Find the Latest Status about थांबवा जरा गाड़ी सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबवा जरा गाड़ी सॉन्ग.
Durga Deshmukh
वृक्षतोड थांबवा ही तोड थांबवा , हि तोड थांबवा हि तोड थांबवा, भुमातेचे तापमान वाढते आहे हि वसुंधरा प्रदुषणाने रडते आहे ही तोड थांबवा ||धृ|| हे डोंगर झाडे राने ,वाळुन गेली पाने हे नद्या झ-यांचे वहाणे, पक्षांचे मंजुळ गाणे हे नद्याचे पात्र का रे दुसरीकड वळते आहे ही वसुंधरा ||१|| हे सिमेंट क्रांग्रेटची घरे कारखान्याचे प्रदुषण सारे रोगराई चे फिरती वारे पावसाचे थेंब ही खारे मानवाची कु-हाड का रे झाडावर पडते आहे ही वसुंधरा ||२|| या झाडांचा निर्मळ वारा जो श्वास तुझा रे होतो घाव घालुनी झाडावर तु सारेच कसे गमवितो पृथ्वीचा -हास होतो, हे दुःख अविरत छळते आहे ही वसुंधरा ||३|| ही झाडे सर्वाना देती फळे फुले अन् छाया औषधाची असे खाण ही कशी घालवुया वाया या नाशाची कु-हाड ,का रे तुझवर पडते आहे ही वसुधंरा || 4|| डोंगर झाले हे भेसुर नाही नद्याना हो पुर पक्षांना मिळेना सुर सारेच झाले दुर दुर हे मानवाचे अज्ञान जगाला, भेसुर छळते आहे ही वसुधंरा ||५|| ही पुन्हा हसावी धरती झरण्याचा नाद कानी झाडे डोलावी आनंदाने पक्षानी गावे गाणी झाडे लावा झाडे जगवा , सगळ्याना कळते आहे ही वसुधंरा ||६|| दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh वृक्षतोड थांबवा
Nitesh Gomane
थांबवा जातपात भांडण जातीपातीवर का करता सारे आपण असे वाद अहो माणुसकीने एकमेकांना द्या मदतीची साद....।। मी पणाचा अहंकार आपण ठेवूया बाजूला समविचारांचा रचूनी पाया जपूया माणुसकीला....।। अहो कसेही वागा, कसेही जगा रक्त आपले लाल जातीपातीच्या भांडणात आपण का करताय आपले हाल..।। जातीपाती भांडण करून आपण सारे राहिलो आहोत मागे एकरूपतेने विकास करु आता तरी व्हा जागे.......।। हात जोडूनी विनंती करतो आज मी तुम्हाला एकसंगतीने चला वाचवूया आपण आपल्या कोकणाला...।। ©कवी:-कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे पाते पिलवली(चिपळूण) 9326779460 थांबवा जातपात भांडण