Nojoto: Largest Storytelling Platform

New शोकांतिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोकांतिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोकांतिका.

    PopularLatestVideo

Nikesh Bharane

नेमकं 
हसता हसताच 
सुख हेरावुन जावं 
याहून मोठी 
शोकांतिका काय ? शोकांतिका.

#quotesofnikesh 
#सुख 
#शोकांतिका 
#हसता 
#मराठी_quote

somnath gawade

लग्नात आई-वडिलांचा
रडत-रडत निरोप
घेणारी बायको मात्र
नवऱ्याला आयुष्यभर
रडवत असते.
 #शोकांतिका

Satish Deshmukh

शोकांतिका #Sky #मराठीकविता

read more
शोकांतिका


बेलगामी पावसा तू थांब थोडे थांब ना !
ईज्जतीचे शेत माझे लाज थोडी राख ना !

सोड आशा बरकतीची स्वप्न आता भंगले 
खर्च झाला पेरणीला तेवढा नीघेल ना ?

वावराचे दुःख माझे लपवितो हासूनिया
पावसाने पीक गेले वेदनेला सोस ना !

साठले पाणी असे की शेत पाणी जाहले
साचलेल्या या तळ्याशी मत्सबीजे सोड ना !

मागचा हंगाम सारा ऊस गेला वैरनी 
पीक सोया नष्ट झाले तू समाधी खोद ना !


सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पुसद 
जि.यवतमाळ

©Satish Deshmukh शोकांतिका 
#Sky

kiran chaudhari

समाज
हा तोच होता ज्याने सीता मातेला अग्नीत जायला भाग पाडले,
हा तोच होता ज्याने साक्रेटिसला वेडे ठरविले, 
हा तोच होता ज्याने संत ज्ञानेश्वरांना पाखंडी ठरविले, 
हा तोच होता ज्याने बाबासाहेबांना वर्गाबाहेर बसविले, 
हा तोच आहे ज्याने मुलीला घराबाहेर आणि मुलाला डोक्यावर बसविले 
आणि हा तोच ज्याचा मी स्वतः एक भाग आहे. 
#शोकांतिका #समाज #शोकांतिका

Dhirajkumar Nejkar

😷😷😷😷😷😷😷😷😷😷

*निवडणुका असत्या तर नेतेमंडळींनी मास्क व सॅनिटायझर मोफत वाटले असते.*

🧼🧴🧼🧴🧼🧴🧼🧴🧼🧴

#indian_political_humanity
#शोकांतिका #कोरोना #🦠 #indian_political_humanity
#शोकांतिका #कोरोना #🦠
loader
Home
Explore
Events
Notification
Profile