Nojoto: Largest Storytelling Platform

New नंदादीप दिवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नंदादीप दिवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदादीप दिवा.

    PopularLatestVideo

Anuja Karande

नंदादीप 

खोल शुभ्र धुक्यातुनी, एकसंत चालतं राहिले, 
एक नित्य तेवणारा, दीप शोधतं चालले, 
निःशब्द-नीरव शांतता एकच चिरत चालले, 
कुणा सोबततीची न आशा बेफिकीर मन हे जाहले... !

दूरचा प्रवास तो, जरि हजार वाटा, 
शीतल-धवल धुक्यातुनी,एक ऊब शोधत जायचे
न  थांग लागे नंदादीपा, 
हताश-भाबडे मन तरि जीव तोडुनी चालले...!

संलग्न मुका प्रवास जेव्हा थांबला त्या ज्योतीपुढे, 
थकल्या जीवाच्या देहावरुनी,सुवर्णबिंब अवघे बरसले, 
अल्हादाच्या सीमा तोडुनी,मन बेभान होऊनि नाचले, 
तेव्हा कुठे ते गडद धुके हळूवार विरत चालले...! 


- अनुजा विजय कारंडे #नंदादीप

Vin's Bansode

दिवा #poem

read more
जळता दिवा विझून उमलतो
प्रश्नाला उत्तर देऊन स्थिरावतो

मनाचे बोल अलगद छेडतो
आपसूकच मन बेधुंद करतो दिवा

Vishal Chavan

#दिवा

read more
दिवा...

एक दिवा दिवसा जळत होता..
पण दिवसा कोणाला कळत होता?
हा अलगद सूर्याची जागा घेत होता...
अन सूर्य तिकडे मावळत होता...

अंधार कधी झालाच नाही,
कधी सूर्य, कधी दिवा..
अंधाराला या जळत्या दिव्याचा..
वाटू लागला मोठा हेवा...

जो दिन रात्र जळला त्याचे,
मोल ना लोकां कळले..
कुणी ना कधी पूजले त्याला...
हृदय कुणाचे ना पाघळले...

अन एक दिवस थकून भागून,
भर दिवसा दिवा विझला..
कुणीच ना रडले त्यावर...
तो स्वतःच्याच अश्रूत भिजला...

नित्यक्रमाने त्या ही दिवशी,
सूर्यदेव गेले मावळतीला..
आमच्या नशिबी हा अंधार का..
सगळा गाव बोंबलला...

Vishaal/Aadinaath 
08-07-21








.

©Vishal Chavan #दिवा

somnath gawade

#दिवा

read more
तुझ्या मनाचा हळवा कोपरा नेहमी  मोकळा ठेव;
मी नसलो तरी माझ्या नावाचा दिवा मात्र पेटता ठेव. #दिवा

Dr. Sunil Haridas

दिवा

read more
कोणीही  संचारबंदीत  बाहेर  नका  जावु,
सर्वजण मिळुन गॕलरीत  एकेक दिवा लावु,
एकजुटीजी  ताकद जगाला  दाखवुन देवू,
जगातुन कोरोना व्हायरसला पळवुन लावु,
कोरोनासे डरोना
डॉ. सुनिल हरिदास बीड दिवा

Mohan Somalkar

# दिवा #मराठीकविता

read more
mute video

Mission for Passion to change to INDIA

दिवा म्हणे मी दिवा .. .-संतोष #EveningBlush

read more
दिवा म्हणे मी दिवा
माझा राजा छत्रपति शिवा

कलम म्हणे लिव्हा  
माझा राजा छत्रपति शिवा

ढोल सोबत टिम्भारी वाजे
माझे छत्रपति शंभू राजे

वादळ म्हणजे मराठी गाजे
माझे छत्रपती शहाजी राजे

दिवा नको विझाऊ
माझी आई माता जिजाऊ

ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे
ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे
 -संतोष

©Mission for Passion to change to INDIA दिवा म्हणे मी दिवा .. .-संतोष 

#EveningBlush

Vin's Bansode

#दिवा अंधाराचा

read more
मी लावेल दिवा त्या अंधारात

पडेल प्रकाश त्या अंधारात

हा.......

येतील वादळ वाट जरा

पण विझू नाही देणार

तो अंधारातला दिवा...... #दिवा अंधाराचा

Mr DipakAute

दिवा #krishna_flute

read more
mute video

Rohini Patil

#तो दिवा #story #nojotophoto

read more
 #तो दिवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile