Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3932868650
  • 61Stories
  • 4Followers
  • 526Love
    0Views

@Praju..

😘Poet+ ✍️🤗. .Marathi Girl😎The Deep Thinker 🤞😜 CreatE SomethinG NeW 🤞 Think about mhh Lyf💖...LikE To WritE SomethinG ✍️Like to SpenD mhh Own timE🤞🤗#family & friends is mhh hreatbeat ❤️💖 I LikE to Click everY memorY🙌🤞😅

  • Popular
  • Latest
  • Video
a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

ना हैं यहाँ कोई साधु, नाहीं हैं कोई श्रीराम...हर किसी के अंदर छुपा हैं रावण का अधिवास..जला दो अपने अंदर का रावण करदो एक नयी शुरूवात... ताकि ना किसी स्त्री का बने सीता , द्रौपदी जैसा हाल...!


#विजयादशमी☘️☘️

#prajakta_phalake_ #Dashera☘️☘️
a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

समाजातील बहुरुपी रावणाचा वध करण्याआधी सीतेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्शही न करणाऱ्या रावणाच्या ह्या चांगल्या वृत्तीचा मनात आदर्श घेऊ..
अन्  स्वतःच्या अंतःकरणातील वाईट वृत्तीच्या, क्रुर विचांराच्या बहुरूपी रावणाचा निर्भिडतेच्या आशावादी बाणाने त्याला ठार करत  स्वतःच्या मनाला वाईट वृत्तींच्या मोहपाशातुन मुक्त करू...!

#विजयादशमी दसरा ☘️☘️

:- prajakta_phalake #Dussehra
a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

आज विजयादशमी दसरा, ह्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. सीतेचे अपहरण केल्यानंतर ती कैदेत असताना रावणाने त्याच्याकडे ताकद , सत्ता अन् संधी असुनही सीतेला परवानगीशिवाय स्पर्श केला नाही. रावण हा विद्वान आणि वेदांत जाणणारा महाज्ञानी होता आणि त्यालाही त्याच्या मर्यादा माहित होत्या.सीतेनं पण  तिचं पावित्र्य ढळू दिलं नाही.पण तरीही रावणाच्या कैदेतुन सुटल्यावर श्रीरामांनी तिच्यावर शंका घेऊन,सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली.

 आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेणारा रावण मला चुकीचा वाटत नाही,कारण त्याने चुक केली तरी त्याला त्याच्या मर्यादा माहित होत्या अन् तो त्यावर  कायम राहिला. पण पावित्र्यासाठी पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणारे श्रीराम पण बरोबर वाटत नाहीत.सीतेनं अग्निपरीक्षा दिली पण तिने श्रीरामांचा स्वीकार केला नाही.
त्यामुळं  दसऱ्याला त्या रावणाचं दहन करण्यापेक्षा तुमच्यात जो वाईट विचारांचा, क्रुर रावण आहे त्याचं दहन करा. तरच  सीतेला तिचा मान मिळेल अन् तिला कुठलीही परिक्षा द्यावी लागणार नाही. 

@prajakta_phalake_ #Dussehra

0 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन,  कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ".
घर आणि मुलांसाठी ती  खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते.
त्याग आणि शौर्याची   तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..!
ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..!








@prajakta_phalake_ पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर,
कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर...
#MothersDay

पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर, कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर... #MothersDay

9 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

🌹कटु पण सत्य 🌹
" वेळ "
आली की आपलीच माणसं
 " आपली " राहत नाहीत 
बरं का.!
@prajakta_phalake_ #मतलबी_दुनिया
a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

2021
 ह्या वर्षांचा हा शेवटचा दिवस, अगदीच शेवटचे काही क्षण...
 आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काही तरी देतो तर खुप काही तरी हिरावून ही घेतो..
@praju_phalake_
ह्या वर्षात अनेक नवीन लोकं भेटली.. कुणी कुणाला गमावलं..तरर् कुणी नवीन काही तरी कमावलं.. कुणी हसवलं तर कुणी रडवलं..
जिथं आपल्यानी परकं केलं..तिथं परक्यानी आपलसं केलं..! कुणी आयुष्यात नव रंग भरले ,तर कुणी नवे रंग दाखवले...! वर्षापाठोपाठ मी माणसंही बदलताना बघीतली...! क्षण निसटत गेले.. वर्षही सरुन गेलं..पण जाता -जाता नवीन शिकवण अन् अनुभव देऊन गेलं.  कटु आठवणी अन् वाईट काळही पाहिला..2021चांगलाच लक्षात राहिला. 

-प्राजक्ता फाळके ✍️ #goodbye2021#Nothing is forever 🌹

#goodbye2021#nothing is forever 🌹

7 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

नव वर्ष नवी आशा स्वप्नांनाही मिळेल नवीन दिशा..
नव वर्षातले नव संकल्प पुर्ण होवोत हिच मनोमनी अभिलाषा...!
 रुसवे-फुगवे, हेवेदावे , अन् असतील काही कटु आठवणी सगळेच  जाऊ विसरुन.. 
चला,
@praju_phalake_
नववर्षाचे स्वागत करुया  चेहऱ्यावरती स्मितहास्य आणुन..!😊
Happy New Year🎊🎉

-प्राजक्ता फाळके #नये साल की शुभकामनाये🎊🎉

#HappyNewYear

#नये साल की शुभकामनाये🎊🎉 #HappyNewYear #मराठीविचार

10 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

"चांदणी "

विझलेले हे तारे , ही रात्रही सरलेली 
 " चंद्राच्या हट्टापायी ही चांदणी"
  *उगा का रेंगाळली*
 शुभ्र धुक्याच्या श्वासामधुनी ती
  "प्राजक्तासव विरघळली"
  पाना-पानांवर आसुसलेली
  "ही तुझीच स्पर्श लालसा "
  नितळ पावलांशी दवबिंदू
  "मोत्यापरी ओघळलेली"
@prajakta_phalake_ काय झालेय या वेड्या मनाला ठाऊकच नाही..समोरुन येता मी त्याला बघतच राहि..🥰😘

#Flower

काय झालेय या वेड्या मनाला ठाऊकच नाही..समोरुन येता मी त्याला बघतच राहि..🥰😘 #Flower

8 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

"तुझ्या डोळ्यांमध्ये भाव सारे गुंतले,  
आपल्यातले बोलणेच सारे संपले ...."
नजरेत तुझ्या पाहता ...भान ही सारे हरपले;
 भावनांचे हे विश्व सारे ,
एकाच पटावर अवतरले...
ना भान आहे ना  भावना... एकच सारे समरसले.
डोळ्यांत सख्या रे तुझ्या हे भाव सारे गुंतले......
         
     - prajakta_phalake_ #CoupleGoals #WorldPoetryDay #जागतिक_कविता_दिवस🤓

#CoupleGoals #WorldPoetryDay जागतिक_कविता_दिवस🤓

8 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

दुनिया खुप स्वार्थी आहे हे माहित होतं.. पण ज्यांना मनापासून आपलं मानुन ज्याच्यांवर विश्वास ठेवला, जिवापाड प्रेम केलं ते मित्र मैत्रिणी म्हणवणारे पण खुप स्वार्थी निघाले..जवळचीच लोकं गेम खेळतात आपल्याशी.. कारण आपण त्यांना तो खेळु देतो, शेवटी चुक आपलीच असते 
@Prajakta_phalake_ मतलबी दुनिया 😑

मतलबी दुनिया 😑

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile