Nojoto: Largest Storytelling Platform

New भाकरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाकरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरे.

Related Stories

    PopularLatestVideo

viraj gosavi

ठाकरे... #शिक्षण

read more
mute video

Vaishali Yenugwar

भाकरी #मराठीकविता

read more
mute video

Sandeep A More

#भाकर

read more
#भाकर
मिळवण्या भाकर भुकेची इथे
 गाऱ्हानी किती सोसावी,
भाकरीची किंमत घामाच्या
 थेंबा थेंबाने मोजावी..!!

चव भाकरीची कष्टाच्या झळा 
झेलनाऱ्यालाच  कळावी,
खाणाऱ्या जिभेने किंमत 
तिची ओळखावी..!!

पोट जरी हितभर,काम करी दिसभर
 खळगी मागेल तितकी खावी,
कांदा  नी भाकर मी भुकेचा चाकर 
भुकेची उजळनी शिकवावी..!!

भाकरीची ना चिंता मी मोठा तालेवार
 का तिची किंमत करावी,
पोटाला पडता पिळ भाकरिनेच
 तिची किंमत ठरवावी..!!

भाकरी देणारी माझी काळी आई
कष्ट तिचे ठाई ठाई भुकेलाच 
तिची चव कळावी..!
सुत शेतकरी तिचा न्याहरीला 
खावून चटनी भाकरी,
उरलेल्या भुकेचा प्रश्न तुमचा
 आमचा जगी तोच सोडवी..!!

कवियित्री-शोभा डी निकम #भाकर

Dhammadeep Maske

भाकर

read more
भाकर झाली महाग ,ती खाऊ कशी मी
मरण आहे स्वस्त लढू की मरू मी
पर्याय एकच आहे सांगा काय करू
पेटून उठतो रणांगण गाजवतो 
कारण मरण तर नशिबी गरिबीत लिहिलंय की. भाकर

Laxman Sapkale

भाकर #poem

read more
| कष्टाची भाकर |

आस्वाद ह्या भाकरीचा
हात मजूराला विचारा ॥

घाम गाळून मिळणारी भाकर
दुर करते चिमटा पोटाचा ॥

भाकरीचे प्रकार पण आहे बरं
कुणा बाजरी तर कुणा ज्वारी चाखायला आवडे हे म्हणाव खरं ॥

भाकर कोणती ही असो 
मस्त लोणचे आणि ठेचा लावला की जिभेला स्वादच म्हणाव ॥

काय सांगू तुम्हाले भाकरीची गोष्ट
ऐकदा गावाकड चुलीसमोर बसून 
चाखा भाकर आन ठेचा ॥

विसरणार नाही तुम्ही या शेतकर्याच्या भाकरीचा तेल आणी ठेचा ॥

          ✒..लक्ष्मण सपकाळे 
     भुसावळ
                 मो.न. 9403523429
   @पुणे भाकर

डॉ केशव घोडके

भाकर #poem

read more
🍪🍪🍪भाकर🍪🍪🍪
➖➖➖➖➖➖➖
भुकेला नाही पर्याय
म्हणून खावी लागते भाकर..।
नाहीतर बापानबी कही माया
हाणला नसता वखर..।

हाल हाल झाले त्याचे
याच भाकरी पायीं..।
संसाराचा गाडा लोटतांना
काईडट पडली मायी..।

सहन नाही व्हतं म्हले बी 
त्यांच्या जीवाचे हाल..।
माह्या शिक्षणासाठी त्यांनी
सावकाराचे धरले आहे साल..।

येवढे सारे कष्ट घेतले
त्यांनी आमच्यासाठी..।
फाटक्या बंडीतून पैसे दिले
मले पुस्तक पाटी साठी..।

शिकुन मोठ व्हावं म्हणून
मोठ्या शहरात पाठवलं..।
नौकरीच्या शोधता माव्ह
आभायच सारं फाटलं..।

भाकरीच्या शोधात जरी
म्या शहराले जवय केल.।
दोन दिसाच्या या जींदगीन
फक्त भाकरीसाठी सोंग केल..।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके भाकर

Shiva Sultan

यूँ बेवजह।। 
मैं किसी से नहीं लड़ता।।

शेर हूँ।।
कुत्तों के भौकने से फर्क नहीं पड़ता।। #शेर #ठाकरे

Lina

भाकर......

read more
निघालो आहे मी काम एक करण्या
सुरुवात त्याची मी कधीची केली आहे, 

जाताना पोटात नाही कण ही अन्नाचा 
काल च्या पाण्याने पोट भरून आहे, 

आहे एका नंतर कित्येक घर मागायचे 
किती जणांच्या द्वेषाला होते गिळकृंत करायचे, 

गेलो एका घरी मागितले काकुळतेने 
रागाच्या त्यांच्या पाऱ्याने आधीच हाकललेले, 

डोक्यावर आहे भर-ऊन चालतो अनवानी
शिळा तुकडा झोळीत टाकेल का कोणी, 

दम घेण्यासाठी बसलो झाडाची सावली पाहुन 
रस्त्यावरून गेलेत काही नाणे कटोरीत टाकून, 

डोळ्यात येतेय गुंगी चढली आहे अंधारी 
भाकरीच्या आशेत जगणारा...........मी असा भिकारी

©Lina Kirnapure भाकर......

Avinash lad

भाकर..

read more
भाकर
------------------------

मी भाजते रे भाकर
माझा कसे धनी शेतावर,
रोज गाळीतो घाम थकुनी
सुखी असुदे  लेकर..............१

रुबाबी रे धनी माझा
करितो गोळा सुख सार,
सुखाचा रे  घालितो वारा
मनी दुःख लपवुनी सार.........२

चव चाखितो अवीट
रोज  पिटल, शिळी भाकर,
रूप आवडे धन्याचे माझ्या
माझा देव जणू शेतावर.........३

भोळी त्याची मालकीन
सोबतीने खाते मिठ भाकर,
पाहुनीया  सुखावला डोळा
धनी राबतो शेतावर............४

हिरवी पिवळी शालू छान
दिसे रंगबेरंगी फुले त्यावर
नटली शालूत शेतमळी
अन् हरला आमचा घोर......५

---------------------------
अविनाश लाड,राजापूर-हसोळ भाकर..

Kiran Sabale

भाकर #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile