता लक्ष तुझ्या मैत्रित
नात्यांची जोड तुझ्या मैत्रीत
साम्यवादी विचारांचा मालक पण कटू सत्य ही तुझ्या मैत्रीत...

म्हणून मैत्री म्हणजे तू आणि तूच म्हणजे मैत्री ....

         -अक्षय देशमुख😘

4 Love

470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

हा लडके है हम,
दिल हमे भी है,
दर्द हमे भी होता है।

पर ऐ कमबख्त जमाना आँसु तक बहनें नहीं देंता।
मार देता हैं उन ख्वाहिशों को जिसके बिना हम अधूरे होते है।
बस ये कहकर 
की लड़के हो तुम।
तुम्हें रोना शोभा नहीं देता ।

हा एक नही बल्कि लाख मुश्किकिलो से गुजरते है हम,
फिर भी मुस्कुराहट नही छोडते।

चाहत ऐ मंजर दिल मे तो बहोत है,
पर ऐ कमबख्त जमाना सुनता कहाँ है,
कहने को तो हम बहोत खुश नजर आते हैं,
पर दिल की धड़कन हमेशा दर्द की डोर सुनाती है।
क्योंकि
हा लड़के ही है हम।

जिंदगीसे लड़ना जानते है ओर 
जिंदगी बनाना भी जानते है
क्योकि लड़के है हम।

तोड़ देती है कुछ जिम्मेदारियां होंसलो को हमारे,
टूट कर भिखर जाते है हम,
ना चाहते हुए भी अपने सपनो को छोड़ ,
दूसरों के सपनोकों अपना लेते है हम,
बस यूँही ख़ुशरूनाम जीते है हम
क्योंकि लड़के है हम ।

        -अक्षय पदमने (भोले) दिलसे

दिलसे #poem

4 Love

470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

तुझी साथ हवी होती मला
वाऱ्या सारख पळताना,
पावसात भिजताना,
संधीचा निरागस अबोल करताना,
आणि उन्हात सावली पहाताना.....

तुझी साथ हवी होती मला
दुःखात रडताना,
आनंदाने हसताना,
हरवलेल्या मला शोधताना,
आणि पुन्हा त्याच अस्मितेच भान देताना.....

तुझी साथ हवी होती मला
तुझ्यावर खूप प्रेम करताना,
जीवनभर हात मागताना,
आयुष्याचे स्वप्न पहाताना,
आणि फक्त तुला माझंच करताना.....

तुझी साथ हवी होती मला
निखळ तुझ्यात रुजताना,
खिळखिळून त्रासही देताना,
आपलसं करवून समजवताना,
आणि नाविन्यपूर्ण मनःशांती देताना.......

तूझी साथ हवी होती मला
खूप काही बोलताना,
न बोलता ही समजून घेताना,
तुला सुरात गाताना,
आणि ते सूर आपलेसे करताना....

खरच ,तुझी साथ अजूनही हवी होती मला
नेहमी माझंच चुकलं म्हणताना,
सांभाळून नेहमी माफ़ही करताना,
प्रेमानं मारताना,
आणि ते प्रेम नेहमी सांभाळताना........

नेहमी तुझीच साथ हवी होती मला.............

:अक्षय देशमुख😘

4 Love

470614069ed27cd905c10cac400db5c3

Akshay G. Deshmukh

आसुकलेलं रान माझ
न सुकलेली सावली
विनिमय भातुकली 
तूच माझी...

हृदयी प्रित माझी
आखली तिची
प्रेमाची रणरागिणी
तूच माझी....

हळवं मन माझ
पण साखळी नव्हती
आयुष्याची दीप्ती
तूच माझी....

प्रेम असोनि माझं
दृष्टी ही भावळी
वैविध्यात हसणारी
तूच माझी....

निःशब्द भाव माझे
आरोही जीवनाची
श्रद्धेने बघणारी
तूच माझी...

:अक्षय देशमुख #gif Nojoto Nojoto News Nojoto Hindi Nojoto Comedy Nojoto Music

Nojoto Nojoto News Nojoto Hindi Nojoto Comedy Nojoto Music #Gif

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile