Nojoto: Largest Storytelling Platform
nishakharat2017
  • 637Stories
  • 1.6KFollowers
  • 7.8KLove
    3.4LacViews

nisha Kharatshinde

✍️काव्यनिश

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

धनगराची जात माझी

धनगराची जात माझी
गाव माझं कोकणात
माय माझी धरती ही
बाप माझा जेजुरीत
        
श्यात माझं पिकलेलं
हवेमंधी डुलतं हे
भात पिक वरसभर
पाॅट भरी त्यावर हे
         
गाय,म्हैस,आणि बैल 
इस्टेट तिच माझी एक
शेळी-मेंढरं,कोंबड्या
ही पोरं माझी अनेक
           
कोकणात गाव माझं
घर-पुणे मुंबईत
चाकरमानी म्हणत्यात
रोजगार हॉटेलात
             
एका धाग्यात विणलेली
धनगाराची जात माझी
प्रेम-मायेचा डोंगर तो
ती वाडी माझी धनगराची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde धनगराची जात माझी

धनगराची जात माझी #Poetry

12 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

सोनचाफा

सोनचाफा मी तुझ्या अंगणातील
रोज पाहून तुला दरवळतो
सायंकाळी प्रभात समयी
तुझ्याच प्रतिक्षेत झुरतो

केसात तुझ्या मी मळतो कधीतर
नाहीतर श्र्वासात एकरुप होतो
वेडावून मग धुंदीत प्रिये
मनोमनी स्वर्गमयी होतो

मंदप्रकाशात चांदण्यांसगे
तुझ्याच विषयी गुणगुणतो
तु नसतानाही भास तुझाच 
मी माझा कधीच नसतो

तुझ्याच कवीतेत तुझ्याच शब्दात
मी जेव्हा जेव्हा सजतो
कमी दिवसांचे आयुष्य माझे
मनी शंभर वर्षे जगतो

सोनचाफा मी तुझ्या अंगणातील
रोज पाहून तुला दरवळतो
सायंकाळी प्रभात समयी
सखे‌ तुझ्याच प्रतिक्षेत झुरतो

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सोनचाफा

सोनचाफा #Poetry

16 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

तू ब्रह्मध्वज,विजय,आनंदाचे 
कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते
काव्यनिश होऊन जरी दरवळले मी
लपेटून चाफा तूज शृंगार खुलते
रजनी जरी मी दुःख लपेटून
तू आशा मज सकाळ नटून
निश जरी मी सामावून घेते
तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde ब्रह्मध्वज

ब्रह्मध्वज #Poetry

16 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

तू ब्रह्मध्वज ,विजय,आनंदाचे 
कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते
काव्यनिश होऊन जरी दरवळले मी
लपेटून चाफा तूज शृंगार खुलते
रजनी जरी मी दुःख लपेटून
तू आशा मज सकाळ नटून
निश जरी मी सामावून घेते
तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  ब्रह्मध्वज

ब्रह्मध्वज #Poetry

126 Views

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

अलोर्यातील होळी

काय सांगू गम्मत तेव्हा
आमच्या लहानग्यांच्या होळीची
शेणी,शिवरी,लाकूड अन् जागा
आठवड्याआधीच शोधायची

वर्गणीसाठी वही घालून
मंडळी झाडाखाली बसायची
कधी काकांकडून कधी काकूंकडून
वर्गणी दोनदा मागायची

फुगे,नारळ,चिरमुरे,पताका
लिस्ट मोठी असायची 
कधी सुटते शाळा एकदा
घाई होळीभोवती भेटायची

वर्गणी गोळा करत करत
दिवस उजडायचा होळीचा
ढोल..ताशा..वाजवत आम्ही
आई तयार नेवैद्य घेऊन पोळीचा

पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून
बोंबा होळीभोवती मारायचो
चुकलं माकलं गार्हाने घालून
माफीचा नारळही फोडायचो

✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश)

©nisha Kharatshinde अलोरयातील होळी

अलोरयातील होळी #Poetry

15 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

महिला दिनाच्या शुभेच्छा 💐
 दुर्गा देवी (परिचारिका)

सिंहारुढ अष्टभुजा ‌शैलपुत्री
पुराणात कथले माहात्म्य तुझे
आदिमाया तू या विश्वाची
नवमं सिद्धीदां नाम दुर्गा तुझे
              
वस्त्राचेही किट बनवूनी
मुकुटाचे तू शील्ड करुनी
प्रोब,स्टेथोस्कोप हाती
सेवेचे काम्य व्रत लेवूनी
               
असंख्य शक्तींचे शक्तरुप तू
कधी सौम्य उग्र हे रुप तुझे
सहस्त्र हाती घेऊनी यंत्रणा
दहावे परिचारिकेचे रुप तुझे
                 
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde दुर्गा देवी

दुर्गा देवी #Poetry

14 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

समजावे कधीतरी
 शब्दांनी मलाही
रिक्त या ओंजळीत 
येऊन पुसावे मलाही

मी रिक्त जरीही
थोडं स्पर्शून मलाही
जवळी कधीतरी
घ्यावे मलाही

✍🏻काव्यनिश

©nisha Kharatshinde
  समजावे‌‌ कधीतरी....

समजावे‌‌ कधीतरी.... #Poetry

6,390 Views

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

माझी मराठी

अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला ‌कधी माणसाला
मना स्पर्शते  तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde माझी मराठी

माझी मराठी #Poetry

14 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

आयुष्य एक अमावस्या

कुस्करले ते आयुष्य व्यर्थ
ग्रहणमयी चंद्रासंगे
हसूनी तारका तरीही दर्शवी
खूश आम्ही स्वर्गामध्ये

सहनशक्तीशील अर्धांगिनी ती
पिलांसाठी उभी ढाल धरुन
सरले आयुष्य लढता लढता
चेहर्यावरती समाधान दर्शवून

तरुणच राहिलेले ह्दय आशेने
कुरवाळत शब्दांस होते
'आयुष्य एक अमावस्या' कथा
लिहतानाच व्यक्त होत होते

चारोळीतून निशब्द भावना
जगत होत्या आयुष्य नवे
लढली रणांगणात मैदानी
घेऊनी पिल्लांना कवे

✍️ निशा खरात/शिंदे

©nisha Kharatshinde आयुष्य एक अमावस्या

आयुष्य एक अमावस्या #Poetry

12 Love

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

काल...आज

मी कालच्या वर्षाचा
अभ्यास आज केला
काही तासांमागील क्षण
पाहताच गतवर्षात गेला

आठवणी गतवर्षाच्या ‌
भेटीस नववर्षात आल्या
ते महिने,दिवस अन् तास
ओळखीस अबोल झाल्या

सुरुवात म्हणू की शेवट??
काल...आज नी प्रश्न केला
पहा भूगोल अन् इतिहास
कालचक्र म्हणतात याला

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde #Newyear2024 काल...आज

#Newyear2024 काल...आज #Poetry

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile