Nojoto: Largest Storytelling Platform
poonamdevidasrao7109
  • 45Stories
  • 35Followers
  • 483Love
    1.3KViews

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#poetry,

  • Popular
  • Latest
  • Video
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

तूला  घडवताना
मी 'माती 'जाहले,
बहुअंगी तूझ्या रुपाची
मी 'आवृत्ती 'जाहले...
तूझ्या प्रत्येक यशाची
एक अनोखी 'स्मृती 'जाहले,
तूझ्या अपयशाच्या सुरात
नवीन एक' कृती' जाहले...
उमेदीच्या काळात तुझी
'शक्ती' बनून राहले,
कंटाळवाण्या तूझ्या तालाना
'सक्ती 'बनून राहले...
पोरक्या तूझ्या काही क्षणात
निराळी 'नाती'बनून पाहले,
रिकाम्या तूझ्या खिशाची
कधी' खाती' बनून पाहले..
तूझ्या आयुष्याच्या किनाऱ्याची 
'रेती'बनून राहले,
अन प्रकाशणाऱ्या तूझ्या मनाची
'ज्योती' बनून पाहले...
खरंच गरज होती का
विशेष 'व्यक्ती'बनण्याची?
क्षण सारे निसटून गेले
'रीती'पोकळी बनून राहले..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #MarathiKavita 
#stairs
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

का कुणास ठाऊक 
मन नाही मानत,
पश्चिमेची सांगता होतेय,
पूर्वेची नको वाटतेय सोबत...

अस वाटत एक पर्व संपत आहे,
मोठी शिकार करणारा जंगलाचा राजा का थकत आहे😢?
✍️पूनम दे.कुलकर्णी

13 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#लेखक 
#writer 
#lekhak 
#marathi 
#MarathiKavita 
#मराठी
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

तू ऊर्जा तू शक्ती ,
तू दुर्गा तू भवानी..
घे शपथ आता,
तूच दृष्ट संहारींनी...

येईल कोणी पशु,
लचके तूझे तोडण्या..
दूर झाल्यात कितीतरी ,
मानेवरील ओढण्या..

त्याच ओढणीचा करशील फास,
नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास,
बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास
रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास.......
✍️पूनम श.दे. कुलकर्णी #Stoprape

14 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

आई,नकोय ग मला हे सगळं 
फक्त तूझ्या कुशीत रहायचय
खोटे हेवेदावे नकोच मजला
फक्त तूझी छकुली बनून जगायचंय

ती ओढाताण मज 
वेड लावतसे
स्तुतींच्या त्या चार गोष्टींनी
मज दृष्ट लागतसे

चार दिसांचे नाते सर्वांचे
कधी दर्दी कधी हमदर्दी
नकोत इमले नकोच पैसा
मला प्यारी झोपडीच सादी

आई मीही गर्दीत 
हरवून जातेय
माझ्यातल्या तूझी छबी
मात्र जपून ठेवतेय

मजला नेहमीच तू 
तुझ्या जवळच ठेवत जा
एकटं वाटत असताना
चार शब्द माझ्या उरी साठवत जा
पूनम श. दे कुलकर्णी #आई

12 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

आली गौराई अंगणी

भादव्याची जेव्हा सप्तमी यायची ,
घरी जाण्याची लगबग सुरू व्हायची.
मज ओढ माझ्या गौराईची,
तिज ओढ माझ्या पावलांची.
तिची सेवा करताना रात्र आमची जागायची,
घरच्यासोबत गौरीही मजला थोडी मदत करायची.
दारी आमच्या कुंकवाची पाऊले उमटतात ,
सडा रांगोळीने मग दाही दिशा सजतात.
बाप्पा माझा दोन गौरीमध्ये शोभतो ,
पिलवंडाच्या ऐटीने मखर मंदिरावांनी भासतो.
दुसऱ्या दिवशी पक्वान्नाची पंगत भारी असते,
केळीच्या पानावर पदार्थांची मांडणी खास असते.
तीन दिवस गौरी माझी सुखात विसावते,
निरोप देताना तिज डोळ्यात पाणी मात्र डबडबते.
यावर्षी गौरी माझी घरभर मला शोधत असणार,
भोळे माझ्या कुटुंबीयांच कौतुक मात्र करणार.
जास्त काही नाही मागत फक्त आशीर्वाद देऊन जा,
परत तुझी सेवा करण्याचे भाग्य मजला देऊन जा.
❤️✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी

11 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

बाप्पाच्या आगमनाची
किती लगबग असायची
सगळ्याच मार्केटमध्ये ,
बाप्पाचीच गजबज असायची..

ताल धरण्यासाठी 
ढोल पथकांची तयारी जोरात व्हायची
रात्रंदिन जागणारी मंडळ 
तुझ्या भेटीसाठी सज्ज व्हायची

दिवसभर कितीही थकलो 
तरी आरतीला तूझ्या हजर राहायचो
डोळे मिटून अगदी मनातुन 
तुलाच पहात बसायचो

भर पावसात तूझ्या स्वागताला
आस लावून बसायचो
अन निरोप तूला देताना
बेधुंद होऊन नाचायचो

यावर्षी देवा हे सारं मिस करत आहोत 
तूझी सेवा करत करत एक आस करत आहोत

पुरे झालं बाप्पा आता मिटव हे प्रकरण
परत फुलव विश्व तुझं फुलू दे सौख्याच तोरणं
✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी #गणपती 
#नोजोटो 
#nojotomarathi
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

वाटते कधी मज मी
हवेप्रमाणे वाहत जावी
कधी वावटळीसारखी
कधी मंद झुळूक व्हावी

हळुवार त्या चिमुकल्या बाळाची
 अलगद पापी घ्यावी
घामेजलेल्या बळीराजाला
हळूच थंडाव्याची जाणीव द्यावी

सुखाचे वादळ  होऊनी कधी
एखाद्याच्या दुःखाची शृंखला तोडावी
बाष्पात मग रुजुनी
श्रावणाची सर व्हावी

वाटते कधी मज..............
पूनम देविदासराव कुलकर्णी
औसा जी.लातूर #flyhigh

11 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

****************
उगवला दिन सोनियाचा
माझा मैतर सजला 
शोभे राजस सुकुमार
कसा डौलात चालला

अंगा शोभते नक्षी
शिंगे लावला तो रंग
रूप तुझे नक्षत्रावाणी
झालो घुंगरात दंग

आला दिमाखात घरी
सजे सडा रांगोळी
मग थाटात माजा राजाने
खाल्ली हो पुरणपोळी

तुझ्या आशीर्वादाने झाली
धान्याची भरभराट
तुझ्यामुळेच राजा 
हिरवळ पसरे शिवारात
✍️पूनम देविदासराव कुलकर्णी

**************** #पोळा
#बैलपोळा 
#बैल
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#HappyChildrensDay  
शीर्षक-ताईचे पुस्तक
"आज दुपारी खेळत खेळता
ताईचे मी पुस्तक चोरले,
धूम ठोकली लगबगीने
खाली बागेत येऊन खोलले..
 
सरळसोट अक्षरे ती
माझ्या डोळ्याभोवती फिरू लागली
गद्य पद्याची भव्य मालिका 
थयथया नाच करू लागली

सपासप मग मी पाने उलटली
अर्ध्या पुस्तकाची पाने पालटली
अन मग दिसले चित्र माकडाचे
इवलेसे गोंडस अवघ्या दोन फुटांचे

डोळे  वटारून बघत होते माझ्याकडे
माझे लक्ष त्याच्या वाकड्या शेपटीकडे 
त्याची शेपटी बघूनी मला मात्र हसू सुटले
आवाजाने त्या माझे भिंग मात्र फुटले

ताई आली मग रागाने
तिच्या गालाची  लाल लाल बुंदी झाली
मी धूम ठोकली तिथून
माझी पळता भुई थोडी झाली
✍️पुनम देविदासराव कुलकर्णी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile