Find the Latest Status about एकटेपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटेपण.
Paresh Sane
सगळ्यांची मन जपता जपता आपल्या वाट्याला फक्तं खोटंच का येतं.. कदाचीत खरं एकण्यासाठी मी कुठे तरी कमी पडत होतो.. इतका वाईट आहे का मी, की मी कोणाला समजून नाही घेऊ शकत... जर असं असेल तर ही माझी सगळ्यात मोठी हार आहे.. ©Paresh Sane एकटेपण....m
Paresh Sane
आपण ज्या व्यक्तीवर इतका विश्र्वास ठेवतो. मग नेहमी तीच व्यक्ती का आपला विश्र्वास घात करते... जर खरं बोलायची हिम्मत असेल तरचं माझ्याकडे परत ये... ©Paresh Sane एकटेपण.. #Hopeless
✍️Sushil Kedare
एकटेपणा ह्या हृदयात दुःखाचा सागर वाहून येईल, जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. शोधत बसशील मला तू सगळीकडे पण मी दिसणार नाही, मीच नसेल आयुष्यात तुझ्या बाकी असेल सर्व काही, राहणार काळोखच सुशिल जिवनात पहाटेच उजेड कसा होईल, जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. #एकटेपणा
satya patil 😅
माझा एकटेपणा हाच माझी ताकद आहे😊जिथे मी विचार करतो,माझ्यात लपुन बसलेला मी शोधतो🧐 मला स्वतःवर प्रेम करने यानेच तर शिकवले 😇तो माझा असा मित्र आहे की जो मला कधीच सोडून जात नाही😅 #एकटेपणा
शब्दवेडा किशोर
एकांत.. ज्याला हवाय त्याला न मिळणारा अन् ज्याला नकोय त्याची साथ कधीही न सोडणारा.. एकांत.. नदीकिनारी,निसर्गाच्या सानिध्यात हवाहवासा वाटणारा अन् रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे काळजात घर करणारा.. एकांत.. मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगद डोलावणारा अन् खवळलेल्या समुद्रात त्याच मनाला हेलकावे घ्यायला लावणारा.. एकांत.. आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा अन् त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा.. एकांत.. पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा अन् तोच चिवचिवाट कधीकधी जीवन किती बेसूर बनवतो याची जाणीव करून देणारा.. एकांत.. येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा अन् आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा.. एकांत.. चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा अन् तीच रेघ हळूच आसवांनी मिटवणारा.. एकांत.. निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा अन् जगणाऱ्याला शांततेत आतल्या आत मारणारा.. एकांत.. ©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
शब्दवेडा किशोर
आयुष्याच्या प्रत्येक पाऊली एक नवा धडा मी शिकतो आहे दुःख क्षणाचे स्वागत करताना अन् सतत जनमाणसात जगताना मी खरंच मनातून हसलो आहे कितीक पाहिली रंगीत स्वप्ने मी अन् आहेत कितीतरी अजूनही माझ्या मनीच्या सुप्त आशा त्या जगताकडे जाता जाता वाट नेहमीच मी चुकलो आहे बालपणाच्या गोष्टीत ऐकला होता एक परी राज्याचा देश मी आज त्याच देशीच्या वेशीवरी येता मी किती जास्त थकलो आहे महाद्वार बंद अन चोख पहारा तटाबाहेर अंधार निवारा सुप्रभातीचे पहिले कोवळे किरण येता मी नेहमी तयापुढे झुकलो आहे त्या देशाची रमणीय कहाणी गाऊन सांगे पक्षी गाणी त्या दुनियेची अनोखी अनोळखी ती सफर कराया मी कधीचा बसलो आहे जीवन माझे व्यर्थ गेले अजूनही तिला न डोळ्यांनी पाहिले आहे कधी करील का ती मनधरणी माझी मी तर कधीचा रुसलो आहे गोड बोलणे लडिवाळ ते हसणे अन् नयनांचे ते विभ्रम देखणे अशा बहुरूप्यांचे भेद जाणण्या मी नेहमीच आजवर फसलो आहे अन् जनमाणसात राहूनी सतत मी आजही माणसांच्या गर्दीतला एक शापीत जोकर हीच माझी नित्य ओळख मोठ्या अभिमानानं जपतो आहे आयुष्याचा प्रत्येक पाऊली एक नवा धडा मी शिकतो आहे ©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
@sw@p@llu
जेव्हा एखादा माणूस कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नाही तेव्हा तो आतून तुटलेला असतो आणि ज्यावेळी तो आतून तुटतो तेव्हा त्याला कोणी कितीही काहीही बोलले तरी त्याला काहीच फरक पडत नाही. ©@pallu_49 एकटेपणा