Nojoto: Largest Storytelling Platform
mangala2384
  • 166Stories
  • 33Followers
  • 1.3KLove
    0Views

Mangala Gaikwad

  • Popular
  • Latest
  • Video
4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

मनाच्या बंद दरवाजाला जर 
लावली कुणी आतून कडी;
            तर 
आपणही बिनधास्त लावावी 
बाहेरून त्या दरवाजाची कडी!
**मंगला गायकवाड **

©Mangala Gaikwad

10 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

प्रेमाच्या भूलभुलैया खेळात 
          हरवत गेले!
फसलेल्या मनाच्या डोळयात 
          अश्रू आले!
**मंगला गायकवाड **

©Mangala Gaikwad

10 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

बदलले जरी ऋतू तरी 
मन माझे बदलणार नाही;
छाया प्रेमाची तुझ्यावरची 
ढळू कधीच देणार नाही!
            गुंतले मन तुझ्यात असे
            नाही गुंता सोडवणार;
            आली जरी किती वादळे 
            तरी मात त्यावर करणार!
            **मंगला गायकवाड **

©Mangala Gaikwad

6 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

नाही भावनांची किंमत ज्याला 
तिथं प्रेमाचं प्रदर्शन करू नाही;
नाही कळत प्रेमाचं मोल ज्याला 
तिथं प्रेम कधीच व्यक्त करू नाही!
**मंगला गायकवाड **

6 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

नातं तुझं माझं फक्त 
खुशीसाठी जुळलेलं नसावं;
एकमेकांच्या दुःखातही 
कसं सहभागी होणारं असावं!
**मंगला गायकवाड **

8 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

एक संध्याकाळ तुझी माझी 
अशी विस्मरणीय व्हावी;
समोर चहाचा कप मात्र 
नजरेत नजर बेधुंद असावी!
**मंगला गायकवाड **

9 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

म.फुले यांच्या मौलिक कार्याला 
सावित्रीमातेनी अतूट साथ दिली;
शिक्षणाचे अनमोल स्त्री धन देऊन 
अंधारातून उजेडाची वाट दिली!
**मंगला गायकवाड **

7 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

चांगल्या काळात सामील 
व्हायला सगळे घेतात आवडून;
वाईट काळ निघून जातो पण
चांगल्यांचे खरे रुप दाखवून !
**मंगला गायकवाड ** #Forest

11 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

शब्द हे शस्त्र होई
शब्द हे शास्त्र होई;
वापरू जसे वाणीत 
तसे परिणाम देई!
**मंगला गायकवाड **

8 Love

4fa3466d88b03b503c1a386b3339a27b

Mangala Gaikwad

येशील माझ्या आयुष्यात 
सारॅ जगाला मी विसरीन;
झालास माझा तू तर 
जगाशी मी संबंध तोडीन!
          समजून तुला मोहक सुगंध 
          माझ्या श्वासा श्वासात भरीन;
          शेवटच्या श्वासापर्यंत मी 
          आपल्या नात्याला जोडीन!
 बनून तुझ्या देहाची सावली 
 तुझ्या हर रंगात मला रंगवीन;
 सांगते प्रेमाची शपथ घेऊन 
 नशीबाला सहज बदलवीन!
          नसला तू फुललेल्या वसंतात 
          बहर तो पहाणे सोडून देईन;
          दिसणार नाही ज्यात रूप तुझं
          तो आरसाच मी फोडून टाकीन!
ठेवीन तुला काळजात माझ्या
पापण्याच्या तोरणात लपवीन;
येईल जेंव्हा मृत्यू नेण्यास कधी 
तुझ्या आधी मी स्वाधीन होईन!
**मंगला गायकवाड **

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile