Find the Latest Status about दिवस समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवस समानार्थी शब्द मराठी.
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Varpe Pandhari
मराठी आहोत आम्ही.....! शिवरायांचे मावळे आम्ही नाही आता झुकणार, आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी नाही आता मागे हटणार. संतांची भूमी पराक्रमाची जननी हाती तलवार खांद्यावर सासनकाठी , सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात घुमते धन्य ती आमुची मराठी....! अभिमान नाही तर गर्वच आहे मला मी मराठी असल्याचा, युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा. साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी, माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो धन्य ती आमुची मराठी...! भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख, नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप. आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू, जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू. करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस , मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..! आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी , हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा. कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर दारी असते सौभ्याग्याची तुळस , मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख.....! नाही चालणार आता मनमानी अन्यायालाही आत्ता थारा नाही , छत्रपती शिवराय हेच आमुचे मुखी दुसरे नावाचं नाही. जरी वाहिले रक्ताचे पाट तरी आता घाबरायचे नाही , पुन्हा एकदा नव्याने उभारू आपल्या स्वराज्याची उंच गुडी. आमच्या सांडलेल्या रक्तातही दिसणार नाही आता काळोख, मराठी नाही तर गर्वाने महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....! Pandhari Varpe 8698361992 ©Varpe Pandhari मराठी दिवस
जगदिश पुंडलिक भोईर
माय मराठी माझ्या मराठी भाषेचा गजर वाजूदे डंका तिचा जगभरात माझ्या मराठीचे बालने घराघरात अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी माझा मान मराठी माझी शान मराठी माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा भाग्य आम्हास आज बोलतो मराठी कवीसूर्य कुसुमाग्रजांस समर्पित,आदरांजली मराठी @ श्री. ज. पुं. भोईर.* ©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस
sahil tayde
मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आमचा अभिमान आहे, मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आम्हाला भेटलेल वरदान आहे. मराठी भाषा महाराष्ट्रचीच नव्हे तर पूर्ण भारताची शान आहे, मराठी भाषेच्या एका एका अक्षरात आमचा प्राण आहे. मराठी भाषा हीच आमची प्राण आहे, मराठी भाषा ही आमच्या जीवनाचा आधार आहे, मराठी भाषेचा आमच्यामुळे नाही तर मराठी भाषे मुळे आमचा सम्मान आहे, म्हणूनच विश्र्वभरात मराठीचा जयजयकार आहे. - साहिल तायडे ©sahil tayde जय मराठी 🙏🏻 मराठी राज्यभाषा दिवस #WallTexture
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Abhijeet Jagtap
मराठी भाषा दिवस डोळ्यातील भावनांना जर ओजस्वी वाचेने निर्मळ भाषेची साथ दिली तर भेदून जाणाऱ्या भावनेला अलगद तारणारा बांध तयार होतो.. भाषेचा साज चढवून, शृंगाराचा परीघ साधून ओठांच्या लगबगीत , गालातल्या खळीला.. सौंदर्याची परिभाषा तयार करतो. माझी मराठी माझी मातृभाषा माझी मातृभूमी. या मराठी दिनानिमित्त आपणास अवघा महाराष्ट्र प्रणाम करतो.... - अभि....✍ #मराठीकविता #मराठी #भाषा #दिवस #touchthesky #मायमराठी #मराठीराजभाषादिन