Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवारात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवारात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवारात.

Related Stories

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

शिवारातला पाऊस #मराठीकविता

read more
°शिवारांतला पाऊस°

आला पाऊस पाऊस माझिया शिवारांत 
शुभ्र शुभ्र चमकूनी मोती थेंबाथेंबात 
थेंब थेंब टपोरे झेलूनिया वेलीतरू 
चिंब चिंब न्हावूनिया लागेल ती बहरू 
सागदऱ्याशी येतसे तो झाडून पाकुन 
करंजी बन पुरे जाई झाकून झाकून 
चिंदुटी, काळा डोळा, कडबान येता सर 
निमघाटा पाणी भरे पांढरीची विहीर
मांदळा ,विर, कुर्कुट दऱ्या मुसळधार 
वाघ दरा धामंदेवाची ही धार उदार 
सुकापुरी, शिबोर धुव्वाधार जळजळ  
भोकरपट्टी, तळपट्टी होई पाणथळ 
ज्ञानसागर खिंड भरे तुडुंब तुडुंब 
ज्ञानोबाच्या मागुनी जळ अखंड अखंड 
धामणलिंग, पांगुळ ठिका नी खैरमाळ
भरम दरा, पिंगळ दरा नी शिरदाळं  
रान पठार सारे जाता भिजून भिजून 
हिरवाषार येई शालू नेसून नेसून 
सदानंदा तुझा रे येळकोट येळकोट
खंडेराया आनंद मावेना रे गगनात

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav शिवारातला पाऊस

Shankar kamble

🌾 *सुगी...* 🌾
 *सुगी सराईचं दिस* 
 *नाही इसावा पायाला* 
 *माय माळ तुडविते* 
 *चार मोत्याच्या दाण्याला...* 

 *भर उन्हाचा काहूर* 
 *भिजं घामानं पदर* 
 *आग पोटात पेटली* 
 *चिल्या-पिल्याचा इचार...* 

 *धाटं-धाटं जमवूनी* 
 *भारा जोंधळ्याचा डोई* 
 *लयी तापली ढेकळं* 
 *भार संसाराचा वाही...* 

 *काट्या-कुट्यात चालता* 
 *देह -मनाला जखमां* 
 *घाली फुंकर स्वतःच* 
 *चिंधी बांधते त्या कर्मा* ...

 *अंग मोडूनियां काम* 
 *नाही घडीचा आराम* 
 *वात तीळ तीळ जळे* 
 *दिव्यासंग ज्योत ठाम...* 

 *घोट पिऊनिया पाणी* 
 *दूर सारते भुकेला* 
 *शिळ्या तुकड्या संगती* 
 *पचविते नशिबाला...* 

 *सांज ढळता-ढळता* 
 **रास सरली-सरली
 *ऊत आला तुझ्या दारी* 
 *झोळी अर्धी भरली...* 

 *मोती झोळीत की डोळा* 
 *दोन्ही नाहीत येगळा
घास भरविते माय
सारा अमृत सोहळा

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेती #🎑शेती #शिवारात 

#Morning

बी.सोनवणे

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे' माझ्या "बळीराजाचं "सपानं, काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...! असा कसा कोपलासं 'अवक

read more
'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवकाळी'
ऐनं "सुगी" कापणीच्याचं हंगामात,
माझा "पोशिंदा" कोलमडूनीं गेलायं
काय  "नशीब त्या फाटक्या झोळीचा पदरात"...! 'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवक

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।

Kishor Rokade

जय शिवराय जय शिवराय..

read more
!! माझ्या राजा र...!!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

खऱ्या खोट्याची जाणं व्हावी..यासाठी 
छत्रपतींच्या वारसांचा..अन बाबराजें सोबत..
प्रत्येक शिवमावळ्यांचा जीव तळमळत आहे.!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

आज महाराष्ट्रात "शिवभक्त" शिव विचार..जपत आहे.!
त्या कार्याचं मोल..त्यांच्या पाठीवर उमटवलं जात आहे.!
पहा महाराज आज काय घडतंय आहे..
तुमच्या मावळ्याला शिवकार्यच नडत आहे..!

अश्रूंनी आज त्यांच्या..शिवचरणाला अभिषेक आहे.!
सर्व सहन करून देखील..शिवभक्त तटस्थ आहे..!
आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत..
याचा सार्थ अभिमान.. आम्हांस आहे..
दाखवुन देऊ शिव मावळ्यांच्या कार्याने..की
छत्रपती शिवरायांचे वाघ अजूनही जिवंत आहे.!
जय शिवराय..

©Kishor Rokade जय शिवराय

जय शिवराय..

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile