Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवणाचे डबे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवणाचे डबे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवणाचे डबे.

Related Stories

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

जेवणाची वाट पाहणारा शेतकरी

read more
नको पीळुस गड्या मिशीला
तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll

आर आर आलिया बांधावरन
हात धुवून बस राग गिळून
डोयीवर पाटी हातात बरणी
लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll

हात धुवून बस की रं गड्या
तुझ्यासाठी आणल्यात वड्या
कसा सुटल्याय ठेच्याचा वास
सावकाश घे लेका लागेल घास ll २ll

आर ही तर परक्याची लेक
तिच्या संग वाग  बाबा नेक 
 मराठी मुलखाची शिव योग्याची
पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी

Yogeshwar Narwade

जीवनाचे सत्य #poem

read more
होणारा सुर्यास्तही जीवनाचे 
सत्य सांगुन गेला
जगताना आयुष्यात लख्ख प्रकाशानंतर
गडद काळोख आहे हे सांगुन गेला..!

कवी
योगेश नरवडे
बीड जीवनाचे सत्य

Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही.....
By Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही
माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ...,

आतून पोखरलेली मने त्यांची ,
चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात 
दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात ....

स्वार्थाचा बाजार आहे सगळा
नात्याला पैशाने तोलतात ....
हृदय शून्य झाला आहे 
मनुष्य इथे....
नुसता शरीर घेऊन फिरतोय .....

ईश्वराला मानत नाही 
माणसाला जाणत नाही ,
राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही ....

दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही....
तड-फडत्या माणसाला बघून 
कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही....,
पाय कुणाच्या मदतीला धावत नाही 
तुटलेल्या माणसाच्या 
पाठीवर हात कुणी फेरत नाही....

डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात ,
चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे ,
कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही 

काही लोक बोलून दाखवितात..... ,
तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात 

माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात....
अक्षरशः 
माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात...

माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही .......
कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही.......

YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर)

Author

©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे

suwarta

mute video

Babanrao Shelar

जीवनाचे रंग

read more
जीवन आहेत रांगोळीच  चित्र, 
लाडका गुलाबी आवडता मित्र!
रांगोळीला  रंगान सजवायची मस्त, 
जीवनाला मोहक बनवायचा असत!! जीवनाचे रंग

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories
loader
Home
Explore
Events
Notification
Profile