Nojoto: Largest Storytelling Platform

New ही वाट दूर जाते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ही वाट दूर जाते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ही वाट दूर जाते.

    PopularLatestVideo

somnath gawade

#ही वाट दूर जाते

read more
ही वाट दूर जाते
निसर्गाच्या कुशीत
येई वाऱ्याची झुळूक
मन गाते खुशीत
 #ही वाट दूर जाते

Dr Mangesh Kankonkar

ही वाट दूर जाते #walkingalone #poem

read more
ही वाट दूर जाते
अशा वाटेला नको लागायला,
असं म्हणून कसं चालेल?
महत्व आहे अखंड चालण्याला

ही वाट दूर जाते
म्हणून काय 'मांझी' थांबला,
दगडी कातळ फोडीत
तो वाट काढीत राहिला

ही वाट दूर जाते
मी पोहोचेन असा करावा निर्धार,
कधी बोथट होऊ देऊ नका
आपल्या प्रयत्नांची तलवार

ही वाट दूर जाते
देते अनुभवांंची शिदोरी,
जसे वर्षानुवर्ष वाटेवर चालतो
माझा विठुरायाचा वारकरी

©Dr. Mangesh Kankonkar ही वाट दूर जाते

#walkingalone

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ही वाट दूर जाते... #हीवाट1 हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माहिती असते ही वाट दूर जाते..
तरीही सर्वांना आवडत असते.
मुख्य ठिकाण कुणालाच माहीत नसते...
तरीही ह्या वाटेवर चालणे सुरू होते.
काहींना लवकरच मिळतो विसावा ह्या वाटेवर...
तर काहींना फक्त पायपीट करावी लागते ह्या वाटेवर.
काहींसाठी गुलाबाच्या फुलांप्रमाणे नाजूक असते ही वाट...
तर काही जणांसाठी गुलाबाच्या काट्यांप्रमाणे टोचत राहते ही वाट.
कशी ही असली आणि कितीही दूर जात असली ही वाट...
तरीही सर्वांच्याच आवडीची असते ही प्रेमवाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
ही वाट दूर जाते...
#हीवाट1
हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Jayshree Hatagale

#solace #ही वाट जाते कुठे??? #जयश्री #poem

read more
"ही वाट जाते कुठे???"

ही वाट जाते कुठे?????
जेव्हा विस्कळित होते आयुष्य 
प्रत्येक वळणावर....
तेव्हा धुंडाळाव्या लागतात
पुन्हा नव्या वाटा.....
आणि ह्या नवीन वाटा
आयुष्याला कुठे घेऊन जातात.......???
हाही तितकाच गहन प्रश्न...
तरीही जी वाट समोर दिसेल
त्या वाटेने मार्गस्थ व्हावच लागतं
या संघर्षमय जीवनात कधीच 
भविष्याचा अंदाज बांधता येत नाही
अंधारमय या आयुष्याच्या वाटेवर
जस जसा एखादा उजेडाचा कवडसा दिसेल
त्या कवडशाच्या आधाराने....
चाचपडत का होईना....
उजेडाच्या दिशेने मार्गक्रमण करणं
जणू काही क्रमप्राप्तच असतं...
कारण कुठेतरी एक उमेद
कायम असते मनात......
कारण वादळातून वाट शोधणं
हे मनानं पक्कं ठरवलेलं असतं....
मरण तर एक दिवस आहेच
परंतु संकटाच्या छाताडावर पाय ठेवून
जगण्याची मजा काही निराळीच असते
त्यामुळे या वाटा कुठेही जात असल्या तरी
त्यांना योग्य दिशेने वळवण्याचं कसब
हे आयुष्य बरोबर शिकवतं माणसाला
फक्त हिम्मत कधी हारायची नाही
प्रत्येक वाटेला एका निश्चित ध्येयापर्यंत
पोहोचवण्याची कला ही
प्रत्येक माणसात असते....
त्यामुळे गोंधळून न जाता
त्या वाटेवरून बिनधास्त
प्रस्थान करायचे.......
"मंजिल" तो यकीनन मिलेगी....🤗

©®-जयश्री हातागळे #solace 
#ही वाट जाते कुठे???
#जयश्री

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more
mute video

हेयर स्टाइल by mv

#इनकी शरण में जाते ही सभी संकट दूर हो जाती है# #मीम

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली.... #lovebeat

read more
mute video

Tushar Nevarekar

ही वाट #alone

read more
ही वाट एकाकी 
तू मिळताच क्षणी हवी हवीशी होईल.
आणि मग मी पुन्हा चालू लागेन 
पुनः एकदा चालायला.
नव्या जोशात.

©तुषार नेवरेकर ही वाट
#alone

vishnu thore

जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही ओढ होते अनावर दूर नेते लाट ही अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते... संभ्रमा

read more
जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही
ओढ होते अनावर दूर नेते लाट ही
अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते
अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते...
संभ्रमाच्या काळोखाची केवढीही वाटे भीती..१
गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती..
- विष्णू थोरे
9325197781 जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही
ओढ होते अनावर दूर नेते लाट ही
अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते
अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते...
संभ्रमा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile