Nojoto: Largest Storytelling Platform

New बहीण भावाचे नाते कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहीण भावाचे नाते कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहीण भावाचे नाते कविता.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते

अश्रु माझे सोबती

बहिण शोभे भावाला

read more
mute video

Yogesh Kumar Mishra"yogi

काव्य हिंदीसाहित्यकार हिंदीसाहित्य भावांश कविता

read more
।। भावांश ।।
हमारे ह्रदय का हिमराज बहुत बड़ा है "योगी"!
अपने स्वार्थ की नदों से कितना उलीचोगे!!
योगेश कुमार मिश्र"योगी"

©Yogesh Kumar Mishra"yogi #काव्य
#हिंदीसाहित्यकार
#हिंदीसाहित्य
#भावांश

#कविता

प्रतिक लोखंडे

#बहीण

read more
#बहीण

उगवतीचा सूर्य शांत भासावा
अनं आमची भांडणे तीव्र व्हावी,
हसून हसून भांडता भांडता
ती माझ्यावर पटकन रुसावी!! 

रुसून फुगून कोपऱ्यात बसलेली ती
मी केलेल्या वाकुल्यांनी खुदकन हसावी,
कधी कधी रडवलेल्या अश्रूंना वाटतं
मलाही एक छानशी बहीण असावी!! #बहीण

suresh pawar

#बहीण

read more
टॉम अँड जेरी
(प्रिय बहिणीस समर्पित)

मीच हुशार तू ढगोळी
मी साजूक तूप तू पुरणाची पोळी
दप्तर तुझं पण पाठीवर माझ्या
चल म्हणतेस लवकर गाढवा माझ्या

सांडलीस ना भाजी थांब आईलाच सांगते
हाथा पाया पडतो मग ती उगाच भाव खाते
ती टपली मारायची रोज पण रडायला जमायचं नाही
माझ्या साध्या खोडीनेही तिचा भोंगा कधी थांबायचं नाही

एका पानाला २ चॉकलेट असा भाव ती ठरवायची
पण काहीच न घेता बिचारी निबंध लिहून द्यायची
क्लास,धुनी भांडी अन त्यात अभ्यास सारं मी पाहायचो
त्या पूर्णत्वाकडून मी अपूर्ण असलेला 'धैर्य' शिकायचो

अगदी बाप आजारी असताना तिनं सोसलेलं आठवतं
माझ्या शिक्षणापायी तिनं माघार घेतलेलंही आठवतं
हळू हळू संसार नावाच्या जीवनात तू सुखाने नांदतेस
आपल्या गोड कडू अनुभवाच्या गाठोड्यातही तू असतेस

जगात सुंदर नातं आपलं जसं बिस्कीट अन खारी
होय मी आहे टॉम आणि बहीण माझी जेरी
रचनाकार,
सुरेश गोविंद पवार #बहीण

surekha kamble

बहीण

read more
mute video

Vikas Jagtap

बहीण #poem

read more
बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप) बहीण

Prafulla Pednekar

बहीण 🙏 #मराठीविचार

read more
mute video

Vishnu Jadhav

भाऊ बहीण

read more
 भाऊ बहीण

Vrishali G

कविता नाती #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile