Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4489089847
  • 332Stories
  • 197Followers
  • 2.9KLove
    52.2KViews

राजेंद्रभोसले

English lecturer

  • Popular
  • Latest
  • Video
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

तिसऱ्या दिनी  चंद्र घंटा पूजा
पांढरा रंग शुद्धतेच्या  राजा
सात्विकता भरल्या मातीच्या घटा
अंकुरले धान झाल्या मोकळ्या वाटाl3ll

कुष्मांडाची पूजा ब्रह्मांडिय शक्ती
उत्साहअन प्रेमाची मातेची भक्ती
लाल-लालरंगात दिव्यता मोठी
दीन-दुबळ्याच्या माताराणी पाठीll4ll .।क्रमशः...
 
कवी-राजेंद्रकुमार भोसले
9325584845 #पांढरालाल
#navratri2020
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

#व्यथाविद्यार्थ्यांची
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

शाळा सुरू केव्हा   होणार हो बाबा
महामारीने  घेतला शाळेवर ताबा ll धृ ll

शाळेला  जाण्याची नाही आता घाई
कोंडुन  अभ्यास  जमत नाहीआई  
 ऑनलाईन शिक्षणा ने बनलाय ढाबा ll1ll

रेंज अभावें आवाज थोकडा1 येई
सूचनांचे भेंडुल सारखेच बाई
खोखो  कसा खेळू बिना डांबा ll2ll
 
कधी हा वनवास   निघून जाई
गुरुजींच्या  चालीची कविता गाई
कोरोनाचा केव्हा होईल थांबा ll3ll

कवी-राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
संगीत विशारद
9325584845 #कोरूनचाथांबा

#navratri2020
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

नवविद्या भक्तीचा जागर , करू अंबेचा जागर
माता मायेचा सागर , दिव्य-शक्तीचे आगरllधृ ll

पहिल्या दिवशी घट स्थापिले
मातीचे पूजन केले
 पोत पाहण्या बीज पेरले
उपवास ही धरिलेll1ll

दुसऱ्या दिवशी भगवे नेसले
घाटा मध्ये पाणी ओतले
भक्ति -भावे पूजन केले
सौभाग्याचे लेणे लेलेll2ll
क्रमशः..।
कवी -राजेंद्रभोसले
9325584845 #नवरात्र

#navratri2020
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

तोंड बांकधून जेवायचे कसे
आत्मनिर्भर बनायचे आहे

शाळा बंद शिकायचे कसे
आत्मनिर्भय बनायचे आहे 

मोबाईलबिनाशिकायच कसे
आत्मनिर्भरबनायचे आहे

कोरोनाने जगायचे कसे
आत्मनिर्भर बनायचे आहे

भावकी संबंध राखायचे कसे
आत्मनिर्भय बनायचे आहे

लग्न गाठी बांधायच्या कसे
आत्मनिर्भर बनायचे आहे

मनोरंजन करायचे कसे 
आत्मनिर्भय बनायचे आहे

कलाकराची चूल पेटवायची कसे
आत्मनिर्भय बनायचे आहे

गोळ्यांनाहींत तर  लढायचे कसे
आत्मनिर्भय मात्र बनायचे 

आरक्षण बिना जगायचे कसे
आत्मनिर्भय बनायचे आहे।... #आत्मनिर्भय

#apjabdulkalam
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

अनोळखी प्रदेशात जाताना
पुस्तकांच्या जगातुन येताना

भारलेली अग्निस्वप्ने बघताना
उरलेली माणुसकी भोगताना

विकासाचा डोंगर पोखरताना
मस्तवाल डांगर उधळताना

यशाची गुरूशिखरे चढताना
भावनांना पायी तुडवताना

करुणेचा सागर पाहताना
मायेचा ओलावा भेटताना

शौर्याचा मेरू कोसळताना
अश्रू भक्तीकुंडात बुडताना

जादूच्या जगात फिरतांना
कर्तृत्वचे सुख चाखताना

अनुभव संपत्ती मोजताना
मनावरचे घाव सोसताना

भ्रष्टतेचे इंगळेभाजताना
सत्तेचा मुकुट असताना

कवी - राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.नं.9325584845 #वाचनाचेमहत्व

#apjabdulkalam
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

ह्या अनोळखी वाटेला अंधाराची साथ आहे
दाटलेल्या हुंदक्याला आसवांच नात आहे 

विस्कटलेल्या संसारा  नशिबाची वाट आहे
बिघडलेल्या नात्यांना माणुसकीचा घाट आहे

  समुद्रमंथनातून आता  विष  जरी येत आहे
अमृताची वाट आता मी आता पाहत आहे

सबुरीचा दान आता  विश्वात गुंजत आहे
निसर्गआक्रोश आता शांत- शांत होत आहे

कवी राजेंद्रभोसले
9325584845 #प्रतीक्षा
#WatchingSunset
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

सत्याच्या वाटा


 तो उगवेल पुन्हा सत्याचा प्रकाश 
असत्याच्या वाटा जरी अंधारल्या

हरवलेला श्वास  करील विकास
तिमिरच्या गर्भातुंन उजडण्याला

राहूदे ध्यास न्यायाचा सहवास
 अंतरीच्या सुखा भोगण्याला

 असुदे विश्वास जरीदाटले आकाश
आयुष्याचे युद्ध जिंकण्याला

कवी राजेंद्रभोसले
9325584845 #सत्याच्यावाटा

#WatchingSunset
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

अस्तित्वाचा लढा
विचारांचा काढा

ममतेचा सागर
कृपेचा आगर

नम्रतेचा घडा
सत्याचा धडा

निसर्गाचा भक्त
सळसळते रक्त

कर्मयोगी वक्ता
सत्याचा भोक्ता

  शक्तीचा  साठा
शांतीच्या वाटा
 
 मामा असे  होते माझे
माझ्या हृदयीचे राजे

कवी राजेंद्रकुमार भोसले
9325584845 #माझेगुरू

#HopeMessage
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

माझेमामा ,माझे गुरूम्हणजे  मंतरलेले शब्द
सहज काळजाला भिडणारे मार्मिक शब्द 
कपडे चुरगळलेले घातले तरी चालतील ;पण अभ्यासाची व वाचनाची घडी कधीही मोडू नये हा त्यांच्या अट्टहास 
मामांचा वाचनाचा व्यासंग दांडगा होता 
घर म्हणजे पुस्तकाचे आगर 
कायम दुर्मिळ व अत्यंत गरजेची .चांगल्या लेखकाची
पुस्तके विकत आणायचे त्यावर विशेष ओळीला खूण करून ठेवणे .इतिहासाची शहानिशा करणे
सत्य शोधणे, अनेक इतिहासाचार्य त्यांच्या पुढे बोलताना धडकी भरायची .ऐतिहासिक पुरावे गोळा करणे.जातीच्या इतिहासाची कुचंबणाअवहेलना दूर करून जातीचा  राजकीय इतिहास त्यांची सामाजिक 
अवहेलना,एवढंच काय त्यांच्या दशा सांगितल्या नाहीत तर बौद्धिक दिशा देण्याचे काम केले अनेक लेखन व भाषण झाली त्यातून कर्मठ जातीवादी  अहं भाव टाकून
त्यांना शरण यायचा याला मी साक्षीदार आहे त्यांची पत्र आजही दिशादर्शक व  पुढल्या पिढीला उपकारक आहेत.आयुष्यभर दुसऱ्यांच्या विचार करत  नवीन पुढारी ,वक्ता, व समाज हितचिंतक तयार करण्यासाठी
पुस्तके ,व्याख्यान, लेखन व अर्थ साहाय्य केले.कधीही गावाचा  दिव्यइतिहास  विसरले नाहीत.आंबेडकर, फुले शाहू यांच्या विचाराच्या प्रेरणेने स्वतः सिंहासारखे जंगले
  योगाचार्य,आकुप्रेशर तज्ञ.रेकी ,विपश्यना pictography, अध्यात्म , अनेक निसर्गोपचार
त्यामुळे अनेक दुर्मिळ व्याधी अनेकांच्या केवळ स्पर्शाने दूर झाल्या .सर्व कुटुंबातील सदस्यांवर निस्वार्थी प्रेम करणारे 
सर्व नात्यातील युवकांचे हृदयस्थान असणारे काका उर्फमाझे गुरू यांना शाब्दिक श्रद्धांजली,,💐
त्यांच्या बद्दल शब्दात सांगणे म्हणजे टिटीवीन समुद्र आटवण्यासारखे आहे,.
 .राजाभाऊ
9325584845 #भावपूर्णश्रद्धांजली

#worldpostday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile