Nojoto: Largest Storytelling Platform

New दिर्घ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिर्घ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिर्घ.

    PopularLatestVideo

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा... * सर *

read more
सर 

आज न् उद्या शाळेला 'अनुदान' मिळेल अन् 'पगार' चालू होईल या आशेवर त्याने विनाआनुदानीत शाळेवर 'शिक्षक' म्हणून सात वर्षे कसे बसे काढले... शिक्षकी पेशा कितीही चांगला आसला तरी पण फुकट किती वर्ष करणार..? हा गडी बी.एड.ची भेंडोळी घेऊन घरी आला तेंव्हा इनमीन दोन एक्कर वावर होतं... त्यात बापानं केळी लावलेली... हिरव्या -कच्या केळीच्या टपोऱ्या घडांनी झाडं वाकलेली... 'सर' होण्यासाठी शाळेत डोनेशन म्हणून मोठी रक्कम लागत होती... त्या बदल्यात तसाच 'भरला मळा', संस्थाचालकाने घशात घालुन घेतला होता ... पोरगं 'सर' झाल्याचं पाहुन बापाला आनंद झाला खरा... पण जमीन गेल्याचं दुःख ते विसरू शकले नाहीत... त्यांनी  अंथरूण धरलं... बापाच्या डोळ्या देखत  लग्न व्हावं म्हणून 'सर' बोहल्यावर चढले... सासऱ्याच्या मदतीवर काही वर्षे संसाराचा गाडा कसाबसा रेटला.. त्यात दोन लेकरांची भर पडली...  आता सगळंच जिवावर येत होतं... सोबतची मित्र कंपनी .. कोणी स्पर्धा परीक्षा पास होऊन सरकारी नौकरीत... तर कोणी छोटा-मोठा उद्योग-धंदा टाकून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले ... आपण मात्र बैलागत नुसतीच 'सर'पणाची झुल पांघरलेली... ही 'सल' त्याला आता जास्तच बोचु लागली... काहीही झाले तरी परत शाळेचे तोंड बघायचे नाही... नको तुमची नौकरी म्हणत उद्या संस्था चालकाकडुन  शेती परत घेऊयात... शेतात घाम गाळायचा... काळी आई पोटापुरतं नक्कीच देईल... रात्री त्याने मनाशी पक्का निश्चय केलेला... पण सकाळी, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पेपरात बातमी छापुन आलेली... " विनाआनुदानीत शाळेला लवकरच आनुदान मिळणार " त्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या... 'चटणी-भाकरी' बांधून  'सर' पुन्हा शाळेवर जायच्या तयारीला लागले ...

                    लेखक:-आर.प्रकाश.(माजलगाव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा... * सर *

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा...* भूक *

read more
भूक                        
गच्च भरलेली 'डस्टबीन' घेऊन घंटागाडीची वाट बघत बाईसाहेब गेटजवळ उभ्या होत्या... आज मोठी बहीण येणार म्हणून श्रीखंड-पुरीचा  बेत आखलेला... त्यात काम उरकत नव्हतं म्हणून चिडचिड झालेली... "ताई..."  बाईसाहेबानी चमुकून बाजुला पाहीलं... पिंजारलेले केस... पोट खपाटीला गेलेलं... डोळ्यात झोपेची झाक आसलेली एक तीस-पस्तीशीची वेडगळ बाई खुणेनंच खायला काहीतरी मागत होती... आधीच कामाचा पसारा ...  वर घंटागाडीचीही बोंब... त्यात तिला पाहून  बाईसाहेबाच्या कपाळावर आठ्या पडल्या... "नाही गं बाई ..काही खायला नाही."  अंग चोरत, बाईसाहेबानी तीला झीडकारलं... बाईसाहेबाचं बोलणं तीच्या कानापर्यंत पोहचलं नसावं... कारण  तीचं लक्ष्य बाईसाहेबाच्या हातातल्या 'डस्टबीन' मधुन बाहेर डोकावणाऱ्या 'चपात्याच्या शिळ्या तुकड्यां' कडे गेलेलं... मलूल डोळ्यात आशेचा किरण चमकून गेला...  रुक्ष ओठ थरथरले... पोटातली 'भूक' जागी झाली...  तेवढ्यात घंटागाडीही दारात येऊन थांबली... अचानक त्या वेडगळ बाईनं बाईसाहेबाच्या हातातुन 'डस्टबीन' हिसकाऊन घेतली... भराभर हाताला लागतील तेवढे 'शिळ्या चपातीचे तुकडे' डस्टबीन मधुन काढुन फाटक्या पदरात घेतले...  तिच्या या कृतीने बाईसाहेब पुरत्या चक्रावुन  गेल्या... त्या जेव्हां भानावर आल्या तेंव्हा त्यांच्या समोर फक्त रिकामी डस्टबीन पडलेली दिसत होती... आता नुसता घंटागाडीचा आवाज ऐकू आला तरी बाईसाहेब अस्वस्थ होतात.		

																			@लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा...* भूक *

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * ढग * #Drops

read more
ढग
वर आचानक काळ्याकुट्ट् ढगांनी गर्दी केली तसं शेतकऱ्याच्या तरूण पोराचं काळीज हाललं... आज दिवसभर सगळी 'बाजरी' कापून, जिथल्या तिथं रानात कोपी करून ठेवलेली... मळनी यंत्रावाल्याशी बोलनी झालेली.. त्यानं तांबडं फुटायच्या टायमाला येण्याच कबुल केलेलं... पण मध्येच असं आभाळ भरून आलेलं.... पोराची घालमेल पाहुन म्हाताऱ्याचे हात-पाय गार पडलेले... पोराच्या मनात  रातचच कापलेली 'बाजरी' हालवायचं चाललेलं... पण  त्यावर या अवकाळी आलेल्या पावसानं पाणी फिरवलं.... टप-टप करत सुरू झालेला पाऊस धो-धो कोसळू लागला...  पोरगं भर पावसातच कानात वारं शिरलेल्या वासरागत रानाकडं पळत सुटलं... तो पर्यंत पावसानं होत्याच नव्हतं केलेलं... रानात गुडघ्या इतकालं पाणी साचलेलं..  घटकाभरानी  पाऊस थांबलेला...   रानातल्या डोहात ,मढ्यागत तरंगत असलेली "बाजरीची ताटं " पाहुन बांधावर उभा राहिलेल्या तरूण  शेतकऱ्याच्या डोळ्यात हळूहळू  ढग जमा होऊ लागले.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा. * ढग *

#Drops

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * दोन बळी * #MoonBehindTree

read more
दोन बळी		

मरनकळा आल्यागत बाप लांब जाऊन बसला होता... अंगणातल्या एकमेव जांभळीच्या एटबाज झाडावर कामगारांच्या कुर्‍हाडीचे एकामागून एक घाव पडत होते... तरूण मुलगा झाड कापणाऱ्या कामगारांना काही-बाही सुचना करत होता.. बापानं याच मुलाच्या जन्मावेळी अंगणात दाराजवळ जांभळीचं रोपटं लावलेलं... मुला बरोबर जांभुळं ... जांभळा बरोबर मुलगा... दोघेही वाढत होते... मुलाचं कळतं वय झालं.. तसा जांभळालाही पहीला मोहर आला... त्यावेळी बापाला कोण आनंद झाला... ओल्या मोहरचा धुंद सुंगध तर गावभर पसरला होता... दिवस जात राहिले ...  आज मुलगा कमवता झाला... चार चाकी गाडी घेतली... गाडी पार्कींगसाठी मुलाला आता जांभळीच्या झाडाची अडचन वाटु लागली... झाड कापण्या वरून बापलेकात तुतु-मैमै झाली... शेवटी गरम रक्तानं शिळ्या रक्तावर मात केली. .. पण अंगणात मात्र झाडा आधी बापच  उन्मळुन पडला होता.

©शब्द:- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा. * दोन बळी *

#MoonBehindTree

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात #LookingDeep

read more
रंगीत भात

कांता, आज तीन वर्षाच्या पोरीला घेउनच कामावर आलेली...  बाईसाहेब दसऱ्याचं  धुनं काढनार त्यात उगा परत घरी यायला उशीर व्हायचा ...नवरा.. पोटात दारु गेली की सुद राहत नाही तिथं चिमुकल्या पोरीकडं कुठणं ध्यान देणार.. या काळजी पायी ती आधी मधी शेजारच्या आज्जीकडं पोरीला ठेवायची.. पण रोज रोज कुठं जमायचं.. म्हणून पोरीला सोबत आणलेलं .. धुनी-भांडी..कपडालत्ता....पडदे.. ब्ल्ँकेट असं काही बाही करत दसरा काढणं चालूच  होतं..  हाॕलमध्ये बाईसाहेबाच्या छोटया  पोराबरोबर चिमुकली पोर खेळत होती...  पोराच्या हातात 'चकली' पाहुन पोरीला भुक लागली... कांतानं पिशवीतला छोटा डब्बा उघडुन तीच्या पुढ्यात ठेवला... डब्यातला 'रंगीत भात' पाहुन पोराचे डोळे दिपले... पोरगं रडतच आईला जाऊन बिलगलं.. त्यालाही तसा रंगीत भात हवा होता... बाईसाहेबांनी आश्चर्याने कांताकडे पहात विचारलं "कसला गं रंगीत भात..?" कांतानं शरमेनं खाली मान घातली... त्या नंतर कांता त्या घरी कधीच कामाला गेली नाही.. पुढे बऱ्याच दिवसांनी बाईसाहेबाला, कांता एका लग्नात  अक्षता म्हणून  फेकलेले 'रंगीत तांदुळ' ओटीत जमा करताना  दिसली होती.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात

#LookingDeep

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा.. * ते सातजण * #leaf

read more
ते सातजण 

कोणी मंत्री -संत्री येणार म्हणून नगरपालीकेनं शहरात आज स्वच्छता अभियान राबवायचं ठरवलेलं... कोरोना काळात सगळंच ठप्प... त्यामुळे अख्ख्या शहरालाच घाणीनं वेढलेलं... शहरासाठी कंत्राटी सफाई कामगार म्हणून नेमलेले तीन महीला व चार पुरूष असे 'ते सात जण' होते.. बाकी सगळे कर्मचारी , नगरसेवक  जाहिरात व बॕनरबाजी करण्यात व्यस्त असताना... 'ते सात जण' पहाटेपासुनच अंग मोडून कामाला लागलेले ... गटारात उतरून गटार साफ केले... सडलेला कचरा उचलला ... धुळ खात पडलेले रस्ते झाडुन लख्ख केले.. दुपार पर्यंत शहरानं कात टाकली ... मरगळलेल्या शहराला टवटवी आली... भर वस्तीतल्या मैदानात छोटेखाणी संमारंभ होता... मंत्री साहेब आले .. हार-तुरे झाले ... त्यांनी स्वच्छ- सुंदर शहराची तोंडभरून स्तुती केली... लागोलाग नगरपालीकेसाठी मोठ्या पॕकेजची घोषणा करून  'क्लिन सिटी वाॕरीयर' म्हणून सगळ्या नगरसेवकांचा सत्कारही केला... समारंभ संपला.. सर्वांची पांगापांग झाली ... 'ते सात जण' मात्र तिथेच कोपऱ्यात बसुन होते.. त्यांना आता मैदान स्वच्छ करायचे होते.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा.. * ते सातजण *

#leaf

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

read more
तो आणि त्याचा बाप 

कोरोणामुळे 'तो' नववीची परीक्षा न देताच दहावीला गेलेला...त्यात शाळा बंद पडुन आता 'आॕनलाईन शिक्षण' चालू झालेलं... 'तो' सोडून इतर सगळ्या वर्गमित्रांकडे 'अँड्राईड मोबाईल' होते... काही दिवस मीत्रांच्या मोबाईलवर भागलं... रोज रोज दुसऱ्याच्या मोबाईलवर अभ्यास करणं त्याला कमी पणाचं वाटत होतं...  पण त्याला दुसरा इलाजही नव्हता.. 'बाप' खदानीत पाषाण फोडायच्या कामावर.. बंद पडलेलं काम आताशी कुठं चालु झालेलं.. असं हातावरचं पोट त्यांचं... पोराला कुठणं मोबाईल घेणार...? तरी पण मोबाईल साठी 'तो' राती बापाबरोबर भांडला होता... अन् आज दिवस कलला तरी अजुन 'बाप' कामावरून कसा आला नाही या विचारानं माय-लेक परेशान झाले होते... पोराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... तो तसाच मनावर दगड ठेऊन खदानीवर आलेला... समोरचं दृश्य  पाहुन पोराचं काळीज हललं... ह्याच्या मोबाईलसाठी, बाप 'जादा दाम' मिळेल या आशेवर हातात 'घण' घेऊन काळोखातही खदाणीतल्या पाषाणाला येड्यागत भिडत होता...                              

                         
																						लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

एक इबादत

मातृत्व दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाऐं.... हे ईश्वर जग की सारी माताओं को दिर्घायु दे,उन्हें सदा सलामत रहने ,अमरता का वरदान दे....!!🙏🙏🙏

read more
लिखना कहाँ आसान  हुआ है उसे जिसने  स्वयं हमें लिखा हों...फिर भी कल्पना करने का आज प्रयत्न करूंगा,इक माँ को नही माँ की ममता को उतारने का प्रयत्न करूंगा,चन्द अल्फा़ज होंगे उसमें
और ढे़र सारा ममता भरा स्नेह होगा ,
आंचल का छांव ,हांथो के स्पर्श का आराम लिखूंगा,

स्तनपान सें अमृत की धार ,उससे हजारों रोगों की दवा -निदान लिखूंगा...माँ कुछ मैं क्या लिखूं तुझे ,बस झुकता हूँ कदमों में तेरे और तुझे ही अपना सारा संसार लिखूंगा... मातृत्व दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाऐं....
हे ईश्वर जग की सारी माताओं को दिर्घायु दे,उन्हें सदा सलामत रहने ,अमरता का वरदान दे....!!🙏🙏🙏

✍️ लिकेश ठाकुर

यूँ ही तन्हा जीने से,उदासी कम नहीं होती, राह गुज़र जाने से,परेशानी दूर नहीं होती। कठोर तप्त हौसलों की,उड़ान नहीं रुकती, शार्गिद बन सीखने से,म #कविता

read more
यूँ ही तन्हा जीने से,उदासी कम नहीं होती,
राह गुज़र जाने से,परेशानी दूर नहीं होती।

कठोर तप्त हौसलों की,उड़ान नहीं रुकती,
शार्गिद बन सीखने से,मंज़िल नहीं रूठती।

साधनों के तालमेल से,आँखे नहीं थकती,
जो भी मिले हल से,मेहनत व्यर्थ नहीं होती।

कायरों के बाजु से,तरकस नहीं निकलती,
रूठ जाये ज्ञान तो,सरस्वती नहीं प्रखरती।

मधुर स्वर सुनाने से,सीरत नहीं बदलतीं,
बनावटी चरित्र से,सूरत सर्वत्र नहीं शोभती।

रंग के उल्लास से,ज़िन्दगी नहीं सुधरती,
नशा हो पैसों का,सुकून की नींद नहीं होती।

दौड़ भाग ज़िन्दगी से,पीठ सीधी नहीं होती,
नोटों पर लेटने से,उम्र दिर्घायु नहीं होती।।

यूँ ही तन्हा जीने से,उदासी कम नहीं होती,
मंजर गुज़र जाने से,परेशानी दूर नहीं होती।
कवि लिकेश ठाकुर यूँ ही तन्हा जीने से,उदासी कम नहीं होती,
राह गुज़र जाने से,परेशानी दूर नहीं होती।

कठोर तप्त हौसलों की,उड़ान नहीं रुकती,
शार्गिद बन सीखने से,म

Vikas Sharma Shivaaya'

श्री भृगु ऋषि' द्वारा रचित सर्वारिष्ट निवारण स्तोत्र... ॐ गं गणपतये नम:। सर्व-विघ्न-विनाशनाय, सर्वारिष्ट निवारणाय, सर्व-सौख्य-प्रदाय, बालान #समाज

read more
श्री भृगु ऋषि' द्वारा रचित सर्वारिष्ट निवारण स्तोत्र...

ॐ गं गणपतये नम:। सर्व-विघ्न-विनाशनाय, सर्वारिष्ट निवारणाय, सर्व-सौख्य-प्रदाय, बालानां बुद्धि-प्रदाय, नाना-प्रकार-धन-वाहन-भूमि-प्रदाय, मनोवांछित-फल-प्रदाय रक्षां कुरू कुरू स्वाहा।।

ॐ गुरवे नम:, ॐ श्रीकृष्णाय नम:, ॐ बलभद्राय नम:, ॐ श्रीरामाय नम:, ॐ हनुमते नम:, ॐ शिवाय नम:, ॐ जगन्नाथाय नम:, ॐ बदरीनारायणाय नम:, ॐ श्री दुर्गा-देव्यै नम:।।
ॐ सूर्याय नम:, ॐ चन्द्राय नम:, ॐ भौमाय नम:, ॐ बुधाय नम:, ॐ गुरवे नम:, ॐ भृगवे नम:, ॐ शनिश्चराय नम:, ॐ राहवे नम:, ॐ पुच्छानयकाय नम:, ॐ नव-ग्रह रक्षा कुरू कुरू नम:।।
 
ॐ मन्येवरं हरिहरादय एव दृष्ट्वा द्रष्टेषु येषु हृदयस्थं त्वयं तोषमेति विविक्षते न भवता भुवि येन नान्य कश्विन्मनो हरति नाथ भवान्तरेऽपि। ॐ नमो मणिभद्रे। जय-विजय-पराजिते! भद्रे! लभ्यं कुरू कुरू स्वाहा।।
 
ॐ भूर्भुव: स्व: तत्-सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।। सर्व विघ्नं शांन्तं कुरू कुरू स्वाहा।।
 
ॐ ऐं ह्रीं क्लीं श्रीबटुक-भैरवाय आपदुद्धारणाय महान्-श्याम-स्वरूपाय दिर्घारिष्ट-विनाशाय नाना प्रकार भोग प्रदाय मम (यजमानस्य वा) सर्वरिष्टं हन हन, पच पच, हर हर, कच कच, राज-द्वारे जयं कुरू कुरू, व्यवहारे लाभं वृद्धिं वृद्धिं, रणे शत्रुन् विनाशय विनाशय, पूर्णा आयु: कुरू कुरू, स्त्री-प्राप्तिं कुरू कुरू, हुम् फट् स्वाहा।।
 
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:। ॐ नमो भगवते, विश्व-मूर्तये, नारायणाय, श्रीपुरुषोत्तमाय। रक्ष रक्ष, युग्मदधिकं प्रत्यक्षं परोक्षं वा अजीर्णं पच पच, विश्व-मूर्तिकान् हन हन, ऐकाह्निकं द्वाह्निकं त्राह्निकं चतुरह्निकं ज्वरं नाशय नाशय, चतुरग्नि वातान् अष्टादष-क्षयान् रांगान्, अष्टादश-कुष्ठान् हन हन, सर्व दोषं भंजय-भंजय, तत्-सर्वं नाशय-नाशय, शोषय-शोषय, आकर्षय-आकर्षय, मम शत्रुं मारय-मारय, उच्चाटय-उच्चाटय, विद्वेषय-विद्वेषय, स्तम्भय-स्तम्भय, निवारय-निवारय, विघ्नं हन हन, दह दह, पच पच, मथ मथ, विध्वंसय-विध्वंसय, विद्रावय-विद्रावय, चक्रं गृहीत्वा शीघ्रमागच्छागच्छ, चक्रेण हन हन, पा-विद्यां छेदय-छेदय, चौरासी-चेटकान् विस्फोटान् नाशय-नाशय, वात-शुष्क-दृष्टि-सर्प-सिंह-व्याघ्र-द्विपद-चतुष्पद अपरे बाह्यं ताराभि: भव्यन्तरिक्षं अन्यान्य-व्यापि-केचिद् देश-काल-स्थान सर्वान् हन हन, विद्युन्मेघ-नदी-पर्वत, अष्ट-व्याधि, सर्व-स्थानानि, रात्रि-दिनं, चौरान् वशय-वशय, सर्वोपद्रव-नाशनाय, पर-सैन्यं विदारय-विदारय, पर-चक्रं निवारय-निवारय, दह दह, रक्षां कुरू कुरू, ॐ नमो भगवते, ॐ नमो नारायणाय, हुं फट् स्वाहा।।
 
ठ: ठ: ॐ ह्रीं ह्रीं। ॐ ह्रीं क्लीं भुवनेश्वर्या: श्रीं ॐ भैरवाय नम:। हरि ॐ उच्छिष्ट-देव्यै नम:। डाकिनी-सुमुखी-देव्यै, महा-पिशाचिनी ॐ ऐं ठ: ठ:। ॐ चक्रिण्या अहं रक्षां कुरू कुरू, सर्व-व्याधि-हरणी-देव्यै नमो नम:। सर्व प्रकार बाधा शमनमरिष्ट निवारणं कुरू कुरू फट्। श्रीं ॐ कुब्जिका देव्यै ह्रीं ठ: स्वाहा।।
 
शीघ्रमरिष्ट निवारणं कुरू कुरू शाम्बरी क्रीं ठ: स्वाहा।।
 
शारिका भेदा महामाया पूर्णं आयु: कुरू। हेमवती मूलं रक्षा कुरू। चामुण्डायै देव्यै शीघ्रं विध्नं सर्वं वायु कफ पित्त रक्षां कुरू। मंत्र तंत्र यंत्र कवच ग्रह पीड़ा नडतर, पूर्व जन्म दोष नडतर, यस्य जन्म दोष नडतर, मातृदोष नडतर, पितृ दोष नडतर, मारण मोहन उच्चाटन वशीकरण स्तम्भन उन्मूलनं भूत प्रेत पिशाच जात जादू टोना शमनं कुरू। सन्ति सरस्वत्यै कण्ठिका देव्यै गल विस्फोटकायै विक्षिप्त शमनं महान् ज्वर क्षयं कुरू स्वाहा।।
 
सर्व सामग्री भोगं सप्त दिवसं देहि देहि, रक्षां कुरू क्षण क्षण अरिष्ट निवारणं, दिवस प्रति दिवस दु:ख हरणं मंगल करणं कार्य सिद्धिं कुरू कुरू। हरि ॐ श्रीरामचन्द्राय नम:। हरि ॐ भूर्भुव: स्व: चन्द्र तारा नव ग्रह शेषनाग पृथ्वी देव्यै आकाशस्य सर्वारिष्ट निवारणं कुरू कुरू स्वाहा।।
 
ॐ ऐं ह्रीं श्रीं बटुक भैरवाय आपदुद्धारणाय सर्व विघ्न निवारणाय मम रक्षां कुरू कुरू स्वाहा।।
ॐ ऐं ह्रीं क्लीं श्रीवासुदेवाय नम:, बटुक भैरवाय आपदुद्धारणाय मम रक्षां कुरू कुरू स्वाहा।।

ॐ ऐं ह्रीं क्लीं श्रीविष्णु भगवान् मम अपराध क्षमा कुरू कुरू, सर्व विघ्नं विनाशय, मम कामना पूर्णं कुरू कुरू स्वाहा।।
 
ॐ ऐं ह्रीं क्लीं श्रीबटुक भैरवाय आपदुद्धारणाय सर्व विघ्न निवारणाय मम रक्षां कुरू कुरू स्वाहा।।
 
ॐ ऐं ह्रीं क्लीं श्रीं ॐ श्रीदुर्गा देवी रूद्राणी सहिता, रूद्र देवता काल भैरव सह, बटुक भैरवाय, हनुमान सह मकर ध्वजाय, आपदुद्धारणाय मम सर्व दोषक्षमाय कुरू कुरू सकल विघ्न विनाशाय मम शुभ मांगलिक कार्य सिद्धिं कुरू कुरू स्वाहा।।
 
एष विद्या माहात्म्यं च, पुरा मया प्रोक्तं ध्रुवं। शम क्रतो तु हन्त्येतान्, सर्वाश्च बलि दानवा:।। य पुमान् पठते नित्यं, एतत् स्तोत्रं नित्यात्मना। तस्य सर्वान् हि सन्ति, यत्र दृष्टि गतं विषं।। अन्य दृष्टि विषं चैव, न देयं संक्रमे ध्रुवम्। संग्रामे धारयेत्यम्बे, उत्पाता च विसंशय:।। सौभाग्यं जायते तस्य, परमं नात्र संशय:। द्रुतं सद्यं जयस्तस्य, विघ्नस्तस्य न जायते।। किमत्र बहुनोक्तेन, सर्व सौभाग्य सम्पदा। लभते नात्र सन्देहो, नान्यथा वचनं भवेत्।। ग्रहीतो यदि वा यत्नं, बालानां विविधैरपि। शीतं समुष्णतां याति, उष्ण: शीत मयो भवेत्।। नान्यथा श्रुतये विद्या, पठति कथितं मया। भोज पत्रे लिखेद् यंत्रं, गोरोचन मयेन च।। इमां विद्यां शिरो बध्वा, सर्व रक्षा करोतु मे। पुरुषस्याथवा नारी, हस्ते बध्वा विचक्षण:।। विद्रवन्ति प्रणश्यन्ति, धर्मस्तिष्ठति नित्यश:। सर्वशत्रुरधो यान्ति, शीघ्रं ते च पलायनम्।।

।। श्रीभृगु संहिता सर्वारिष्ट निवारण स्तोत्र सम्पूर्ण ।।

        🙏क्षमा प्रार्थना मन्त्र 🙏
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दन।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।

विष्णु सहस्रनाम(एक हजार नाम) आज 478 से 489 नाम
478 सत् सत्यस्वरूप परब्रह्म
479 असत् प्रपंचरूप अपर ब्रह्म
480 क्षरम् सर्व भूत
481 अक्षरम् कूटस्थ
482 अविज्ञाता वासना को न जानने वाला
483 सहस्रांशुः जिनके तेज से प्रज्वल्लित होकर सूर्य तपता है
484 विधाता समस्त भूतों और पर्वतों को धारण करने वाले
485 कृतलक्षणः नित्यसिद्ध चैतन्यस्वरूप
486 गभस्तिनेमिः जो गभस्तियों (किरणों) के बीच में सूर्यरूप से स्थित हैं
487 सत्त्वस्थः जो समस्त प्राणियों में स्थित हैं
488 सिंहः जो सिंह के समान पराक्रमी हैं
489 भूतमहेश्वरः भूतों के महान इश्वर हैं

🙏बोलो मेरे सतगुरु श्री बाबा लाल दयाल जी महाराज की जय 🌹

©Vikas Sharma Shivaaya' श्री भृगु ऋषि' द्वारा रचित सर्वारिष्ट निवारण स्तोत्र...

ॐ गं गणपतये नम:। सर्व-विघ्न-विनाशनाय, सर्वारिष्ट निवारणाय, सर्व-सौख्य-प्रदाय, बालान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile