Nojoto: Largest Storytelling Platform

New आलो मी बाबूराव बोलतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलो मी बाबूराव बोलतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलो मी बाबूराव बोलतोय.

    PopularLatestVideo

aniruddh

मी कॉलेज बोलतोय

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मी मराठा बोलतोय... #nojotovideo

read more
mute video

dipak Rathod

मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem

read more
मी पाऊस बोलतोय....



खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय,
तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय,
मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या,
कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....

 कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी
हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....


लेखक‌........   दिपक राठोड

©dipak Rathod मी पाऊस बोलतोय....
#पाऊस 

#MereKhayaal

prince_Prashant

#मी संभाजी राजे भोसले बोलतोय..

read more
mute video

sb wadewale

मी तुझा मोबाईल बोलतोय...,..... #MyPenStory

read more
mute video

Dr Mangesh Kankonkar

हो मी रावण बोलतोय #Dussehra #मराठीकविता

read more
हो मी रावण बोलतोय

जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं,
तपासलं का स्वतःच्या चारित्र्याला मोठ्यानं त्यानं विचारलं.
केला आहे मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा,
प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा.

दिवसाढवळ्या रस्त्यावर अब्रुचे लचके तोडतात,
सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात.
तुम्हा मानवां पेक्षा राक्षस मी ठरलो भारी,
केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी.

हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या,
वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या.
हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा,
प्रयत्न करा तुम्हीं स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा.

तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा,
पण पेटवण्या आधी तुमच्यातील राम मला दाखवा...!!

©Dr Mangesh Kankonkar हो मी रावण बोलतोय

#Dussehra

Kumarchitra

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो #Life_experience

read more
मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो
सुरवातीला पत्त्यांच्या बंगल्यासारख्या भासणाऱ्या
खऱ्याखुऱ्या इमारती पाहून भांबावून गेलो
कशी जगतात ना लोकं!
तिथेच नगरातल्या एका भाड्याच्या खोलीत राहून 
मी माझं कॉलेज पूर्ण केलं
नोकरीला लागलो
काही वर्षांनंतर..
त्याच शहराच्या
थोडं नगराबाहेरच्या 
गावातल्या
एका बंगल्यात 
आज फ्लॅट पाहून आलो!

©Kumarchitra मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो

indraj choudhary

बाबूराव मस्त #Comedy

read more
mute video

कवी - के. गणेश

कवी बोलतोय..

read more
कवी बोलतोय..


फाटक्या झोळीत
केविलवाणे शब्द घेऊन,
अनवाणी फिरतोय..

माणसात हरवलेली
जूनीच माणुसकी
नव्याने पेरतोय..

ओस माळरानात
जणू पावसाची
अशा करतोय..

फळं यावीत सुखाची
प्रत्येकाला म्हणून
याचना करतोय..

मातीत पाय रोवून
एका जाणिवेनं
मी थरथरतोय..!
              @kganesh कवी बोलतोय..

कवी - के. गणेश

फौजी बोलतोय...

read more
मर्द निधड्या छातीची
पोलादी ढाल करून
डरकाळी वाघाची फोडतोय..
रक्षण करण्या मायभूमिचे
छुप्या गनिमी पहाडानाही
अख्खं मुळासकट तोडतोय..
नभात उडणाऱ्या गरुडाची
रक्तात जिद्द घेऊन
मातीवर लोळत नाही..
दुष्ट शत्रूच्या काफिल्यावर
शौर्याचा इतिहास रचतो
डरपोक खेळत नाही...
काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री
छुप्या काळ्या शत्रूवर
ठेवावा लागतो पहारा..
भयाण गर्द जंगल
कधी हिंस्र प्राणी
नसतो जीवाला निवारा...
व्याकुळ एकांतात जीवाला
बायको अन् चिमुकल्यासह
गावाकडचा लळा आठवतो..
दिमाखदार तिरंगा पाहून
थकलेल्या निष्ठावंत डोळ्यात
आसवांचा पूर साठवतो...
संकट समयी दऱ्याखोऱ्यातून
निस्सीम देशभक्तीचा वारा
अंगभर सळसळत राहतो..
वाघ जखमी झाला तरी
डोळ्यात आग घेऊन
जीव तळमळत राहतो...
ऐका माझ्या देशवासीयांनो
रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत
ओझं देशभक्तीचं पेलतोय..
पाठीवर हात ठेऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा
मी फौजी बोलतोय..
  कवी-गणेश खरात
  ९०२८११०५०९ फौजी बोलतोय...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile