Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या भेटीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या भेटीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या भेटीला.

    PopularLatestVideo

Sujata Chavan

♥️♥️आठवण तुझ्या माझ्या भेटीची#♥️♥️ #लव

read more
जुन्या वळणावरची वाट
    आज मन सुखावून गेली....
 झुळूक वाऱ्याची स्पर्शता मनी
     आठवणींची तार छेडून गेली.....

                                  Yedu...!!

©Sujata chavan ♥️♥️#आठवण तुझ्या माझ्या भेटीची#♥️♥️

Shahaji Chandanshive

तुझ्या भेटीत ...

read more
तुझ्या भेटीत ......

खूप दिवसानंतर झालेली तुझी भेट ..
मला समोर पाहिल्यानंतरचा तुझा मोहरलेला चेहरा 
माझा आसमंत दरवळलेला ..
लवलवत्या कोवळया पालवीसारखी ..
तुझ्या सर्वागाची थरथर ..
माझ्यासाठी एक नवीच जाणीव !
आश्वासक ..थेट काळजाला भिडणारे तुझे तरल शब्द 
तुझ्या माझ्या अस्तित्वाला अखंड जोडू पहाणारे ..
खरं तर ..तू ..सळसळणारी ..खळखळणारी ..
वळणावळणाची सरिता माझ्या आत पोहचू पाहणारी 
मी नदी किनारा ..मी वहता वारा ..रिता रिता ...
तुझं तरल हळवेपण ..अंतरच कमी करत गेला आपल्यातील ....!
आता मी परका फक्तं शरीराने ..
मनाच्या अथांगतेवर विचार पाखरांची भिरभिर 
माझ्या शांत किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेधुंद लाटा 
फेसाळलेल्या स्वप्नांना बघणारा मी ...!
बेबंध क्षणी भान हरविलेला ...
मनानं तुझ्या आत ..दूर दूर ..गेलेला ..
किनाऱ्यावरची शिड वारं भरून भरकटावीत 
तसाच मी ....माझ्यातून दूर दूर गेलेला 
आता माझाच मी न राहिलेला ...
अंतर्मनान सर्वस्व तुला दिलेला ...
तुझ्या उमललेल्यासर्वांगी पाकळ्यांत मी मिटुन गेलेला 
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
-------
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive तुझ्या भेटीत ...

Sunil Zarikar

आतुरता तुझ्या भेटीची..

read more
वाट पाहतो मी तुझ्या भेटीची..
आतुरता त्या सुंदर क्षणानची..
जशी, 
चातक पाहतो पावसाची..
लाट पाहते किनारयाची..
निसर्ग पाहतो वसंताची..
भेट असेन काही काळाची..
पण, आठवण असेन आयुष्यभराची..  आतुरता तुझ्या भेटीची..

Nishu Sonune

योगायोग हा भेटीचा ... तुझ्यात गुंफणारा !❄

read more
योगायोग हा भेटीचा ....
                 तुझ्यात गुंफणारा !❄

अचानक पणे कोणीतरी भेटलं आज
माहित नसतांना हा योगायोग खास !
कळत नाही हा मनाचा साज
मलाच का आहे तुझ्या ओढीचा ध्यास ?

ते हसणं त्याच मनमुराद ,
का सतावत मलाच खट्याळ !
तो मनमोकळा स्वभाव लावतो मला त्याचा नाद,
त्यानेच खेचते मी तुझ्याकडे निव्वळ !

नातं आपलं अजब रे , 
त्याला नाव  तुझ्या कडन अलग
पण भावना काही माझ्या औरच रे !
त्या होतील का कधी तुझ्याशी  सलग  ?

 ही एकतर्फी जीवाची घालमेल,
कुठपर्यंत असेल रे तिचा विस्तार ?
दौडेल का कधी दुतर्फा प्रेमाची गाडी खुशाल ?
पकडेल का कधी रास्त स्वप्नांची रफ्तार ?

असंख्य प्रश्न भेडसावतात रे मनी ,
पण तुला पाहिल्यावर होते रे विशाल सागरा पै शांत !
तू येतोस असा, जातोस खाडा टाकून क्षणी
तेवत ठेवतोस हृदयाचा ज्वालांत ...हृदयाचा ज्वालांत .....   

                                   -रातराणी ✨ योगायोग हा भेटीचा ...
           तुझ्यात गुंफणारा !❄

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video

Deepak Badade

आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो, तुझ्या-माझ्या आठवणीत उगाच गुरफटतो.. तुझ्या या प्रेमाचा साज बघ माझ्या चेहऱ्यावर.. तुझं माझं गोड स्वप्नं चढेल उ #poem #nojotophoto

read more
 आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो,
तुझ्या-माझ्या आठवणीत उगाच गुरफटतो..
तुझ्या या प्रेमाचा साज बघ माझ्या चेहऱ्यावर..
तुझं माझं गोड स्वप्नं चढेल उ

RJ कैलास नाईक

माझ्या गालाला तुझ्या हाताने....

read more
 माझ्या गालाला तुझ्या हाताने....

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. #poem

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं,
प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा,
अन अलगद येऊन मी तुला हसवाव,

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं,
तुझ्याच साठी माझे हृदय असावं.
तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं,
प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं,
                                       नाव नसावं
                                                   नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile