Nojoto: Largest Storytelling Platform

New कातरवेळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कातरवेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कातरवेळी.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

श्वेतकिनारी कातरवेळी #DawnSun

read more
श्वेतकिनारी कातरवेळी 
 नकळत येते सांजसावली
  पाहुन उन्हाचे चांदणे केशरी 
    जवळची नवका दूर राहीली

नवी नवखी वाट उमटली 
 पाऊलखुण वाळूत रोवली 
  अपरिचित झाले होते नव्हते 
   लाटांवर लाट उसळून आली

काठावर फेसाळ मखमली
 भासते सारखी सडारांगोळी
  तारुण्य फुलवीत सदा जीवनी
   अंतःकरणी हृदयी प्रीत जागली

तिच पाऊलवाट पुसलेली 
 दाही दिशांत रस्ता हरवलेली
  असे गुंतून राहिलो पैलतीरी मी
   अंधारी राञ आसपास विरलेली

मिटले डोळे नीज लागली
 चंद्र लपला खुल्या आभाळी
  हे दिसले होते स्वप्नात मलाही
   होताच जागे कळले कातरवेळी
   
                     ( श्वेतकिनारी कातरवेळी )
                          ~ विलास भोईर श्वेतकिनारी कातरवेळी 

#DawnSun

संcheeta❤️

कातरवेळी तुझ्या सोबतीत नवी प्रीत बहरून येते... जशी निळ्या आकाशात सांज नारंगी डवरून येते..!! #Poetry

read more
कातरवेळी तुझ्या सोबतीत 
नवी प्रीत बहरून येते...

जशी निळ्या आकाशात
सांज नारंगी डवरून येते..!!

बी.सोनवणे

वाट पाहतोय गं सये जीवा लागली हुरहुर, दिसेनासी मज होते अशी किती गेली दूर।। धडधडते ह्या हृदयात फक्त तुझ्याच चिंतेत, सांजच्या गं कातरवेळी #Lights

read more
वाट पाहतोय गं सये
जीवा लागली हुरहुर, 
दिसेनासी मज होते 
अशी किती गेली दूर।। 

धडधडते ह्या हृदयात
फक्त तुझ्याच चिंतेत, 
सांजच्या गं कातरवेळी 
नयन आहे प्रतिक्षेत।। 

अंगणात सौख्याचं गं
लावते वृंदावनी दिवा, 
तुळस लक्ष्मी पुजूणी
प्रसन्न वाटते ह्या जीवा।। 

तुझं पाहण्यास अतूर 
नि होते अशी घालमेल, 
आनंद हे डोहाचे सये
वाटे कधी होईल मेळ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे वाट पाहतोय गं सये
जीवा लागली हुरहुर, 
दिसेनासी मज होते 
अशी किती गेली दूर।। 

धडधडते ह्या हृदयात
फक्त तुझ्याच चिंतेत, 
सांजच्या गं कातरवेळी

sandy

मला तुला भेटायचं आहे थोडसं बोलायचं आहे पण, कँटीन मध्ये नाही... हॉटेल मध्ये नाही... ना टेरेस वरती... ना चौपाटी वरती... मला तुला भेटायचंय #story #nojotophoto

read more
 मला तुला भेटायचं आहे
थोडसं बोलायचं आहे पण,
कँटीन मध्ये नाही...
हॉटेल मध्ये नाही...
ना टेरेस वरती...
ना चौपाटी वरती...

मला तुला भेटायचंय

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कातरवेळ #५२ #सख्या #शृंगाररस

read more
ह्या कातरवेळी सखे ये तू जवळी,
ठेवुनी दुरावा असा अंत माझा पाहू नको.
तुझे समीप राहणे खूपच सुखावते,
जाता दूर तू ,जगणे असाहाय्य होते. मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता

कवी - के. गणेश

कातरवेळ....

read more
दिवस माझा असाच सरतो
बसत नाही कशाचाच मेळ..
तुझ्याच आठवणीत पुन्हा,
हळूच येते कातरवेळ...! कातरवेळ....

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

कातरवेळ.... #nojotophoto

read more
 कातरवेळ....

Kailas Tidke

mute video

Shubhada

कातरवेळ #thought

read more
अशा किती 'कातरवेळांचे' 
आपण दोघेच साक्षीदार. 
काल तू माझ्या सोबत होतास. 
आज मी तुझ्या 'शोधात' आहे. 

©शुभदा कातरवेळ

gauri kulkarni

#कातरवेळ 
कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी. 
अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे. 
#गौरीहर्षल
 #कातरवेळ#firstquote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile