Find the Latest Status about राजकारणी उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजकारणी उखाणे.
vishnu thore
उखाणे... -विष्णू थोरे होते मनात काही ते बोललो मुक्याने गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने मागावरी तुझ्या होते भले दिवाने केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने हातून हात तुझा सोडून मी निघालो पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....
yogesh atmaram ambawale
माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत राजकारण जोडून, जो तो प्रकाशझोतात राहायला बघतो भारी. प्रसंग कुठलाही असो,कसाही असो, ह्यांना काही गांभीर्य नसते, ह्यांना फक्त राजकारण करायचे असते, भले राजकारणाशी त्याचे काही संदर्भ नसते. राजकारण #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझामहाराष्ट्र #राजकारणी माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत रा
Rushikesh Ujawala Maharao
ज्यांची योग्यता नव्हती ते पंतप्रधान झाले.... अच्छे दिन आयेंगे म्हणता म्हणता त्यांचे अच्छे दिन आले... पंतप्रधान होण्यासाठी त्यावेळी चहाच भांडवल झाल... जरा आठवुन सांगा चहाच्या टपरीवर कोण चहा पिल... राजकारण..
prayag pawar
राजकारण... करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव शेतकऱ्यांच्या मालाला नसे काडीचा भाव निवडणुका जश्या येतील तोंडी, करतील प्रचाराची नुसतीच कोंडी लाखो मतांतून निवडून येते एक नाव अन् गुलाल उधळतो गावो गाव नेता आमचा काही पाच वर्षे टिकेना जसा ताजा भाजीपाला मार्केट ला विकेना... अतरंगी राजकारण्यांच्या अतरंगी खेळ्या मात्र, पोलिस दादांच्या रात्र-दिवस पाळ्या पडलेत यांचे विक्रमी आघाडीचे गट अन् नुसतेच करतात एकमेकांवर कट यांच्या नादात माझा देश पाठी राहतोय सामान्य माणूस मात्र भरडला जातोय दूरवर राहिलाय माझ्या देशाचा विकास इतके 'राजकारण' चाललंय भकास... ©prayag pawar #राजकारण
somnath gawade
राजकारणात 'पोपटपंच्छी' करणाऱ्यांना कुठल्यातरी 'पक्षाच्या' पिंजऱ्यात अडकविले जाते! राजकारण
Ganesh Divekar
"निवडणुका जवळ येताच लबाड माकड जागी होतात या पक्षातुन त्या पक्षात माकड उडया घेतात वा-याची दिशा ओळखुनच ही चालतात जनतेच्या हितासाठी वरुन अस बोलतात" भ्रष्टाचाराने होरपळली जनता नसत कुणा देण घेण नसत दुसर कारण सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण चालत फक्त राजकारण.... पक्ष एकमेकांचे वाभाडे काढतात लोकांमध्ये गट तट पडतात तेव्हा आमचे नेते घडतात मागे कोण हटेना ना कोणीच येईना शरण.. शासकीय शैक्षणिक सामाजिक क्षेञांचे बाजारीकरण झाले सामान्य जण गोर गरीब कष्ट उपसुन मेले सांगा आर्थिक विषमतेची दरी केव्हा भरण ज्याच्या अन्नधान्यावर देश जगतो त्याचेच बेकारीच्या आगीने जळत इथ सरण.. पैसा उधळुन निवडणुका लढल्या जातात पुन्हा हिच गिधाड समाज तोडुन खातात समाजसेवेच्या पाघरुना खाली-गुदमरुण लोकशाहीचे होत आहे मरण... सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण.. चालत फक्त राजकारण @गणेश दिवेकर@ राजकारण
DIPRESH SAWANT
राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे… पण याचा नेमका अर्थ सांगायला… शब्दकोशही निशब्द आहे… कसाही पाहिला तरी… हा शब्द बरबटलेलाच दिसतो… इथे उभा प्रत्येकजण… त्या चिखलाने माखलेला असतो… पिढ्यान पिढ्या चालत आलंय… म्हणे याचा इतिहास खूप मोठा आहे… जमेल तिथे मूळं रोवत आलंय… याचा पसारा फार मोठा आहे… कधी सत्तेसाठी कधी पैशासाठी… तर कधी नुसता सूड घेण्यासाठी… राजकारण खेळलं जातंय… जनतेचा जीव घेण्यासाठी… राजकारण कसं खेळावं… याला कुठलेच नियम नसतात… काय मिळालं काय गमावलं… याची गणितच निराळी असतात… आई-बाप, काका-मामा… इथे प्रत्येकजण वैरी असतो… एकट्यानेच जगतात सगळे… इथे जिवाभावाचा कोणीच नसतो… ©DIPRESH SAWANT #राजकारण