Nojoto: Largest Storytelling Platform
sachingharat8027
  • 89Stories
  • 416Followers
  • 716Love
    28Views

Sachin Gharat

youtuber *sachin gharat* subscribe my channel

  • Popular
  • Latest
  • Video
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

थांब ना रे पावसा
येऊ दे तिला
थांब ना रे पावसा
येऊ दे तिला

अन् तू गं 
इतकाही उशीर करु नको
की, डोळ्यांतून पाउस बरसेल 

✍ सच्चू...

©Sachin Gharat #alone
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

old song
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.
हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच गं मुक्याने भंगला एकांत माझा.
तुझ्याच वागण्याचा बांधतो अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.
अखेर भेटली नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.
दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

©Sachin Gharat सुरेश भट यांची कविता

#selflove

सुरेश भट यांची कविता #selflove #मराठीशायरी

8 Love

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

एक अविस्मरणीय अनुभव ( सिद्धगड )

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर "कळसूबाई", 
दोनदा "भीमाशंकर", दोनदा "शिवनेरी गड", 
एकदा "जेजुरी गड" आणि काल केलेली 
"सिद्धगडा" वर ट्रेकिंग.
हिरवा शालू पांघरून अगदी ऐटीत उभा असलेला सिद्धगड, 
किलबिल करणारे पक्षी, चालत असतांना मधेच खळखळणाऱ्या झऱ्यांचे येणारे आवाज, 
मनमोहक सौंदर्याने नटलेला असा सिद्धगड आणि त्याला चार चांद लावणारा शुभ्र तुषार उडवत नितळ आणि निर्मळ असा "सुभेदार" धबधबा. #MorningTea
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

ती गेली, तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता

मेघात अडकली किरणे
तो सूर्य सोडवीत होता... #OneSeason

12 Love

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

प्रिय,
लोकल ट्रेन

तू नक्की ट्रेन आहेस की
लग्नासाठी वयात आलेली मुलगी??

कारण तू फक्त सरकारी नोकरी वाल्यांनाच
प्राधान्य देत आहेस.. #WorldEmojiDay2021
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

आत्ता सवय झालीये
ह्या एकटेपणाची

कारण आता 
हिंम्मतच होत नाहीये

कुणाजवळ मन मोकळं करण्याची

सच्चू #OneSeason
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

प्रजासत्ताक दिनाच्या 
खूप खूप शुभेच्छा #RepublicDay
c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

हक्क होता तेव्हा
जे बोलायाला नको होतं ते सुद्धा बोलून गेलो


हक्क नव्हता तेव्हा
जे बोलायाला हवं होतं तेच नेमकं टाळत गेलो

9 Love

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

जे मिळाले त्यास सुद्धा सौख्य माझे मानले मी
मोहमायेच्या झळांनी ना मनाला जाळले मी

भेट जेथे होत होती चालताना साजणीशी
त्या जुन्या वाटेवरीही आज जाणे टाळले मी

कोण माझा कोण परका भेद सारे जाणल्यावर
चेहऱ्यांना माणसांच्या नीट आता वाचले मी

कर्म जे राखून आहे स्वच्छ माझ्या जीवनाचे 
का कुणाला देत राहू व्यर्थ त्याचे दाखले मी

संपला आहे पुरा हा वाटले जेव्हा जगाला 
जिंकण्यासाठी नव्याने डाव तेव्हा आखले मी

स्वप्न तुटली लाखवेळा संकटांशी झुंजताना 
धीर सोडत आसवांना ना जराही ढाळले मी

जीवनाच्या वादळांना एकट्याने पेलताना
लक्ष गाठाया निरंतर पावलांना टाकले मी

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile