Nojoto: Largest Storytelling Platform

New घराच्या नावांची यादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराच्या नावांची यादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराच्या नावांची यादी.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajkumar Nayak

माणुस नावाचा मोबाईल.. आपुलकी नावाच सिम..

read more
mute video

Virendra Yadav

mute video

प्रकाश साळवी

आठवांची तुझ्या याद मागतो !!

read more
आठवांची तुझ्या याद मागतो !!

आठवांची तुझ्या याद मागतो
कवितेची माझ्या दाद मागतो
**
बेचव झाले जीवन वाटते
गंधित श्वासांचा स्वाद मागतो
**
जीवन म्हणजे काटेकुटे
आयुष्याला साद मागतो
**
किती लाजरी तू अबोली
थोडा जरा संवाद मागतो
**
चाफा जरी ना बोलला तरी
जीवनाचे रंग अमर्याद मागतो
**
माणूस माणसाचा ना राहिला
एक थोडी फिर्याद मागतो
**
काय मागू देवा तुजकडे
सुखी जीवनाचा प्रसाद मागतो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ आठवांची तुझ्या याद मागतो !!

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

read more
माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

viraj gosavi

kudal | आंब्रड गावाची कन्या कु लावण्या सोमा राऊळ |आमाच्या पप्पांनी गणपती आणला... #विनोदी

read more
mute video

NARAYAN NALAWADE

घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

read more
घराच्या तुलनेने, दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने, कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत,चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.

 #NojotoQuote घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

Avinash lad

आठवांची नाव..

read more
आठवांची नाव...
---------------------------------

चांदण्या शांत निजताना
   रातकिडेच जागवत होते,
     स्वप्नदिवेही विझले तेव्हा 
        आकाश मुके रडले होते...

पहाटे गवततृणांवर मग
    उगाच ते दव पडले होते,
      मी आठवांची नाव घेऊन
       ओढ स्वप्नी बिलगत होते...

किलबिल वाटे कानी
  स्वप्न हळव्या मिठीत होते,
      फोफावला प हा ट वारा
     दोन्ही डोळेही मिठले होते...

मधुचंद्राच्या गोड राती
  श्वास एकरूप जीव होते,
   बहरली अं गा व र काया
      रात्र स्वप्नी जागवत होते...

मनात प्रे म ळ पालवी
    दवबिंदू पांघरूण देते,
      रविकरणांची चा हू ल
        मन छेडण्या प्रभात येते...

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ आठवांची नाव..

somnath gawade

#अनाथांची माय

read more
अनाथांची माय
आज हजारो
लेकरांना पोरकं
करून गेलीस.
अनाथांनाही वाली
असतो ही शिकवण
देऊन गेलीस..
भावपूर्ण श्रद्धांजली माय!
💐💐💐 #अनाथांची माय

कवी - के. गणेश

बाबांची आठवण..

read more
mute video

vishnu thore

नावाडी......

read more
तू समजुन घेणा 
आस मनाची वेडी
तट तुटल्या वरती
का मुका नावाडी....
- vishnu नावाडी......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile