Nojoto: Largest Storytelling Platform

New सांजवेळ अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांजवेळ अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांजवेळ अर्थ.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

RJ कैलास नाईक

सांजवेळ

read more
 सांजवेळ

RJ कैलास नाईक

सांजवेळ

read more
 सांजवेळ

Shailesh Zade

सांजवेळ #nojotophoto

read more
 सांजवेळ

Gayatri Sonaje

सांजवेळ #poem

read more
तुझ्या सोबतची 
ती सांजवेळ
आजही आठवते....
किती गोड गप्पांत
गुंतलो होतो आपण!
छान छान त्या पक्ष्यांची
किलबिलाट कानी
पडत होती...
पूर्ण सोबत जगलेल्या
त्या आयुष्यातला तोच
स्वर्गसुंदर आनंद होता...
कारण, त्या सांजवेळी
आपण दोघे सोबत होतो
आणि जुन्या आठवात
भिजत होतो...
कधी आपल्यात कुठलाच
दुरावा नव्हता...
एकमेकांच्या सोबतीने
आपला सुंदर प्रवास 
चालू होता...
माझ्या सोबतचे सर्व क्षण
तू त्या कातरवेळात 
रंगवत होती....
प्रेमाचे सुंदर रंग भरत होती....
अशाच सांजवेळी कधीच
तुझ्या सोबत नव्हतो...
तुच एकटी कातरवेळेला
भेटत होती... आणि 
मनातल्या गप्पा सांगत होती
पण आज जीवन सार्थक झाले
तुझ्या सोबतचा हा सुंदर सहवास...
ही सांजवेळ अमृताहूनही
खुप गोड आहे.... सांजवेळ

RJ कैलास नाईक

सांजवेळ

read more
 सांजवेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile