Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपणीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपणीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणीचा.

Related Stories

    PopularLatestVideo
cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

आजही आठवण येते ती लहानपणीची
किती मज्जा असायची आम्हा भावंडाची
नव्हते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण सोबत असायचो
भांडण भरपूर होते पन दुपटीने प्रेम करायचो
आई पन रागवा रगीव करीत असायची
पन पत्ते खेळताना ति पन डाव मांडायची
नव्हता मोबाइल तेव्हा फोटो काढायला
तरीही मनामधे ते क्षण जपायचो नव्हता पलंग अन गादीचा बिछाना
पन अंगणात रातच्याला असायचा आमचा धिंगाणा
गेले ते दिवस अन बदलली स्थिति
थोड थोड करत आपलेच दूर जातात किती
आता आलो एकत्र तरी करतो मोबाइल वर चॅट
राहिलीच नाही आता तेव्हाची मौज फार
पन एकांतात बसल्यावर आठवतात ते दिवस
अस वाटत हे इलेक्ट्रॉनिक जग सोडून एकत्र येऊ परत
आठवतात मला ते लहानपणीचे दिवस
नव्हत आलिशान जगन पन साथ द्यायचे ते लोक... आठवण ती लहानपणीची..

आठवण ती लहानपणीची..

3 Love

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

आठवण ती लहानपणीची..

आठवण ती लहानपणीची..

33 Views

ec690363f9a755a5722d5fe47c53a1d6

VinayaKadamVlogs

लहानपणाची आठवण 😃

लहानपणाची आठवण 😃 #Comedy

27 Views

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

लहान पणीच्या आठवणी,लहानपणीची रेखाटलेली चित्रे

लहान पणीच्या आठवणी,लहानपणीची रेखाटलेली चित्रे #जीवनअनुभव

65 Views

e9958ba6e32232d942d1e69c3bd482e5

Ganesh Rawal

लहानपणी आई जेव्हा काही सामान आणायला पाठवायची 😁🤭🫣

लहानपणी आई जेव्हा काही सामान आणायला पाठवायची 😁🤭🫣 #जीवनअनुभव

143 Views

3c416fdb094e4eadd651e3d346729013

Sakshi L. Yawale

समजदार मन💞

#कवीता #बालपण #आठवण #जीवन #प्रेम #आनंद #डायरी #लहानपणी
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप छान आठवण लहानपणची,
मनसोक्त पावसात भिजण्याची.
भिजता भिजता पावसात,
येरे येरे पावसा म्हणण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
ढगांच्या गडगडातीची नि विजेच्या चमकण्याची,
भीती वाटताच मनात पटकण घरात पळण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
बरसणारा पाऊस दारात बसून पाहण्याची
येरे येरे पावसा म्हणत जोरजोरात ओरडण्याची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची...
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️

माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️ #story #nojotophoto

4 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

लहानपणी चंद्र माझा ' मामा ' होता
आता
मामाच्या पोरीत मला ' चंद्र ' दिसू लागला लहानपणी चंद्र माझा मामा होता

आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी 
#चंद्र #ती

लहानपणी चंद्र माझा मामा होता आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी #चंद्र #ती

0 Love

528165a052e0e4c087d568668bbc52b0

Santosh Jadhav

आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

8 Love

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

सरला हा काळ बागडायचो अंगणी भटकंती ओढ्या नाल्यांची.....
‌‌‌  सारा घोळका कसा अंगणी बिलगुणी असायचा.....
सांगड त्या वेळची काही औरच असायची.....
‌‌  गलका सारा गल्ली बोळांत रंगायचा भांडण मोठ प्रेमाने मिटायचे.....
 भेदभाव नाही कोणाच्या मनी खाऊ एकत्र त्या मायेचा....
    एक झाड धरलेल सारा गाव निजायचा गलका आमचा नी पक्ष्यांचा वावर असायचा......
सावलीत त्या गर्द दाटिवाटिचा सारा पसारा....
   आंबा ,चिंच, करवंद फळांचा पुर यायचा...
 तुटवडा आता बाजारात मोठा किमतींत फरक मोठा.....
       सारा गाव आनंदात वावरायचा.......
अंगणात माझ्या सारी गर्दी जमायची.......
     रंगलेला खेळ ना कधी मोडायचा......
अंगणात डाव माझ्या रमायचा......
   ‌‌गलका सारा खुप ऐकायला यायचा, गाव सारा आनंदाने जगायचा......
    बोल ते लहानग्यांचे बोबड्या बोलके.......
             नटलेली अंगणी स्वप्न वेडे.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधी खेळेल अंगणी...
#कधीखेळेलअंगणी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कधी खेळेल अंगणी... #कधीखेळेलअंगणी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लग्न म्हणजे नुकसान, 
हे लहानपणीच जाणले होते,
बऱ्याचदा हातून काही नुकसान होताच,
आईच्या तोंडून 'लावले वाटतं लग्न' असे ऐकले होते.
😄😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine #marathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लिहायच्या तरी कुठल्या आणि किती ?
सुंदर तुझ्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
मोठे होत गेलो तशी समज येत गेली,
अल्लडपणाची आपली मस्ती कमी होत गेली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर कदाचित हे समजले असावे,
लहानपणाची मैत्री कदाचित प्रेमात तर बदलत जात नसावी.
पण काहीही असो खूपच सुंदर आठवणी त्या बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात सुंदर तुझ्या आठवणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

97a5eb1693d5e55d93907a216a46cd7c

Shailesh Hindlekar

 लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन

लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन #poem #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लहानपणाची भांडणे आठवली,
एकमेकांशी घेतलेली कट्टी आठवली,
कट्टी घेताना बोललेली एक ओळ आठवली.
"कट्टी त कट्टी,बालं बट्टी 
लिंबाचा पाला तोडू नको, 
बारा महिने बोलू नको".  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तोडु नकोस..
#तोडुनकोस
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तोडु नकोस.. #तोडुनकोस चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine #लहानपणीचीआठवण

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन.
खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात,
पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात.
सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण,
तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण.
दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण.
लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो,
रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो.
अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे,
शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे.
आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो,
मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंगण..
#अंगण 
हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine
Collabor

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

आता राहिली न कोणतीच नवाळी।
वेगळीच ती, बालपणीची दिवाळी।।

फटाक्यांसाठी तेव्हा दोन पैसे नव्हते
आता पैसे असूनही,इच्छा न उरली।।

फराळासाठी किती मारायचो उड्या
आता फराळाची,नाही आतुरता राहिली।।

तेव्हा दिवाळी म्हणजे खरी खरी मज्जा
आता तर ऑनलाइन झाली दिवाळी।।

वाटे मनी, यावे ते दिवस परतुनी पुन्हा।
त्या जुन्या आठवणींना मिळो उजाळी।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आजीची गोष्ट नेहमीच सर्वांना ऐकाविशी वाटते
आजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लाडकी असते.
आजीची गोष्ट म्हणजे खूप छान,सुंदर अशा कथा वाटतात,
गोष्टी जरी वाटत असल्या त्या तरी ते आजीची अनुभव असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आजीची गोष्ट...
#आजीचीगोष्ट

लहानपणी प्रत्येकानेचं आपल्या आजींकडून गोष्टी ऐकल्या असतीलच, चला तर

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आजीची गोष्ट... #आजीचीगोष्ट लहानपणी प्रत्येकानेचं आपल्या आजींकडून गोष्टी ऐकल्या असतीलच, चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मला नक्की आठवत नाही की तुझी नि माझी साथ केव्हापासून आहे,
पण इतरांच्या म्हणण्यानुसार जन्मल्यापासून तू माझा सोबती आहेस
पण लहानपणी तू खूप दूर दूर राहायचा.
आईच्या म्हणण्यानुसार लहानपणी मी कधीच तुला माझ्याजवळ फिरकु दिल नाही.
खेळण्यात,असो किंवा खाण्यापिण्यात असो किंवा इतर कुठल्या बाबतीत असो मी तुझी साथ कधीच स्वीकारली नाही.
पण जसा जसा मोठा होत गेलो तुझी सोबत जीवनात खूप महत्त्वाची आहे हे समजलो.
आणि आत्ताच्या घडीला तर तू माझा एकदम जिवलग झालास कधीच मी तुला दुरावा देत नाही.
आयुष्य हे खूप आनंदी असले पाहिजे जितके आपल्याला मिळाले आहे त्यातच आनंद मानला पाहिजे आणि हे सर्व तेव्हा शक्य होते जेव्हा तुझी साथ असते. शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय समाधान..
#प्रियसमाधान
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय समाधान.. #प्रियसमाधान #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine

0 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️


पर्यावरणाचा होणार नाही नाश 
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करू 
एकमेकांना साहाय्य करू
दुसऱ्याचा चेहऱ्यावर आनंद आणुया 
सर्वांची  दिवाळी गोड करूया.

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी आलीय.
दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत –
‘दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
मला अस वाटतं 
आपण

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी आलीय. दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत – ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी मला अस वाटतं आपण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #दिवाळी2020 #दिनदिनदिवाळी1

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माझे बाबा ज्यांनी मला घडवले
वाईट सवयी पासून अडवले.
खूप छान सांभाळले
पडू नये म्हणून नेहमीच सावरले.
लहानपणी बाप म्हणून वागले
तर तरुणपणी मित्र म्हणून वागले.
तुला हे घेईल ते घेईल म्हणत सर्वकाही दिले,
माझे बाबा प्रत्येक शब्दाला जागले.
चुकलो असता कुठे,चांगलेच झोडले
क्षणार्धात आई बनून मायेने कवटाळले. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझे बाबा...
माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना
पितृदिनाच्या आणि
 आंतरराष्ट्रीय यो

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझे बाबा... माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना पितृदिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय यो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेबाबा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आज खरी गरज आहे ती चौकटीच्या बाहेर येऊन वेगळं काही करण्याची,नवे विचार अंगीकृत करून जुने विचार मोडण्याची.
आज गरज आहे ती ठाम मताची,जरा अपयश आले की 
खचून न जाता पुन्हा लढून यश मिळविण्याची.
आज प्रत्येकालाच गरज आहे आधाराची,
जसे लहानपणी मुलांना गरज असते आई वडिलांच्या आधाराची तशीच वृद्धापकाळात आई वडिलांना गरज असते मुलांच्या आधाराची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप छंद असतात बालपणी चे,
मोठे होता होता जोपासायचे राहून जातात.
जेव्हा केव्हा वेळ मिळता आठवतात,
मनाला सुखद आठवण देऊन जातात.

सुखद छंद ते जोपासण्याची इच्छा पुन्हा ह्या मनी,
लहानपणी खूप सुंदर बाब होती जी आनंदाची.
वाटे पुन्हा एकदा सुरुवात करावी त्या सुखद छंदाची,
साठवण करावी,मनाला अपार आनंद देणाऱ्या क्षणांची.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... सुखद छंद 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... सुखद छंद तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqसुखद

0 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

जीवनरंग.....

जन्मापासून मृत्यूपर्यंत टप्प्याटप्प्याने बदलत जाणारे जीवन वरणीत करणारी सुंदर कविता
 लहानपणी आवडतात खारी
यौवनात आवडतात पोरी
तारुण्यात करतात नोकरी
मग येते नवरी
घर होतं भारी
गाडी येते दारी
त्यात छोटीशी परी
आयुष्याची होते अर्धवा

लहानपणी आवडतात खारी यौवनात आवडतात पोरी तारुण्यात करतात नोकरी मग येते नवरी घर होतं भारी गाडी येते दारी त्यात छोटीशी परी आयुष्याची होते अर्धवा #GoodMorning #yqtaai #marathiquotes #paidstory

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सावल्यांची व्यथा मांडण्या मी सावली बनून पाहिले,
अंधाऱ्या रात्रीत किंवा दिवसाच्या उजेडात नेहमीच सोबत राहिले.
अंधाऱ्या सावलीत कित्येक जण मला घाबरतात नि भयावह म्हणून हिणवतात.
दिवसाच्या उजेडात ही मीच सोबत असते,भर उन्हात ही मीच संगती राहते.
इतकी सोबत असतानाही मला सोडून इतर सावली का शोधत असतात.
झाडा जवळील सावलीस किंवा आडोश्या ला उभे राहून 
दिसत नसलेल्या सावलीस आपली मानतात.
विसरतात अजून एक माझे रूप जे त्यांनी लहानपणी पाहिलेत,
समज येईपर्यंत आईच्या पदराच्या सावलीत राहिलेत.
मोठे होताच आईच्या मायेची सावली ही नकोशी वाटते,
समजून कुणीच घेत नाही मग का म्हणून 
मी माझ्या सावल्यांची व्यथा कुणास सांगते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

0 Love

528165a052e0e4c087d568668bbc52b0

Santosh Jadhav

शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile