अबोल प्रेम

अबोल प्रेम

  • Popular Stories
  • Latest Stories

"ती माझ्या उशाशी बसली... आपली लांबसडक बोटं माझ्या केसातून फिरवीत.. तिचा स्पर्श माझ्या हृदयात निनादला.. मी तिच्याकडं बघितलं... आणि शरीराचे बांध फोडून... माझी व्यथा अश्रुंतून डोळ्यात दाटली... माझं स्वप्न भंगले! मी उठून बसलो... खिडकीतून बाहेर बघितलं... आकाशगंगा दिसली... जणू सगळ्या शांततेला चिरत चिरत निघाली होती आणि मला उगीचच वाटलं... तुला देखील असच स्वप्न पडलं असेल का.. ! © रवींद्रनाथ टागोर"

ती माझ्या उशाशी बसली...
आपली लांबसडक बोटं माझ्या केसातून फिरवीत..
तिचा स्पर्श माझ्या हृदयात निनादला..
मी तिच्याकडं बघितलं...
आणि शरीराचे बांध फोडून...
माझी व्यथा अश्रुंतून डोळ्यात दाटली...
माझं स्वप्न भंगले!
मी उठून बसलो...
खिडकीतून बाहेर बघितलं...
आकाशगंगा दिसली...
जणू सगळ्या शांततेला चिरत चिरत निघाली होती
आणि मला उगीचच वाटलं...
तुला देखील असच स्वप्न पडलं असेल का.. !

© रवींद्रनाथ टागोर

#प्रेम_कविता

8 Love

"आज तू नाहीस म्हणून... मला जाता येत नाही... आपलं घर सोडून... तू गेलीस तशी... म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही... पण मला थांबायला हवं... तुला भेटायला च हवं... कारण तुला सांगायला हवं... तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे.. दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण... कदाचित... तू तुझी रमली असशील... देव करो सुखात असशील... माझी आठवण ही काढत नसशील... पण सारे दिवस सारखे नसतात... कधी आठवणींच वादळ येतं... मनाचं तळ घुसळवून जातं... तसंच काही तुझ्यासोबत होईल... कदाचित तुला माझी आठवण येईल... म्हणून तू मला शोधत येशील ... पण एखादीच हाक देशील... माझी साद आली नाही... तर लगेच माघारी निघून जाशील... तू माझी वाट बघत थांबणार नाहीस... कारण तुला ते कधीच जमणार नाही... हे असं मात्र व्हायला नको... अबोलच मरण यायला नको... म्हणून मला थांबायलाच हवं... तुझी वाट पाहायलाच हवं... यात किती काळ जाईल कुणास ठाऊक... #अबोल_प्रेम @कृष्णार्णव"

आज तू नाहीस म्हणून...
मला जाता येत नाही... आपलं घर सोडून...
तू गेलीस तशी...
म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही...

पण मला थांबायला हवं...
तुला भेटायला च हवं...
कारण तुला सांगायला हवं...
तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे..
दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण...

कदाचित... तू तुझी रमली असशील...
देव करो सुखात असशील...
माझी आठवण ही काढत नसशील...
पण सारे दिवस सारखे नसतात...

कधी आठवणींच वादळ येतं...
मनाचं तळ घुसळवून जातं...
तसंच काही तुझ्यासोबत होईल...
कदाचित तुला माझी आठवण येईल...
म्हणून तू मला शोधत येशील ...
पण एखादीच हाक देशील...
माझी साद आली नाही...
तर लगेच माघारी निघून जाशील...

तू  माझी वाट बघत थांबणार नाहीस...
कारण तुला ते कधीच जमणार नाही...
हे असं मात्र व्हायला नको...
अबोलच मरण यायला नको...
म्हणून मला थांबायलाच हवं...
तुझी वाट पाहायलाच हवं...

यात किती काळ जाईल कुणास ठाऊक...
#अबोल_प्रेम
@कृष्णार्णव

#तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण

7 Love

"या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला असा तितकासा वेळ लागत नाही... पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला मनाची परवानगीही मागत नाही... © कृष्णार्णव"

या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला
असा तितकासा वेळ लागत नाही...
पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला
मनाची परवानगीही मागत नाही... 

© कृष्णार्णव

#गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम

6 Love
1 Share

"वाटलं होतं विसरली असशील... पण मला पाहून तू नजर फिरवलीस... म्हणजे अजूनही मी तुझ्या मनात राहतो... फक्त प्रेमाची जागा तिरस्काराने घेतलीय... पण जाऊदे ते सोड ना... #अबोल_प्रेम"

वाटलं होतं विसरली असशील...
पण मला पाहून तू नजर फिरवलीस...
म्हणजे अजूनही मी तुझ्या मनात राहतो...
फक्त प्रेमाची जागा तिरस्काराने घेतलीय...
पण जाऊदे ते सोड ना...

#अबोल_प्रेम

#ओढ #अबोल_प्रेम

6 Love

"तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि खायला ऊठतं घर... हे एकटेपण सोडलं तर... बाकी सगळं ठीक आहे...! Read in caption...."

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption....

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि

5 Love