Find the Latest Status about महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे सांगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे सांगा.
Bharat Bandiwadekar
Pratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
somnath gawade
भूमी माझी शुरांची भूमी माझी वारकऱ्यांची संतांची आणि धारकऱ्यांची धरणीमातेची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची हिमालयाच्या मदतीला धावणाऱ्या सह्याद्रीची रांगडी आणि मृदू बोलाची भूमी माझी महाराष्ट्राची श्रद्धेचा आणि भक्तीचा इथला नंदादीप सदैव तेवत राहतो कीर्ती पताका शिवरायांची इथला मर्द-मराठी गर्वाने मिरवीत असतो. भूमी माझी महाराष्ट्राची
Vilas Bhoir
एकमेव राज्य असा की, लळा लावितो महाराष्ट्र... जन्मभूमी मायभूमी आमुची इथे नांदतो महाराष्ट्र... जुनं तेच सोनं खरं रितीरिवाज शिकवुनी, जुन्या रुढी अन् जुन्या परंपरा, आजही जपतो महाराष्ट्र... अभंगाचे सरगम स्वर छेडित नव्याने, घुमतो नाद मृदुंगाचा तालसुर एकसारखा, टाळ चिपळ्यांत दंगतो महाराष्ट्र... गडकिल्यांची आरास राज्यभर, ढाल पाठी अन् समशेर हाती, सह्याद्रीच्या पाऊलखुणा ठेऊन, डोंगर कपारीत राहतो महाराष्ट्र... शिवरायांची माता जिजाऊ जन्मदात्री, साक्षरतेचा ध्यास सावित्री, बाबासाहेबांचे प्राण रमाई, इतिहासाची परखड पाने सांगतो महाराष्ट्र... खेळ कब्बडी चेंडूफळी, खो खो अन् सोनसाखळी, कुस्तीत रंगुनी डावपेच, मराठमोळ्या मातीत रांगतो महाराष्ट्र... प्रत्येक माही येती नवे सण, होळी तर कधी दसरा दिवाळी, पाडव्याची गुढी उभारून, सण उत्सवांनी सजतो महाराष्ट्र... {ओळख माझ्या महाराष्ट्राची.} *- विलास भोईर* ओळख माझ्या महाराष्ट्राची...
somnath gawade
महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं गड-किल्ल्यांकडून अभेद्य अशी ढाल घ्यावी गनिमांविरुद्ध लढण्यासाठी हातांचीही वज्रमुठ व्हावी हे गड-किल्ले म्हणजे मावळ्यांचं अखंड प्रेरणास्थान वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची दैना सांगेल इतिहासाच पान इतिहासाचा ठेवा असा कसा दुर्लक्षित होऊ द्यावा धडे गिरवावे नव्या पिढीने असे की मनात स्वाभिमान जीवंत व्हावा ही स्मृतिस्थळं येणाऱ्या पिढीची उर्जास्थळं व्हावी राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य आणि त्यागाची पताका येथे सदैव फडकत राहावी. महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं
Vaibhav Harugade
प्राथमिक शाळा.... पर्वा एका साहित्य संमेलनाला गेलो होतो... त्याठिकाणी एक शिक्षक उठुन बोलायला लागले. आणी ते शिक्षक बोलत होते मराठी भाषा बुडतं आहे. कार्यक्रम संपला आणी मी त्यासरांच्या जवळ जाऊन गाठ घेऊन विचारले , सर.. बरोबर आहे तुमचे मराठी भाषा बुडतं आहे पण सर बुडण्यामागचे कारण काय. सरांच्याकडे कारण देण्यासाठी उत्तर नव्हते. मी सरांना घेऊन जनगनना चालु केली आणी लक्षात आलं, जे शिक्षक सांगत होते मराठी बुडतं आहे त्या शिक्षकांची मुलं इंग्लिश मिडीयम ला. मित्रांनो इंग्लिश शिकणे वाईट नाही पण इंग्लिश मिडीयम ला मराठी शिकवले जात नाही हे वाईट आहे.. मराठी भाषा आपली आस्मिता आहे आणी ती सर्वांना आलीच पाहिजे... नाहितर काय होईल, उद्याचं महाराष्ट्राचं नाव उंच घेऊन जाणारी मराठी मुलं तिथच राहतील, आणी समोर येतिल इंग्लिश मुलं. त्यामुळे मराठी भाषा तिथेच राहिली.... मित्रांनो आपल्या बापजाद्यांनी इंग्रजांना घालवण्यासाठी रक्त सांडली त्यांच्या कार्याला काय अर्थ राहतो कसले आपण त्यांचे पाईक महाराष्ट्रीय..... ©Vaibhav Harugade सांगा तुम्हीचं....
Alonegirl
बाबा अणि तुमच प्रेम जर तुम्हाला कोणाला तरी एकाला वाचवायचय तर कोणाला वाचवाल????? please सांगा