Govinda Polad

Govinda Polad Lives in Wardha, Maharashtra, India

Engineer , Speaker , Writer , poet

www.govinda@dosti.com

 • Popular Stories
 • Latest Stories

"हट्टखोर जिंदगीचे हट्टखोर मिजास आता देहात प्राण असल्याचे नुसतेच भास आता आधीच रोखलास तू मायेचा श्वास त्यांचा चिमुकल्या जीवाला किती देशील त्रास आता मी अबोल असतो म्हणून तुझे आवाज मोठे विचार परिणामाचे मज तासंतास आता काय मी करू देवा तूच रे सांगना किती पाडशील भेगा काळजास आता - गोविंद अ. पोलाड"

हट्टखोर जिंदगीचे हट्टखोर मिजास आता
देहात प्राण असल्याचे नुसतेच भास आता

आधीच रोखलास तू मायेचा श्वास त्यांचा 
चिमुकल्या जीवाला किती देशील त्रास आता

मी अबोल असतो म्हणून तुझे आवाज मोठे
विचार परिणामाचे मज तासंतास आता

काय मी करू देवा तूच रे सांगना 
किती पाडशील भेगा काळजास आता

- गोविंद अ. पोलाड

 

25 Love
1 Share

"इथे आता कुणाचे काही निशान उरले नाही जिथे राख झाले सगळे ते स्मशान उरले नाही उगाच कसला चौफेरी तू देव शोधतो आहे तू रोज पूजतो ज्याला तेही पाशान उरले नाही मग कशाला आकाशाशी तू बेस्वप्न भिडतो आहे त्यालाच पाऊस मागणारे इथे किसान उरले नाही तुझ्या दिलाला आता धीर तूच द्यायचा आहे कठीण झाले सगळे काही आसान उरले नाही माय पित्यालाच आता इथे वृद्धाश्रम मिळतो आहे घे समजून कुणाचे कुणावर ऐहसान उरले नाही - गोविंद अनिल पोलाड"

इथे आता कुणाचे काही निशान उरले नाही 
 जिथे राख झाले सगळे ते स्मशान उरले नाही

 उगाच कसला चौफेरी तू देव शोधतो आहे
 तू रोज पूजतो ज्याला तेही पाशान उरले नाही

 मग कशाला आकाशाशी तू बेस्वप्न भिडतो आहे
 त्यालाच पाऊस मागणारे इथे किसान उरले नाही

 तुझ्या दिलाला आता धीर तूच द्यायचा आहे
 कठीण झाले सगळे काही आसान उरले नाही

 माय पित्यालाच आता इथे वृद्धाश्रम मिळतो आहे
घे समजून कुणाचे कुणावर ऐहसान उरले नाही      


-  गोविंद अनिल पोलाड

 

19 Love

"घ्या सांजवुनी सारे आरोपी महाल आता हा आशिक बेजूबानी बहाल होत आहे विल्हेवाट अश्रूंची डोळ्यास लावण्या सांगा तिच्या आठवणींचा आता भूजाल येत आहे मग मी कुणाला कधी भेटणार नाही स्थिती सदर दिलाची बेहाल होत आहे भेटन्यास या जीवाला सगळेच येऊन गेले पण तीच आली नाही किती कमाल होत आहे कहानी दर्द-ए-दिलाची गालिब सांगत होता बदनाम दस्तुर जिंदगीचा फिलहाल होत आहे - गोविंद अनिल पोलाड ( विद्रोही कवी विचारमंच )"

घ्या सांजवुनी सारे आरोपी महाल आता
हा आशिक बेजूबानी बहाल होत आहे 

विल्हेवाट अश्रूंची डोळ्यास लावण्या सांगा
तिच्या आठवणींचा आता भूजाल येत आहे

मग मी कुणाला कधी भेटणार नाही 
स्थिती सदर दिलाची बेहाल होत आहे

भेटन्यास या जीवाला सगळेच येऊन गेले 
पण तीच आली नाही किती कमाल होत आहे

कहानी दर्द-ए-दिलाची गालिब सांगत होता 
बदनाम दस्तुर जिंदगीचा फिलहाल होत आहे 


        - गोविंद अनिल पोलाड 
        ( विद्रोही कवी विचारमंच )

 

18 Love
2 Share

"गद्दार तुझ्या भावना खुद्दार माझे प्रेम झाले आकांत भिनसला कवितेला अन हद्दपार माझे शब्द झाले आधार तुझ्या आठवणी निराधार तुझे वादे झाले काळजातले तिर सगळे वेदनेचे शहझादे झाले व्यापार तुझे उगी लाजने विकार तुझे भास झाले धोकेल तुझ्यावानी सगळे जगण्याचे आता श्वास झाले हत्यार तुझे गाल ग हसणे तुझे वार झाले गहिवरनारे अश्रू आता डोळ्यांतुन तडीपार झाले - गोविंद अनिल पोलाड ( विद्रोही कवी विचारमंच )"

गद्दार तुझ्या भावना 
खुद्दार माझे प्रेम झाले
आकांत भिनसला कवितेला 
अन हद्दपार माझे शब्द झाले

आधार तुझ्या आठवणी
निराधार तुझे वादे झाले 
काळजातले तिर सगळे
वेदनेचे शहझादे झाले

व्यापार तुझे उगी लाजने 
विकार तुझे भास झाले 
धोकेल तुझ्यावानी सगळे
जगण्याचे आता श्वास झाले

हत्यार तुझे गाल ग
हसणे तुझे वार झाले
गहिवरनारे अश्रू आता 
डोळ्यांतुन तडीपार झाले

         - गोविंद अनिल पोलाड
         ( विद्रोही कवी विचारमंच )

 

18 Love
1 Share

"दिल दर्या सागर नाही कविता माझी बाजार नाही अख्खा इतिहास-वर्तमान खेचते पण लिहिताना बेजार नाही"

दिल दर्या सागर नाही
 कविता माझी बाजार नाही
 अख्खा इतिहास-वर्तमान खेचते 
 पण लिहिताना बेजार नाही

 

17 Love
1 Share