Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेले अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेले अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेले अभंग.

    PopularLatestVideo

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

mute video

Mohan Somalkar

mute video

Shashikant Koli

अभंग.... #Poetry

read more
mute video

Mohan Somalkar

# अभंग #मराठीकविता

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंग #Music

read more
विठ्ठलाची बाधा...

वारा देही संचारला । तगमग ही उरीची।
        बाधा झाली बाधा झाली।मज विठ्ठलाची ।।धृ।।

घुमावया लागे मन। विस्कटला पंचप्राण।
        भांभावला आत्मभान। हाक विठ्ठलाची ।।१।।

नामरूपी भस्म ल्यालो। आत्मरूपी शुद्धी प्यालो।
          मोह मायेचा भंडारा‌ । आस विठ्ठलाची ।।२।।

बरळलो सार्थ वाणी । ब्रम्हानंदे पाणी पाणी ।
म्हणे कवीराज ऐसी । धून विठ्ठलाची ।।३।।

कवीराज अभंग

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
भावभोळा हरी (अभंग*)
 
भावभोळा हरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । श्री श्रीहरी ।।०१।।

क्षणाक्षणां ध्यान । तुझे रे केशवा ।
तुझाच माधवा । देह माझा ।।०२।।

उभा वारकरी । देह दिधलासी ।
खड़ा ठाकलासी । भक्तजना ।।०३।।

हरी हरी घोष । मनी रात्रंदिनी ।
संत शिरोमणि । तू विठ्ठला ।।०४।।

तुझ सम सारे । रंजले गांजले ।
मज् जवळीले । बां विठ्ठला ।।०५।।

भावभोळे रुप । अनंत ते कोटी ।
नाम घोषओठी । हरी हरी ।।०६।।

वाहिला हां देह । भयमुक्त श्राप ।
तूच मायबाप । अनंताचा ।।०७।।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #अभंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile