Nojoto: Largest Storytelling Platform

New हळवे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हळवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हळवे.

Related Stories

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

अधीर मन..

उत्तराचे प्रश्न हरवले शोधता माझं मजला 
श्वास क्षणभर हे असे थांबले पाहता स्वप्नी मी तुजला 
ओढ अनामिक कोणती ही न कळे माझे मजला 
सत्य म्हणू की भास हे सांग ना माझ्या वेड्या मना
न तू मजला मनभरून पाहिले न मी तुजला पाहिले 
सांग ना मग तरी कसे जीव एकमेकात गुंतले 

एक एक क्षण असा विरहात मी शब्दगुंफन करूनीया मांडला  
मनानेच या असा अनाहुत धीर मग का रे सांडला  
मीटता डोळे मी असे मीठीत तुजला पाहिले
नकळत माझ्या मला मी स्वतःस तुजला वाहिले

अधीर श्वास माझे उताविळ असे जाहले 
स्वप्नातंच जेव्हा मी तुझ्या समीप असा येता
होता तुझा स्पर्श वेडा मनी असा मी बावरलो
एकाकी तू जेव्हा मला बाहुपाशात सावरले

तुझ्या साखरमिठीत माझे क्षण असे सुवर्णासम फुलू लागले
तुझ्या बाहुजाळ्यात मन असे झुलु लागले 
एका क्षणी तुझ्या ओठाचा निसटतासा स्पर्श झाला
नकळत माझ्या ओठांनी तुझ्या ओठांना चुंबिले

लाजेचे पडदे सारे एक एक मागे सरले  
तुझ्या माझ्या श्वासात आता न काही अंतर नाही उरले 
स्पर्श तुझा असा जीवघेणा जागविती अशा जाणीवा
अशा घडी वाटे सखये भरून टाकू मग
साऱ्या विरहाच्या उणीवा

©शब्दवेडा किशोर #हळवे_मन

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...

Prasaad Shendage

हळव्या मनाच्या,
हळव्या ओळी....
हळव्या क्षणाची,
काहूर भोळी..... 

सुचलेल्या ओळी

©Prasaad Shendage #हळवेमन#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#standout

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या आठवणींचे मेघ येता,
माझ्या प्रेमाचे आभाळ दाटून आले.
अश्रू रूपी जलधारा बरसल्या त्यात
अन हळवे मन माझे वाहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

Suhas Athawale

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा; स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा, नातं तस गोड, त्याला नाही तोड; स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा, अंतरी(माझ्या) जरी #chocolateday #मराठीकविता

read more
गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा,

नातं तस गोड,
त्याला नाही तोड;
स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा,

अंतरी(माझ्या) जरी लपले भाव गोडव्याचे;
मनि येता(तुझ्या) भाव हळव्या डार्क चॉकलेटचे,

डार्क चॉकलेट जरी असते कडू;
हळवे नाते आपुले; तयानेच् गोड करू,

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझ्या-मझ्या गडद चॉकलेटचा...
✍️सुहास रविंद्र आठवले

©Suhas Athawale गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा,

नातं तस गोड,
त्याला नाही तोड;
स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा,

अंतरी(माझ्या) जरी

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile