Nojoto: Largest Storytelling Platform
pravinwankhede1292
  • 22Stories
  • 45Followers
  • 161Love
    134Views

pravin Wankhede

श्वास संपल्यानंतर प्राण जातो, एवढाच काय तो अर्थ. पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एकाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे

  • Popular
  • Latest
  • Video
b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

#नटसम्राट
#myvoice
b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

दुःखाच मूळ शोधण्यासाठी 
तू तुझा राजमहाल सोडलास,
आणि भटकत राहिलास,
ज्ञानाच्या शोधात.
कधी काट्यातून वाट,
कधी प्रवाही नदीतून वाट.
कधी ऊन कधी पावसाळा,
कधी कडाक्याचा हिवाळा.. 
"तुझा त्याग,
तुझी ज्ञानउपासना 
तुझी जाणून घेण्याची 
जिज्ञासा.
तू निघालास ज्या प्रवासात 
ते मिळेपर्यंत तू,
वळून सुद्धा पाहिले नाहीस.
तू शिकत राहिलास,
आणि मिळवत गेलास.
ती,
दुःखमुक्तीची वाट.
तू जगाला ते देऊन गेलास,
ते,
ज्ञान तुझ्या 
प्रांजळ शिकवणीच. 
तू तू होतास जो 
कधीच होणे नाही.
आणि तुझ्या आधी कोणी,
झाला ही नाही.  
हे केवळ तुलाच जमू 
शकत,
सिद्धार्था.
हो सिद्धार्था केवळ तुलाच. 
       -प्रविणकुमार_वानखेडे..... #सिद्धार्था 
poet_pravin__
b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

विचारांनी थकून गेल्यानंतर 
तुझी प्रेमाची,
कुशी दे.
"डोके कुशीत ठेवून माझे..
शांततेची झोप दे.
तू स्त्री आहेस,
जननी आहेस..
मायेचा सागर तू.
तू प्रियतम आहेस.

तू गीत गातेस तेव्हा,
नभ आले,
भरुनी जणू भासते.
तुझ्या गाण्याने 
दारावरची वेल प्रिये, 
मनमोकळेपणाने हसते...

तुझ्या मायेचा ओलावा,
सये,
सागरालाही लाजवतो....
दाटलेल्या अश्रूने,
मनाची खोली तपासतो..
तू स्त्री आहेस 
जननी आहेस
मायेचा सागर तू 
तू प्रियतम आहेस........ 

आता निद्रालीन होऊ दे....
तू केसात,
अशीच हात फिरवत रहा..
मग पसरलेल्या 
बाहुत माझ्या 
तुही विलीन होत जा.…...... 
            ©प्रविणकुमार_वानखेडे........ प्रेम दे

#dawn

प्रेम दे #dawn

11 Love

b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

__इथे निषेध होईल.
आरोपी जेरबंद होईल.
तो सुटून येईल.
फाशी द्या फाशी दया 
अशी कितीही ओरड घातली 
तरी,
ते सुटतील....
खैरलांजी च बघा ना____ 
पण,
आपण भारतवासी तयार राहू...
निषेध नोंदवायला.
दलित असली की गप्प 
बसू,
अन,
सवर्ण असली की मेणबत्ती पेटवू.....
"इथे जातीला,
फार महत्व आहे हो___😢 
                ©प्रविणकुमार_वानखेडे.......... 
__मुलीचे फोटो असे सोशल मीडियावर टाकणे पटत नाही मनाला कोणीही ते शेअर करू नये....... #Stoprape

8 Love

b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

कळाल तरी वळतंय ना____

#calm

कळाल तरी वळतंय ना____ #calm #Talk

27 Views

b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

हरून,
जिंकते ती मैत्री....
दुःखातून
हसते ती मैत्री.
काट्यातून,
फुलते ती मैत्री..
वादळात,
उभी असते ती मैत्री.
जगण्यात,
सोंदर्य भरते ती मैत्री....
पेटणाऱ्या चितेतून,
जळणाऱ्या सरणातून,
कायम,
बाकी राहते ती मैत्री.........
"मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
        -प्रविणकुमार..... #friendship_day

#Dosti
b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

#नटसम्राट___❤️

#Flute

नटसम्राट___❤️ #Flute

33 Views

b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

माँ का rishta.....❤️❤️🌸🌸🌷🌷

माँ का rishta.....❤️❤️🌸🌸🌷🌷

33 Views

b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

#पेन_आणि_कागद.
#विरह_अन_प्रेम.
#प्रविणची_कविता...
b12857314dbbc91b3faa5f12f8e69e81

pravin Wankhede

कणा.... कुसुमाग्रज.....!

कणा.... कुसुमाग्रज.....! #nojotovideo

55 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile