Nojoto: Largest Storytelling Platform
purvakhanolkar1852
  • 10Stories
  • 9Followers
  • 23Love
    0Views

मुक्तगंधा

animal lover

  • Popular
  • Latest
  • Video
7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

एक तो असाही असावा 

रात्री अपरात्री एकटाच रडणारा 
तरीही प्रत्येक दिवस नव्याने  जगणारा 

संकटातही हसत मुख असणारा 
आणि दुखालाही सतत हसवणारा 
                              एक तो असाही असावा 
. 
छोट्या छोट्या सुखात हरवून जाणारा 
मित्रांसाठी आयुष्यभर तत्पर राहणारा 

स्वतःच्याच आयुष्यात रमणारा 
तरीही सर्वांना समजून घेणारा 
                            एक तो असाही असावा 

सगळ्यांच्या सुखासाठी आयुष्यभर झटणारा 
तरीही सर्व मूकपणे सोसणारा 

कधी शांतपणे वाहणाऱ्या  नदीसारखा 
तर कधी गहिऱ्या समुद्रासारखा भासणारा 
                                     एक तो असाही असावा

3 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

तुझी चाहूल 

हवियस गं मला तू बाळी 
पडू नाही द्यायचीय तुझ्यावर सावळी काळी 
छकुले आईला नको गं वंशाचा दिवा 
उमलण्यापूर्वीच लोक करणार गं तुझं मेवा 

खरं सांगू तुला? 
राग येतो जगाचा या मला 
मुली जगवा नारे देतात 
त्याच मुलींचा हे बळी घेतात 

आम्ही वावरतो नावाच्या स्वातंत्र्यात 
अजूनही आहोत आम्ही पुरुषांच्या राज्यात 
जिथे मिळत नाही आम्हाला मान 
करावं लागतं अहोरात्र काम 

इच्छांना घालावी लागते मुरड
कामा पुढे मिळत नाही आम्हाला सवड 
म्हणून म्हणते बाळी नको असलं जगणं 
गुलामा सारखं जगण्या पेक्षा परवडलं मरण

3 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

World Poetry Day 21 March तुझ्यासवे घालवलेले ते प्रत्येक क्षण 
उमटले मनाच्या पुस्तकावर 
तुझ्या आठवणीने ओथंबला हृदयाचा प्रत्येक  कण 
नकळत तुझे नाव आले ओठांवर

2 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

माझ्या हृदयाच्या काचेवर 
उमटले तुझ्या अस्तित्वाचे ठसे 

माझ्या डोळ्यांच्या नदीवर 
तुझेच प्रतिबिंब असे 

नकळत तुझे नाव आले ओठांवर 
तर डोळ्यात माझ्या पाणी कसे? 

माझ्या आयुष्यात आज वर 
तूच तू नव्याने भासे

3 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

शब्द तुझा प्रत्येक झेलायचाय मला 
अखेर श्वासापर्यंत तुझीच साथ हवीय मला 
अनुभवायचंय अस्तित्व आपल्या सोबतीने मला 
जगायचं होऊन तुझी,  तुझ्यात सामावून घेशील का मला???  
                                         -मुक्तगंधा 🦋

3 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

खेळ मांडला खेळ मांडला 
आमच्या अस्तित्वाचा गं खेळ मांडला
 
खेळ मांडला खेळ मांडला 
प्रतिमेचा गं आमच्या खेळ मांडला

खेळ मांडला खेळ मांडला 
स्वातंत्र्याचा गं आमच्या खेळ मांडला 

खेळ मांडला गं खेळ मांडला 
आमच्या अस्मितेचा गं खेळ मांडला 

खेळ मांडला गं खेळ मांडला 
अब्रूचा गं आमच्या बाजार मांडला 

खेळ मांडला खेळ मांडला 
शरीराचा गं आमच्या खेळ मांडला

0 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

तुझ्या सवे आसमंत दिसे 
तुझ्या सवे आनंद हसे 
तुझ्यातच मला मी भासे 
माझ्यात तू तुझ्यात मी असे
                     -मुक्तगंधा🦋

2 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

तुझ्या वाचून दिस माझे सरले 
तुझ्या आठवणीत दिस रात रमले 
तुझ्यातच आता मी हरवले 
तुझ्या सवे मी फुलत गेले 
                -मुक्तगंधा🦋

3 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

देवा मजला तू तार 
मझ्या प्रत्येक चुकीला तू मार 
माणुसकीचा घेतला मी वसा 
इतरांसारखा अर्धाच तो टाकू कसा 
केलाय मी तुझ्यासोबत करार तसा 
                  -मूक्तगंधा 🦋

2 Love

7fe3b0c7d91e61bda29c3c050a95b4d9

मुक्तगंधा

विचारांच्या गर्दीत मी हरवले 
रूढींनी या मला फरफटत नेले 
माझी मीच ना आता उरले 
माझे अस्तित्वच कुठे हरवून गेले

2 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile