Find the Latest Status about भेटायला गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटायला गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
nisha Kharatshinde
शब्दच आले भेटायला शब्दच आले आज भेटायला मला म्हणाले लिहित नाहीस आता कुठ बिनसलंय ? उचल लेखणी जुळव यमक नको दुरावा असा शब्दच आम्ही अबोल तुझ्याविना तू साद दे मग होईल रचना हळवे,प्रेमळ मैत्र,विरह जुळव शब्द एकदाच ऐकना ✍️काव्यनिश. ©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला