Nojoto: Largest Storytelling Platform
arunmundhe4205
  • 5Stories
  • 13Followers
  • 20Love
    0Views

Arun Mundhe

  • Popular
  • Latest
  • Video
87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

चार भिंतींच्या घर माझ
डोळ्यांसमोर गेलं वाहून
पुन्हा एकदा सुखी संसाराच सपान
बघ गेलं अर्धच राहून

आभाळ ते फाटलं
पाणी आलंय दाराशी 
दोन तान्ही लेकरं माझी 
कवटाळून बसलोय उराशी 

भुकेलेली लेकरं माझी
कशी भागवु त्यांची भूक
दावणीलाच माझा सर्जा गेला
सांग, यात त्याची काय चुक

कष्टाचं काय होत नव्हत 
सार काही घेऊन गेलास तु
निसर्गा..पण माझी जिद्द मात्र
मज जवळ ठेऊन गेलास तु

शेतकऱ्याची औलाद हाय
पुन्हा जिद्दीनं कामास लागेन मी 
छत्रपतींचा मावळा म्हणुनी
त्या नावास जागेन मी...

3 Love

87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

नजरेशी नजर मिळता
ना उरते मला भान 
तुझ्या नजरेच्या खेळाला
असावे जरा प्रमाण

बेरंगी जीव माझा 
तुझ्या चांदण्यात रंगला 
प्रकाश तुझ्या चांदण्याचा 
मी माझ्या अंगणात पहिला

प्रभात समयी नयनांनी
तुला असे पाहायचे 
माझ्या सोबत निसर्गाने 
नव्याने पुन्हा खुलायचे

5 Love

87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

शिशिरामधल्या थंडीचा 
मंद गुलाबी वारा तू 
श्रावणात बरसणाऱ्या 
त्या पावसाच्या धारा तू 

खुल्या नभिच्या चांदण्यातला 
लकलकणारा तारा तू ..
थंड हवेच्या लाटेचा 
अंगावरचा शहारा तू ..

खळखळणारा झरा तू
चांचलतेचा वारा तू 
लाट धावते ज्या साठी 
असा तो शांत किनारा तू ...

3 Love

87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

जीव तुझ्यात जडला
मन गुंतून गेले,
तुझ वर प्रेम जडले
मी माझी न राहिले,
तुझीच स्वप्न ...
तुझीच आस.....
तूच ध्यास....
अन् तूच श्वास.... ती

ती

5 Love

87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

तु....

तु....

30 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile