Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीतले आजोबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीतले आजोबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीतले आजोबा.

    PopularLatestVideo

Sanchita Kekane

सकाळच्या धावपळीत जेवण बनवताना,
समोरच्या खिडकीतून आवाज आला...
 
शाब्बास, आई मुलाला तिच्या ८ वर्षाच्या मुलाला म्हणाली...
 चटकन डोळे पाणावले अन् एका अगदीच जवळच्या,
 आणि  आवडत्या व्यक्तीची आठवण आली...

डोळ्यातून टपकण पाणी आले...
आणि आजोबांबरोबर चे पूर्वीचे दिवस आठवले...

घरातील मोठे आणि वडीलधारी म्हणून सगळ्यांवर धाक होता...
राग भयंकर, पण मनाने प्रेमळ म्हणून, 
गावामध्ये वेगळाच रुबाब होता...

आई-वडिलांच्याही आधी त्यांचा मान होता, 
आवडीने सगळेजण म्हणायचो बाबा...
हातामध्ये काठी अन् दोरिवाला चष्मा, 
अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते आमचे आजोबा...

रागही तसा भयंकरच म्हणा, 
पण अगदी थोड्याच वेळात शांत व्हायचे...
गोडीगुलाबिने आपली चूक समजावून, 
तितक्याच मायेने जवळ करायचे....

रात्रीचे जेवण लागायचं गरमागरम,तेही खूप तिखट...
थोडे जरी झाले खार नाहीतर बेचव, 
तर त्यांचा राग शांत करताना आजीची स्थिती व्हायची फारच बिकट...

दुकानात जायचं असेल तर सगळ्यात आधी माझच नाव घ्यायचे...
पण त्यातही मज्जा अशी की, 
खाऊसाठी दोन नाहीतर पाच रुपये ठरलेलेच असायचे...

बाजारातून खाऊ मात्र न चुकता आणायचे...
आणि कधी नाहीच जमल तर,
प्रत्येक नातवंडाच्या हातावर पाच-दहा रुपये नक्की ठेवायचे...

                                                                                        -Sanchita Kekane #आजोबा

Sanchita Kekane

आजोबा

read more
शाळा आणि अभ्यासाच्या खूप कडक शिस्तीचे...
भरपूर शिका, मोठे व्हा, 
वाईट संगतीला लागलात तर याद राखा, बाबा नेहमी म्हणायचे...

आजोबांचे शिक्षण जरी कमी असले तरी गणितात अव्वल असायचे...
निराळीच भाषा बोलून अन् पाव पावकीची गणीत विचारून,
 सगळ्यांचीच बोलती बंद करायचे...

खरी गंमत तर तेंव्हा यायची, 
जेंव्हा बाबा शेतावरून थकून यायचे...
जो कोणी पाय चेपून देईल,
 त्याला हळूच डबितून काढून दहा रुपये द्यायचे...

तेंव्हाच माझा सगळ्यात मोठा आजार म्हणजे सर्दी आणि दाडदुखी,
त्यामुळे doctor काकांचे Injections आणि त्या मोठ्या मोठ्या गोळ्या,
ज्यांना आजही घाबरते, आणि तेंव्हाही घाबरायचे...
मग काय! आजोबा पहाटे लवकर उठून जंगलातून कासलतरी औषध आणायचे,
आणि माझ्या सगळ्यात मोठया आजाराला दूर करायचे...

शाळेमध्ये बक्षीस मिळाले तर शाबासकीची थाप मिळे पाठी...
जरा जरी केला आगाऊपणा तर,
 तयारच असे, आजोबांचा हात आणि ती भली मोठी काठी...

आजोबा, तुमचे आशिर्वाद आणि चांगल्या संस्कारांमुळे उत्तम शिकलो,
 आणि मोठेही झालो,पण मनाला कुठेतरी खंत नक्कीच  वाटते...
जीवनाच्या प्रवासात सगळ सुरळीत चालू असताना,
बाबा,तुमची उणीव मात्र कायम भासते...

                                                                         -Sanchita Kekane

                               We Miss  U आजोबा...! आजोबा

Rahul Gidd

आजोबा

read more
mute video

aniruddh

माझे आजोबा

read more
mute video

Abhijit Shinde

आजी आणी आजोबा

read more
mute video

Rohini kadam

आजोबा, तुम्हाला रहायचंय आमच्यात...!

read more
आजोबांसाठी... आजोबा, तुम्हाला रहायचंय आमच्यात...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile