Nojoto: Largest Storytelling Platform

New रोपटे धडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रोपटे धडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोपटे धडा.

Related Stories

    PopularLatestVideo

krishna Rathod

"काट्यातलं रोपटं " #poem #nojotophoto

read more
 "काट्यातलं रोपटं "

Shivkumar Vishwanath Deore

रोपटं
नका वाढू देऊ हिच्या सोनेरी केसांना,
नका चमकू देऊ तिच्या चमकदार डोळ्यांना,
धनी दाबा हिचा गळा, घ्या ईच्या नरडीचा घोट,
एकदाचा पुरूनच टाका हिच्या नाजूक देहाला होण्याआधी तो पूर्ण.
नका बघू माझ्याकडे डोळ्यांचा असा आ वासून,
नका चावू दात ओठ माझं असं बोलणं ऐकून.
सांगते मी धनी ,माझं आज तेव्हड ऐका,
नाही पुरणार रात्री रडायला खरंच सांगते आज माझं तेव्हड ऐका.
होऊन मोठी, येईल हिच्या डोळ्यांत चमकदार तेज सूर्याचे,
पण दिसेल एखाद्या विकृताला हिच्या डोळ्यात मादकता एखाद्या मेणकेचे.
विकसित होऊन स्वरयंत्र हिचे, कंठातून घेईल जन्म कोकिळा जणू,
पण नाही दिसणार विकृतीला हिच्या कंठातली ती कोकिळा,तर दिसेल फक्त आणि फक्त उघडी आणि गोरीपान मान.
मोठी झाल्यावर आपल्याला दिसेल आपली बाहुली उंच आणि रुबाबदार,
पण विकृतीला नाही दिसणार हा रुबाब, तर दिसतील फक्त आणि फक्त तिच्या शरीराचे उभार.
खुलून आपल्या फुलराणीच रूप,घर आपलं फुलांनी दरवळेल,
पण जवळच एखादी विकृती, हुंगुण हा सुगंध अजूनच चवताळेल.
पडेल आपली मुलगी घराबाहेर घेऊन विकासाचं पाऊल,
पण विकृतीला वाटेल ही तिच्या सावजाची चाहूल.
आणि एक दिवस ती विकृती होऊन वासनेच्या धुंदीत गुल,
झिडकारून आपल्या लेकराचा प्रतिकार, कुस्करेल हो हे नाजुकस फुल.
धनी,धनी सांगा मला , होईल का ते आपल्याला सहन,
हात जोडून आपण मागू देवाकडं मरण.
म्हणून म्हंते धनी हे रोपटं खुडण्याआधी आपणच खुडून टाकू,
जिंदगीभरची तिची काळजी आताच मिटवून टाकू,
जिंदगीभरची तिची काळजी आताच मिटवून टाकू.
                        -शिवकुमार #रोपटं

Alka Jain

गजल,घडा,पडा,जडा़

read more
mute video

somnath gawade

#एकटं रोपटं

read more
#एकटं रोपटं
काळ्या मातीच्या उदरातून
एक रोपटं अंकुरलं
सुर्यपुत्र कर्णाचा दातृत्वाचा 
संदेश घेऊन भूतलावर अवतरलं

ऊन, वारा, पाऊस झेलून
रोपटं एकटं लढत राहिलं
वर्षामागून वर्षे जाता
रोपट्याचं वटवृक्ष झालं

संघर्षाचे जगणे रोपट्याने
हसत-हसत स्वीकारलं
दुसऱ्यांना मायेची,प्रेमाची
सावली अखंड देत राहिलं

आयुष्यभर जमेल तेवढं देण्याचं 
व्रत घेऊन रोपटं जगत आलं
मेल्यानंतर सुद्धा दुसऱ्यासाठी
जळणाची सोय करून गेलं

 #एकटं रोपटं

Sanjay Gurav

#धडा

read more
आज का सुविचार जी जखम काहीतरी शिकवते
ती जखम नसून धडा असते..
जखमेतून नाहीच घेतला धडा
तर पाण्याचा पालथा घडा असते. #धडा

somnath gawade

#धडा

read more
काही लोकांची
'नाटकं' पाहिली
की, त्यांना 
चांगलाच 'धडा'
शिकवावा वाटतो.
😀😆🎃 #धडा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile