Nojoto: Largest Storytelling Platform
revatimehendale9169
  • 43Stories
  • 2Followers
  • 330Love
    0Views

Revati Mehendale

  • Popular
  • Latest
  • Video
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

गुरु चा कुंभ राशीत प्रवेश

©Revati Mehendale #moonlight

10 Love

87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

प्रिय अभिराम.....................
आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जन्मदिवस =आयुष्यातील हा एकच दिवस ज्या दिवशी  मुलाच्या रडण्याने आई - वडिल हसतात.पुन्हा असा दिवस कधीही न येता तिथून पुढे मुलाच्या हसण्याने तेही हसतात.खात्री आहे कि आम्हां सर्वांना हसवतच ठेवशील.खूप मोठा हो.उद्याचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार.असाच प्रत्येक वाढदिवस कुटुंबाबरोबर समाजालाही आनंद देणारा ठरो.उत्तम निरोगी दिर्घायुष्य,सद्बुध्दी लाभो हि परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना #Flower

11 Love

87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " Z " हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ Z ]
या व्यक्ती सोशिक,चिकाटी असलेल्या,मेहनती,खंबीर,अव्यक्त असतात.जीवनात संघर्ष ,संकटांना तोंड द्यावे लागते.मानसिक त्रास सहन करावा लागतो.प्रत्येक गोष्ट विलंबाने होताना दिसते.अव्यक्त स्वभावामुळे इतरांच्या मनात गैरसमज निर्माण होतात.दुःख ,कष्ट,अपमान सहन करावे लागतात.या व्यक्तींमध्ये सेवावृत्ती दिसून येते.आपल्या  इच्छित ध्येयासाठी खूप झटतात.

S S J

|| शुभं भवतु || #cousinsday
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " Y " हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ Y ]
या व्यक्ती शांत,द्विधा मनःस्थिती असलेल्या,सोशिक असतात.कौटुंबिक व वैवाहिक सुखात अडचणी असतात त्यामुळे अपेक्षित सुख मिळत नाही.जागतिक घडामोडी जाणून घेणे आवडते.समाज कार्य,प्रसार माध्यमं याच्याशी संबंध येतो.प्रवासाचे योग येतात.यांच्याकडे अंतःस्फुर्ती असल्यामुळे पुढे घडणाऱ्या घटनांचा आधी अंदाज येतो. आध्यात्म,दानधर्म याची आवड असते.काहीवेळा काम विलंबाने होताना दिसतात.लेखन,वाचन,कविता करणे,अभिनय याची आवड असते.बहुतांशी वेळा मागील पिढ्यांचे दोष येतात.स्वकर्तृत्वाने मोठे होणे आवडते.यांच्या व्यक्तीमत्वाचा इतरांवर प्रभाव पडतो.काही व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी यांचा उपयोग करुन घेतात.

S S J #SilentWaves
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " X " हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ X ]
यांचे व्यक्तीमत्व आकर्षित करणारे असते.सतत निराश,कसल्या तरी चिंतेत असतात.तब्बेतीच्या तक्रारी आसतात.कौटुंबिक अडचणी असतात. यांच्यावर मोठ्या जबाबदा-या येतात.अपेक्षित वैवाहिक सुख मिळत नाही .

S S J #MoonHiding
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " W " हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ W ]
या व्यक्ती अस्थिर,धाडसी,खंबीर,सडेतोड बोलणा-या असतात. गती आवडते.बोलण्यात ,वागण्यात,चालण्यात गतिमान असतात.वाद्यांची आवड असते.शंकेखोर असतात.प्रवासाचे योग येतात.अर्धवट श्रध्दा असते.दळणवळण साधनांशी जास्त संबंध येतो.चिडखोर स्वभावामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते.या व्यक्ती  व्यवसायापेक्षा नोकरी करणे पसंत करतात.मातुल घराण्याकडे ओढा आसतो.

S S J #Waterfall&Stars

10 Love

87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " V " हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ V ]
या व्यक्ती अस्थिर,बुध्दी चातुर्य असलेल्या,शंकेखोर,लहरी असतात.जीवनात कष्ट घ्यावे लागतात.लहान वयात जबाबदाऱ्या येतात.राजकारण,सरकार ,सामाजिक गोष्टी याच्याशी संबंध येतो आणि यशस्वी होतात.कौटुंबिक वातावरण तडजोडीचे असते.स्वभाव शांत दिसला तरी प्रसंगी राग अनुभवास येतो.भावनिकता असतात.थोड्याशा अपयशाने खचून जातात परंतु तसे दाखवत नाहीत. काही कारणांमुळे आई-वडिलांचे अपेक्षित सुख मिळत नाही.शिक्षणात अडथळे येतात.राहत्या वास्तुमध्ये दोष असण्याची शक्यता असते.

S S J #Hope

8 Love

87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील "U" हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ U ]
या व्यक्ती हातच राखून ठेवणा-या,चिडखोर,थोड्या मितभाषी,असमाधानी,स्वाभिमानी,हुकुमशाह  असतात.आध्यात्माची आवड असते.आपण म्हणतो ते बरोबर असे त्यांचे मत असते.स्वतःला वेगळ समजणा-या असतात.अचानक अनपेक्षित  लाभ होतात. दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवणे आवडते परंतु या व्यक्तींना दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली रहाणे खपत नाही.घरापासून लांब रहाणे फारसे आवडत नाही.धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग येतात.यांचे विचार,मनातील कल्पना सत्यात उतरत नाहीत त्यामुळे मानसिक त्रास होतो.ब-यापैकी राजासारखे आयुष्य जगतात.

S S J #citysunset
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील "T" हे आद्याक्षर असणाऱ्या व्यक्तींची  थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ T ]
या व्यक्ती शांत,बोलक्या,प्रेमळ,थोड्याशा हट्टी,भावनिक,चंचल,कलाप्रिय आणि आत्मकेंद्री असतात.आपल्या गोड बोलण्याने दुसऱ्याला आपलस करुन घेतात.त्यामुळे गोड बोलून आपल काम करुन घेण्यात हुशार असतात.मित्र परिवार मोठा असतो.घरापेक्षा बाहेर जास्त रमतात असे असले तरी घर,आई याविषयी विशेष ओढ असते.संवेदनशील असल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो.प्रेमविवाहाची/ओळखीतून विवाहाची शक्यता असते.आयुर्वेद,लेखन,अभिनय,प्रवास याची आवड असते.पोटाचे विकार असण्याची शक्यता असते.आपले विचार,योजना कार्यवाहीत आणण्यात ब-याचवेळा असमर्थ ठरतात.

S S J #StarsthroughTree
87188332c96a4e7701938e6f9356700b

Revati Mehendale

आज आपण नावातील " S " हे  आद्याक्षर  असणाऱ्या  व्यक्तींची थोडक्यात स्वभाव वैशिष्ट्ये पाहू
[ S ]
या व्यक्ती हट्टी,रागीट,महत्त्वाकांक्षी,स्वाभिमानी असतात.ज्या क्षेत्रात जातात त्या ठिकाणी  आपले स्थान निर्माण करतात.वेगवेगळ्या कलांची आवड असते.राजकारण,अधिकारी व्यक्ती ,उच्च पदस्थ व्यक्ती यांच्याशी संबंध येतो.नेतृत्व,नीटनेटके नियोजन आवडते.उच्च स्वप्न पहातात आणि पूर्ततेसाठी झटतात ,कष्ट घेतात.समाजकार्याची आवड असते. या व्यक्तींकडे आदराने पाहिले जाते.काहीवेळा यांचा विश्वासघात होतो.बरेच वेळा कुटुंबाची जबाबदारी या व्यक्तींवर येते.आपले दुःख लपवून हस-या चेहऱ्याने वावरतात. 

S S J #DawnSun

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile